Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

शिष्यवृत्ती मिळण्यात आता "ऑनलाइन'चे विघ्न!

-
Thursday, August 23, 2012 AT 01:00 AM (IST)
धुळे- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र शासनाने प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेला 2008 पासून मंजुरी दिली. ती बहुतांश प्रमाणात कागदोपत्रीच राहिली आहे. असंख्य लाभार्थी विद्यार्थ्यांना अद्याप एक छदामही मिळालेला नाही. शिक्षण संचालनालयाने आता घाईघाईने 31 ऑगस्टपर्यंत "ऑनलाइन' अर्ज मागविले आहेत. राज्यातील बहुसंख्य शाळांत संगणक, इंटरनेट प्रणाली नाही. असली, तरी भारनियमनामुळे संगणक चालत नाही. अशा विघ्नांमुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या पालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

चौदा लाख लाभार्थी
राज्यात पहिली ते दहावीच्या सर्व शाळेतील सुमारे 13 ते 14 लाख अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. त्यांना 3 ऑगस्टपासून "ऑनलाइन' अर्ज भरण्याची सूचना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे. "ऑनलाइन' प्रक्रियेतील अनेक अडथळ्यांमुळे राज्यातून 16 ऑगस्टपर्यंत केवळ 35 हजार अर्ज दाखल होऊ शकले आहेत. अंतिम मुदतीतील 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरले जाणे मुश्‍कील दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनासह शिक्षण संचालनालयाने अर्ज भरण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीचे सदस्य, नगरसेवक फिरोज लाला यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

ऑनलाइन प्रक्रियेत विघ्न
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी www.escholarship.mahaonline.gov.in या संकेतस्थळाचा पत्ता दिला गेला आहे. तेही संथ गतीने काम करते. राज्यातील 90 टक्के शाळांत इंटरनेटची सुविधा नाही. ग्रामीण व शहरी भागात भारनियमनाचा प्रश्‍न जटिल बनला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांना "ऑनलाइन' प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नाही. प्रयत्न झालाच, तर एक अर्ज भरण्यासाठी 40 ते 50 मिनिटांचा कालावधी लागत आहे. परिणामी, राज्यभरातून अत्यल्प संख्येनेच शिष्यवृत्ती मागणीचे अर्ज भरले गेले आहेत. मुळात 2008 पासून मंजूर झालेल्या या योजनेचा चार वर्षात कुठलाही लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. आता देऊ केला, तर अनेक "विघ्न' येत आहेत. मग अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार कसा? असा प्रश्‍न नगरसेवक लाला यांनी उपस्थित केला आहे.

विविध मागण्या, इशारा
केंद्राकडून राज्यास शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2011- 2012 मध्ये 7 लाख, तर चालू वर्षासाठी तितकीच रक्कम वितरणाचे उद्दिष्ट दिले गेले आहे. ही रक्कमही तुटपुंजीच आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत शिक्षण संचालनालय उदासीन आहे. शासन गंभीर नाही. अडचणी सोडविण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात यावी, "ऑनलाइन' अर्ज प्रणाली राबवायची असेल, तर मुख्याध्यापकांवर जबाबदारी टाकावी व प्रशिक्षण दिले जावे, अन्यथा, निमशासकीय, शासनस्तरावरील विशेष यंत्रणेव्दारे "ऑनलाइन' अर्ज भरून घ्यावेत, कुणी विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये म्हणून छापील अर्जही भरून घ्यावेत, किचकट निकष टाळावेत, ज्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती रक्कम मिळालेली नाही, त्यांना ती लवकर दिली जावी, अशी मागणीही नगरसेवक लाला यांनी केली आहे. अशीच मागणी निजामपूरचे उपसरपंच तथा अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष ताहीर मिर्झा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रतिक्रिया
On 24/01/2013 12:52 PM momin atwan imtiyaz ahmed said:
english
On 04/10/2012 05:22 PM devanand said:
हो
On 30/08/2012 10:16 PM SIKANDAR NADAF said:
yojana changali aahe parantu pratyek starawar tyachi karyavahi manapasun hone awashyak aahe. website chalu nasane,nit na chalane yamule form bharale jaat nahit.tyamule ya yojane baddal lok sashank aahet.
On 24/08/2012 09:05 AM Vishwajeet patil said:
अहो मी दोन वर्ष पासून अर्ज भारत आहे. पण मला अद्याप शिष्यवृत्ती रक्कम मिळालेली नाही .आणि वरून या वर्षाचे अर्ज भरून मिडेल कि नाही याची चिंता आहे .
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: