Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

एसटीमध्ये "मेगा कर्मचारी भरती'
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 08, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: msrtc,   st bus,   recruitment,   ratnagiri,   konkan
रत्नागिरी - एसटीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मानसिक ताण वाढत आहे. तसेच प्रवाशांना सेवा देण्यात अडचणी येत असल्याने आता महामंडळाने राज्यपातळीवर ऑनलाइन भरती करण्याचे ठरवले आहे. या भरतीमध्ये तब्बल 19 हजार 789 पदांची भरती होणार आहे. सुमारे वीस ते पंचवीस वर्षांनंतर प्रथमच अशी "मेगा भरती' होणार आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल.

महामंडळाच्या सर्व विभागांमध्ये चालक (कनिष्ठ) 8948, वाहक (कनिष्ठ) 6247, सहायक (कनिष्ठ) 2658, लिपिक, टंकलेखक (कनिष्ठ) 1936 अशी एकूण 19 हजार 789 पदे भरावयाची आहेत. सध्या रत्नागिरी एसटी विभागामध्ये 895 पदे रिक्त आहेत. यामध्ये चालक 300, वाहक 95, कार्यशाळेतील कर्मचारी, सहायक 300, प्रशासकीय कर्मचारी, लिपिक 200 यांचा समावेश आहे. मेगा भरतीमध्ये रत्नागिरीतही कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हायसे वाटले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे सध्या कामाचा वाढता ताण असल्याने मानसिक स्थितीही बिघडत आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती होण्यासाठी मागणी होत होती. आठ महिन्यांपूर्वी एसटी महामंडळातील एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये "मेगा भरती' करण्याचे आश्‍वासन मंत्र्यांनी दिले होते. हे आश्‍वासन आता हळूहळू पूर्ण होणार असल्याचे दिसत आहे.

बऱ्याचदा परजिल्ह्यांतील उमेदवार कोकणात विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अर्ज करताना दिसतात. नोकरी मिळाल्यानंतर ते आपापल्या जिल्ह्यांमध्ये बदली करून घेतात आणि येथे रिक्त पदे तयार होतात. तेथे तत्काळ भरती होत नाही. याचा फटका एसटी विभागाला बसत असतो. यापूर्वी झालेल्या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्यामुळे राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. या भरतीच्या वेळी असा प्रकार होण्याची शक्‍यता कमी आहे. कारण महाराष्ट्रात एकाच वेळी एका पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतील उमेदवार रत्नागिरीत येण्याची शक्‍यता कमी आहे.

चालक, वाहकांसाठी शिक्षणाची अट दहावी उत्तीर्ण अशी आहे. चालकांची अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणांवर 40 टक्के भारांक, वाहन चालन चाचणीमधील गुणांवर 60 टक्के भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता गुणानुक्रमे केली जाणार आहे. वाहक, सहायक आणि लिपिकांची निवड मुलाखत न घेता लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाणार आहे.

पोस्टाने अथवा इतर कोणत्याही प्रकारे आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ऑनलाइन अर्ज भरताना मोबाईल नंबर व ई-मेल आयडी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. अर्ज करण्याची मुदत आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत आहे. एसटीच्या भरतीचा ऑनलाइन अर्ज http://msrtc.mkcl.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
प्रतिक्रिया
On 08/08/2012 02:49 PM darandale govinda said:
good


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: