Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

संगीत पार्टी केल्याबद्दल 17 जणांचा शिरच्छेद
- वृत्तसंस्था
Monday, August 27, 2012 AT 05:01 PM (IST)
Tags: afghanistan,  terrorist,  party
कंदहार- संगीत लावून पार्टी केल्याच्या "गुन्ह्या'बद्दल तालिबानच्या दहशतवाद्यांनी दोन महिलांसह 17 जणांचा शिरच्छेद केल्याची घटना दक्षिण अफगाणिस्तानात घडली. अधिकृत गोटातूनही या घटनेला दुजोरा देण्यात आला आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट असताना गुन्ह्यांबद्दल जाहीर शिरच्छेदाची शिक्षा देण्याच्या घटना घडल्या होत्या. नुकत्याच झालेल्या या प्रकारामुळे ही शिक्षा अद्याप दिली जात असल्याचे उघड झाले. "शिरच्छेदाचे हे कृत्य तालिबानने केल्याची खात्री मला वाटते,' असे हेलमंड प्रांताचे राज्यपाल दाऊद अहमदी यांनी वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बोलताना स्पष्ट केले. तालिबानच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील एका गावात संगीत लावून पार्टी करणाऱ्या 17 जणांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यात दोन महिला आणि 15 पुरुषांचा समावेश असल्याची माहिती अहमदी यांनी दिली.

कजाकी आणि मुसा कला या जिल्ह्यांदरम्यान असलेल्या जमींदवार या गावातील गावकऱ्यांनी ही पार्टी आयोजित केली होती. या प्रदेशात तालिबानचे वर्चस्व आहे. पार्टीत दोन महिलांनी नृत्य केल्याची माहिती मिळाल्याचे मुसा कला जिल्ह्याचे प्रमुख नेमतुल्ला खान यांनी दिली. दक्षिण अफगाणिस्तानात वावरणाऱ्या भटक्‍या समाजात अशा पार्ट्या गुप्तपणे केल्या जातात आणि त्यात महिलांचे नृत्य असते. अफगाणिस्तानात अशा पार्ट्यांना परवानगी नाही. विद्यमान अध्यक्ष हमीद करझाई यांनीही या पार्ट्यांवर बंदी घातली आहे.

अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तालिबानच्या दहशतवाद्यांनी अनेक गावकऱ्यांचा यापूर्वी शिरच्छेद केल्याचा आरोप केला जातो.
प्रतिक्रिया
On 28/08/2012 02:33 AM desi said:
धर्माच्या नावाखाली तालिबान ने आफ्घानिस्तान ची वाट लावली, अमेरिकेने तेंव्हा त्यांना मदत केली, नंतर जेंव्हा स्वतः ची चड्डी पेटली तेंव्हा अमेरिकेला अक्कल आली... आता त्यांचे सैन्य हि अफगाणिस्तान मध्ये तुटपुंजे आहे. तेंवा अफगाण लष्करालाच या तालिबान ला निपटावे लागणार आहे ; इतके वर्ष ह्या तालिबानी जुलमी राजवटीचा कब्जा अफगाणिस्तान वर होता तो इतका सहजी जाणार नाही. नाचगाणे हा फारच जुजबी मामला आहे; महत्वाचे आहे ती बाब म्हणजे तालिबान अजूनही जिवंत आहे!!!
On 28/08/2012 02:16 AM Naser Shaikh said:
Mr. Prashant you are stupid why you are blaming marathwad we are proud that we are from this backward area(as per your concept),if Mr Nandu is talking about society & for the benefit of people if we implement some strict law so what is wrong with you but you dont know this thing because in USA we know what peoples are doing & there life style.
On 28/08/2012 12:21 AM Sagar V said:
प्रशांत, मला माहीत नाही तू कुटल्या जगाचा आहेस पण एवढ नक्की कि तू अशिक्षित आहेस कारण थोडी अक्कल असती तर तू एका नंदू मुळे संपूर्ण मराठवाडा अशिक्षित ठरवला नसता. विषय तालिबान च्या कृत्याचा आहे आणि हि मानसिकता जगातल्या प्रत्येक भागात दिसते अगदी तुम्ही ज्या देशाला सर्व पायिक समजत त्ये अमेरिकेत सुधा
On 27/08/2012 11:30 PM prakash-usa said:
नंदू नाईक यांची प्रतिक्रिया एकदम Extreme स्वरुपाची आहे. आपल्या आणि तालिबान संस्कर्तुतीत जमीन अस्मानाचा फरक आहे. संगीत आणि पार्टी मुळे भारतीय संस्कृती विकोपाला जात नाही. नाईकांनी त्याचं हा पवित्रा पैंसे खाणाऱ्या सरकारवर उचलावा.
On 27/08/2012 11:16 PM Pramod said:
Thank god, Atleast I am not Afgani,paki or sudani. किमान आपल्या देशात एवढे वाईट लोक नाहीत. खरच आभारी आहे, देवा.
On 27/08/2012 11:12 PM prashant said:
वाटलंच...हा इसम (नंदू...) मराठवाड्याचा असणार! भारतात सर्वात मागासलेला प्रभाग म्हणजे मराठवाडा होय. महत्वाचे म्हणजे बरीच मंडळी उच्चशिक्षित असताना हा विपर्यास मराठवाड्यात नेहमी पाहण्यास मिळतो, असो. तालिबानचा कचरा साफ केल्याशिवाय अश्या बातम्या बंद होणार नाहीत. ह्यास मुख्यत्वे अमेरिकाच जबाबदार आहे (गेल्या शीत-युद्धा पासून अमेरिका अशा लोकांना जन्माला घालते).
On 27/08/2012 10:51 PM Nikhil said:
असा कायदा भारतात हवा.नंदू naik तुमची प्रतिक्रिया योग्य आहे.
On 27/08/2012 10:45 PM Ashish (aasheesh4you@yahoo.com) said:
होय, भारतीय संस्कृती विसरलोय आपण. पण ती मुघलांच्या आक्रमणानंतर. त्यांची संस्कृती (जी असल्या बातम्यांमधून दिसून येते) हि आपण आपलीच म्हणून समजून बसलो आहोत. आज जी आपल्या समाजात स्त्री पुरुष विषमता दिसून येते तिची बीजे ह्या संस्कृतीच्या मानसिकतेत आहेत हे सत्य नाकारता येणर नाही (मध्यपूर्वेतल्या देशांत पुरुषांची संख्या स्त्रियांच्या दुपटीच्या जवळपास आहे). खरी भारतीय संस्कृती जिच्यात स्त्री-पुरुष समानतेची बीजे आहेत त्यासाठी राजवाडे यांचे "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" पुस्तक वाचा. नेटवर पण उपलब्ध आहे.
On 27/08/2012 10:40 PM नंदु नाईक पाथरी जि. परभणी said:
नृत्याचा उगम भारतात झाला पण त्या नृत्याचा असा नंगा नाच नव्हता हे डांसबार हे नृत्य का रेव्ह पार्टी यांना नृत्याचा अर्थ काय होतो ते माहीत आहे का ? यांना फक्त माहित आहे ते फक्त बॉय फ्रेँड आणि गर्ल फ्रेँड तंगडे हालवले कि झालं नृत्य ? खरे नृत्य करणारे डांस बार किँवा रेव्ह पार्टीत नृत्य सादर करत नाहीत . आणि भारतीय संस्कृतीमध्ये मानव हत्या नाही मग हे दंगे , बॉम्बस्फोट , भृन हत्या हे कोणत्या संस्कृतीमध्ये आहे ? हत्या करणारा बिर्याणी खातो , जो निरापराध आहे तो आत्महत्या करतो याला काय म्हणायचं ! समोरुन आतं
On 27/08/2012 10:04 PM charu kawade said:
आताची भारतीय संस्कृती मुळची भारतीय नाही , पूर्वी रामायणात आणि कृष्ण पुराणात पुरुष आणि महिलांनी सुद्धा जीवनाचा आनंद आणि उपभोग बरोबरच घेतला. त्यावेळेस महिलांना डोक्यावर पदर घेत न्हवते. शिवाजी राजांचे वडिलांनी सुद्धा मुसलमानान साठी काम केले होते त्यामुळे आपल्या संस्कृतीवर खूप फरक झाला आहे !!
On 27/08/2012 09:32 PM Vinit said:
प्रती नंदू नाईक.. तुमची प्रतिक्रिया लहान मुला सारखी आहे.. गुन्हा आणि शिक्षा ह्यात काही तारतम्य बाळगायला हवा...
On 27/08/2012 09:07 PM DHANANJAY DAMLE said:
नंदू नाईक जी अहो जग कुठे चाललंय आणि हे काय विचार मांडता तुम्ही? काय फरक पडणार आहे स्त्री आणि पुरुष एकत्र आले किवा पार्टी केली तर लगेच व्यभिचार सुरु होणार आहे का? मला नाही तस वाटत कारण जो पर्यंत प्रत्येक मानवाची सदसदविवेक बुद्धी जागृत आहे तो पर्यंत कोणतीही अनुचित घटना बिशाद घडेल!! पण जर हाच माणूस जंगली जनावराच्या पातळीला गेला तर तो स्त्री हि केवळ मादी म्हणूनच पाहिलं मग ती तरुण अथवा म्हातारी असो. कायदा कडक असावा पण स्वातंत्र्य पण पाहिजेच ना?
On 27/08/2012 08:47 PM rajesh pawar said:
नंदुभाऊ जर कळत नसेल तर अक्कल नका पाजळू. जरा भारतीय इतिहास वाचा, नृत्यकलेचा उगम भारतातून झाला. कायहो भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याहत्या कुठे आहे? तालिबान अघोरी नाग आहेत, त्यांना ठेच्ल्याशिवाय आपल्या अफगाण भगिनींचा विकास शक्य नाही.
On 27/08/2012 06:50 PM नंदु नाईक, पाथरी जि. परभणी said:
अशा कायद्याची भारताला खुप गरज आहे. सध्या भारतात तरुण तरुणीं भारतीय संस्क्रती विसरलेत त्या मुळेच या कडक कायद्याची गरज आहे शेवटी लातो के भुत बातो से नही मानते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: