Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

शेअर निर्देशांक स्थिर

- वृत्तसंस्था
Friday, January 11, 2013 AT 02:00 AM (IST)
Tags: share market,   mumbai,   share,   investment,  
मुंबई - इन्फोसिसचे तिसऱ्या तिमाहीतील निकाल आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) उद्या जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी आजही सावध पवित्रा घेतला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक केवळ 3.04 अंशांनी घसरून 19,663.55 अंशांवर बंद झाला.

सरकारने काल रेल्वेचे प्रवासभाडे वाढवल्याने आता लवकरच इतर इंधनांचे दरही वाढवले जातील, या आशेमुळे निर्देशांकाने आज दिवसभरात 19,783.75 अंशांचा उच्चांक गाठला होता. मात्र, नंतर विक्रीचे प्रमाण वाढले. ""रेल्वेचे भाडे वाढवण्याचा निर्णय गुंतवणूकदारांना फारसा आकर्षित करू शकला नाही. तिमाही निकाल-विशेषतः इन्फोसिसच्या निकालांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे,'' असे आयआयएफएलच्या संशोधन विभागाचे प्रमुख अमर अंबानी यांनी सांगितले. आज ओएनजीसी, एचडीएफसी बॅंक, टाटा मोटर्स, आयटीसी यांचे शेअर वधारले, मात्र टीसीएस, एचडीएफसी, भेल आणि भारती एअरटेल यांचे शेअर घसरले.

आयआयपीचे आकडे रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदरकपातीच्या निर्णयात महत्त्वाचे ठरणार असल्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज मोठ्या शेअरची विक्री झाली, पण मध्यम कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली, त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळू लागला असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 2.85 अंशांनी घसरून 5,968.65 अंशांवर बंद झाला. आज ऊर्जा, धातू, कॅपिटल गुड्‌स इत्यादी क्षेत्रांतील शेअर घसरले, तर बॅंका, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर वधारले.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: