Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

महिलांच्या समस्या समजल्या अन्‌ त्या सोडविण्यासाठी प्रेरणाही

-
Friday, February 01, 2013 AT 04:45 AM (IST)

पुणे - गावागावांत, वाड्या-वस्त्यांत महिलांना किती समस्या असतात? एकमेंकीशी बोलल्यावर आम्हाला सगळ्यांच्या समस्या कळल्या. त्यावर उपायही सुचले आणि आपणही त्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे याची प्रेरणा मिळाली. आम्हालाही मनमोकळेपणे, सगळ्यांसमोर बोलण्याची संधी मिळाली...

'साम वाहिनी'च्या स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या उद्‌घाटन समारंभात "सकाळ'च्या पुण्यातील कार्यालयातून सहभागी झालेल्या महिला ??????????लोकप्रतिनिधींच्या??????????? या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

जिल्ह्यातील मंचर, पुरंदर, बारामती अशा विविध ठिकाणांहून आलेल्या या महिला मुंबईला झालेल्या मुख्य कार्यक्रमात दृक्‌श्राव्य माध्यमाद्वारे सहभागी झाल्या. त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, नागपूर, जळगाव, औरंगाबाद येथील "सकाळ'च्या कार्यालयांत बसलेल्या महिला लोकप्रतिनिधींना ऐकण्याची संधीही या महिलांना मिळाली.

समस्या सोडविण्यासाठी सरकार, समाज, नागरिकांनी काय केले पाहिजे, हे चर्चेतून कळत गेले. विचारांची देवाण-घेवाण झाली. महिला एकत्र आल्यावर काय करू शकतात, याचा अंदाज आला, असे वसुधा आनंदे, प्रतिभा रणपिसे, ज्योती गायकवाड व संगीता भालेराव यांनी सांगितले.

महिलांच्या विविध प्रश्‍नांविषयी अशीच चर्चा व्हायला पाहिजे. त्यामुळे समस्यांवर तोडगाही शोधता येईल. आमच्या गावातही आम्ही अशा सभा घेऊ, असे वर्षा मखरे, सारिका तांबे, संगीता धुमाळ व सुनंदा नवले म्हणाल्या.

भारती शेवाळे म्हणाल्या, 'सध्या मुली-महिलांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्‍न आहे. त्यासाठी मुलींना लहानपणापासून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. "अमुक करू नकोस, तमुक करू नकोस...' हे मुलींना सांगण्यापेक्षा मुलांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावात प्रबोधन झाले पाहिजे.''

महिला सक्षमीकरणासाठी स्त्री प्रतिष्ठा अभियान हा उपक्रम खूप महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगून सविता गुळवे म्हणाल्या, ""ग्रामीण भागातील महिलांपुढे अनेक प्रश्‍न आहेत. त्यामध्ये आरोग्य आणि सुरक्षेच्या समस्या प्रामुख्याने जाणवतात. लहान मुलींपासून ते वयस्कर महिलांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे.''

अश्‍विनी शेटे म्हणाल्या, 'आम्हाला समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांना अडचणी व्यक्त करता येत नसल्याची खंत वाटते. कुठे तरी पुरुषी मानसिकता आड येते. पुरुषांची हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. आम्ही बचत गटांमार्फत गावामध्ये अनेक उपक्रम राबवीत आहोत. आता महिलांसाठी अनेक उपक्रम राबविता येतील याचा आनंद वाटतो.''

मुख्यमंत्र्यांशी बोलणे स्वप्नवत
मुख्यमंत्र्यांशी बोलायला मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण आज "सकाळ'ने ती संधी दिल्याने खूप आनंद झाला, ही भावना व्यक्त केली नजमा इनामदार यांनी. त्या म्हणाल्या, 'मी अनेक कार्यक्रमांना जाते. अगदी दिल्लीलाही जाऊन आले आहे. पण आतापर्यंत कधीच मुख्यमंत्र्यांशी बोलले नव्हते. आमच्या समाजातील मुलींना शिक्षण का मिळत नाही, हा प्रश्‍न माझ्या मनात अनेक वर्षे घर करून होता. आज तोच प्रश्‍न मी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यांच्याशी बोलायला मिळाल्याने माझा आत्मविश्‍वासही वाढला.''
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: