Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

"शिक्षण सेवक योजनेतून अंध शिक्षकांना वगळा'

- सकाळ वृत्तसेवा
Monday, March 04, 2013 AT 12:15 AM (IST)
मुंबई - शिक्षण सेवक योजनेत अंध शिक्षकांनाही सुरुवातीची तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून अल्प मानधनावर काम करावे लागते. या योजनेतून किमान अंध शिक्षकांना वगळावे, अशी मागणी आमदार रामनाथ मोते यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

राज्य सरकारने अंध आणि अपंगांना मदत करण्याची भूमिका स्वीकारली असून त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना आणि सवलती लागू केल्या आहेत. शिक्षण विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यातील सर्व अनुदानित शाळांमध्ये अंध शिक्षकांनाही सुरुवातीची तीन वर्षे अल्प मानधनावर काम करावे लागते. अपंगत्वावर जिद्दीने मात करत हे अपंग शिक्षक सेवा देत आहेत. अपंगांसाठीच्या आरक्षणातून अनेक संस्था शिक्षकांना नोकरी देतात. पण या तीन वर्षांच्या अटीमुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणे या शिक्षकांना कठीण जाते. म्हणून अंध शिक्षकांना शिक्षण सेवक योजनेतून वगळून नियमित वेतनश्रेणी द्यावी, असे मोते यांनी निवेदनात म्हटले आहे.
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: