Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

ई-पेपर

-
Wednesday, December 05, 2012 AT 12:30 AM (IST)
आजच्या धकाधकीच्या जगात निवांत असा एकही क्षण मिळाला तर शप्पथ. होमवर्क, असाइनमेंट, फिटनेस, विविध कार्यक्रम, ट्रॅफिक, मोठमोठ्या रांगा, ही लिस्ट संपायची नाही. त्यातच रोजचं वृत्तपत्र वाचायला वेळ मिळणंही अवघडच होतं. वृत्तपत्र वाचलं नाही, तर कसं होणार? आपल्या आजूबाजूला म्हणजे देश-विदेशात काय घडतंय, ते कळणार नाही. ते कळालं नाही, की माहिती कमी मिळणार आणि आपण अपडेट नसणार. रोजचं वृत्तपत्र हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी वृत्तपत्र नुसतं पाहिलं, तरी चालतं. सांगायचा मुद्दा एवढाच, की प्रत्येकानं रोज वृत्तपत्र वाचण्याची आवड जपायला हवी. वृत्तपत्र वाचणं आजच्या जगात अनिवार्य आहे. प्रत्यक्ष वृत्तपत्र वाचायला वेळ, चान्स वगैरे मिळत नसेल; तर डोंट वरी, ई-पेपर आहे ना. म्हणजे इंटरनेटवर अगदी जसंच्या तसं वृत्तपत्र. मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब इत्यादींवर या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. म्हणून ई-पेपर वाचून आपल्याला जगाची माहिती घेता येते आणि अपडेटही राहता येतं. बरं, आता मुद्‌द्‌यालाच हात घालूया. इंटरनेटवर जवळपास सगळ्याच स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे ई-पेपर उपलब्ध आहेत. आपल्या दैनिक "सकाळ'चीही ई-आवृत्ती "ई सकाळ डॉट कॉम'वर उपलब्ध आहे.

- पीयूष भुसारी
-------------------------------------------------------
चुरमुऱ्यांचा उपमा
साहित्य ः चार वाट्या चुरमुरे, एक चमचा शेंगदाणे, एक कांदा, एक मिरची, कढीपत्ता, लिंबू, ओले खोबरे, अर्धा चमचा मीठ, साखर, दोन चमचे तेल, मोहरी, हळद, हिंग
कृती ः प्रथम चुरमुरे पाण्यात भिजवून लगेच चाळणीत निथळत ठेवावे. गॅसवर कढई ठेवून त्यात दोन चमचे तेल घालावे. तेल तापल्यावर मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून त्यात कच्ची मिरची आणि शेंगदाणे घालून परतावे. त्यात भिजवलेले चुरमुरे घालून एक वाफ आणावी. खोबरे, कोथिंबीर व लिंबाचा रस घालावा. वरून शेव घालावी.
- अथर्व चिरपुटकर
-------------------------------------------------------
हेअरपिन्स फॉर क्‍यूट गर्ल्स
तुम्ही सगळ्यांनी छान छान ड्रेस घातला आणि त्यावर शोभतील अशा ऍक्‍सेसरीज नाही घातल्या तर... तुम्हाला पाहिजे तसा लुक येणार नाही ना? तुमच्या "क्‍यूट' लुकमध्ये भर घालण्यासाठी ड्रेसवर मॅचिंग ऍक्‍सेसरीज हव्यातच ना... आता तुम्ही म्हणाल, कानातले मॅचिंग असले की झाले. पण अशीच एक गोष्ट आहे, जी तुम्ही ड्रेसला मॅचिंग घेऊ शकता. त्या आहेत हेअरपिन्स. त्यामध्ये तुम्हाला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. साध्या रंगीबेरंगी क्‍लिप्स, त्यावर तुम्हाला अतिशय आवडणाऱ्या आइस्क्रीमपासून फुलं, कार्टूनपर्यंत पाहिजे त्याची डिझाइन आणि रंग, त्याचबरोबर टिक-टॅक पिन्स आहेतच. त्या काळ्या रंगात, वेगवेगळ्या खड्यांच्या किंवा मोत्यांच्या डिझाइनमध्येही उपलब्ध आहेत. त्याशिवाय कलरफुल पिन्स हव्या असतील तर भरपूर ऑप्शन्स आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: