Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दहा दिवसांत
-
Saturday, September 22, 2012 AT 04:00 AM (IST)

पुणे - विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, वैध दावे असलेल्या विद्यार्थ्यांना दहा दिवसांत "जात वैधता प्रमाणपत्र' देण्यात येईल. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे दिल्या.

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केलेल्या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील अर्जदारांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून www.ambedkaracademy.ac.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्डाच्या खाली "कास्ट व्हेरिफिकेशन केसेस डिसायडेड' या लिंकवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना त्यांच्या प्रकरणाच्या सद्यःस्थितीबाबत माहिती मिळणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र घरपोच दिले जाणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केल्यास अथवा शिक्षण शुल्क वसूल केल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोघे यांनी दिला.

शिष्यवृत्ती एकरकमी देणार
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे वर्षभराची शिष्यवृत्ती पुढील महिन्यात एकरकमी स्वरूपात देण्यात येणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 1200 कोटींचा निधी लागणार आहे. परंतु, गतवर्षी 623 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. ओबीसी विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे सध्या तातडीने चारशे कोटी आणि ऑक्‍टोबर महिन्यात चारशे कोटी रुपये, असा एकूण आठशे कोटींचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे मोघे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 23/09/2012 10:58 AM kailash gadekar said:
शिष्य्वर्त्तीची तारीख वाढवा


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: