Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

बीएएमएस डॉक्‍टरांना ऍलोपथी औषधे वापराचा अधिकार
-
Monday, July 16, 2012 AT 03:45 AM (IST)

कोल्हापूर - आयुर्वेद पदवीधारक बी.ए.एम.एस. डॉक्‍टरांना ऍलोपॅथी औषधे वापरण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे "निमा'चे राज्याध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

वेगवेगळ्या वैद्यकशाखेचे पदवीधर डॉक्‍टर आणि त्यांचे अधिकार हा विषय चर्चेत आला आहे. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (बी.ए.एम.एस.) डॉक्‍टरांना त्यांच्या व्यवसायात ऍलोपॅथी औषधे वापरण्याचा पूर्ण कायदेशीर हक्क आणि अधिकार आहे. महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 मधील कायदेशीर तरतुदीनुसार ऍलोपॅथीचा वैद्यक व्यवसाय बी.ए.एम.एस. डॉक्‍टर्स कायदेशीररीत्या करू शकतात. या कायद्यातील परिशिष्ट ए, बी, ए-1 डी मध्ये नमूद केलेल्या अर्हताधारकांना ऍलोपॅथी प्रॅक्‍टिस करण्याची अनुमती आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारणमधील (बुधवार, ता. 25 नोव्हेंबर 1992) भाग चार-ब अन्वये हे अधिकार महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 अंतर्गत नोंदणीकृत वैद्यक व्यवसायींना बहाल केले असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र शासनाने 23 फेब्रुवारी 1999 च्या राजपत्रानुसार विषयांकित नियमाच्या नियम 2 (ईई) (आयआयआय) नुसार बीएएमएस पदवीधर आयुर्वेदिक डॉक्‍टरांना औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि त्या अंतर्गत नियमानुसार ऍलोपॅथी औषधे वापरण्याचा आणि ऍलोपॅथी व्यवसाय करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यात कोणीही शंका घेऊ नये. बीएएमएस (आयुर्वेदाचार्य) वैद्यक व्यवसायींनी या कायदेशीर बाबींचा विचार करून आणि कायदेशीर हक्कांची जाणीव ठेवण्यासाठी तसेच जनतेच्या माहितीसाठी हे पत्रक नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केल्याचेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया
On 31/07/2012 09:22 AM Alopathy Dr said:
aopathic व्यावसायिक असूनही भारतीय म्हणून मला alopathy पेक्षा आयुर्वेदाचा अतीव अभिमान आहे . वैद्य पंकज नरम ह्यांनी आयुर्वेदाची प्रतिष्ठा जगात वाढविली आणि इतर नतद्रष्ट "वैद्य" (डॉक्टर नव्हे) मात्र पाठीचा कणा नसल्यासारखे आयुर्वेदाची लाज बाळगून alopathy practice करण्यासाठी याचना करतात SHAME...
On 30/07/2012 01:53 PM ANITA said:
BAMS Doctor practice allopathy very well........providing good services.........keep it up Docs.....let increase together our height & quality of services.......
On 16/07/2012 08:22 PM Nishant mittal said:
as i am MBBS student . .BAMS studies are totally diffrent from us while. . BHMS syallabus is much similar except pharmacology. .but they have allopathy subject as medicine for 1year and still they wont serve there demand of extension is a saddiest part of there mass leaders
On 16/07/2012 07:39 PM Mahesh said:
काय विल्हेवाट लावत आहात रुग्णांची? अलोपाथिक डॉक्टर सुद्धा आज ठीक अलोपाथिक औषध देत नाहीत, तेथे आयुर्वेदिक आणि होमेओपथिक डॉक्टर अलोपाथिक औषधांचा नीट अभ्यास न करता कशी ती औषधे देऊ शकेल? रुग्णांना काय लवकर वरती पोहोचवण्याचा विचार आहे?
On 16/07/2012 02:39 PM bapurao bite said:
as i m asst professor of pharmacology my view is--- 4 1/2 years some cources are there in health sciences, graduates from specific science can practice that medicine only. there is no such intermixing of sciences , if u want to practice allopathy go for that only, this is all cheating.pharmacist is having 2 years pharmacology sub ,they will also ask to practice with allopathy ..then govt has to review the thing ... it is all ,,,leading to ruine the health of community
On 16/07/2012 11:31 AM partha jadhav said:
aayurveda doctor can prescribe allopathic medicine at some extent.. dont make it sky is the limit fellaz..and about pharmacology u ppl learn it in emmergancy only including suturing and local anesthesia..actual study of Pharmacology by a MBBS student starts along with their clinical subjects when they study about each disease. That is the real element of pharmacology.. so grow up guys dont be a champ.. u have to know ur limits


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: