Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


अर्थविश्व
नवी दिल्ली  -  देशाच्या अर्थव्यवस्थेची संमिश्र वाटचाल सुरू असतानाच वाहनविक्रीने वाहन उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्‍चरर्स अर्थात सियाम या संघटनेने प्रसिद्ध केलेल्या जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार या महिन्यात वाहनविक्रीत 7.2 टक्के वाढ दिसून आली आहे. जानेवारी महिन्यातील ही वाढ सलग तिसऱ्या महिन्यातील वाढ आहे. 2011 हे मागील वर्ष संपताना वाहनविक्रीत मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली होती.

Thursday, February 09, 2012 AT 03:00 AM (IST)

मुंबई -  रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिससारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअरची झालेली खरेदी, परदेशी वित्त संस्थांकडून येत असलेला निधी आणि परदेशी बाजारपेठेतून मिळालेली सकारात्मक दिशा यांमुळे निर्देशांकात आज वाढ झाली. मंगळवारी झालेली घट निर्देशांकाने भरून काढली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 84.87 अंशांनी वधारून 17,707.32 अंशांवर बंद झाला.

Thursday, February 09, 2012 AT 01:45 AM (IST)

मुंबई - जीएमआर इन्फ्रास्ट्रक्‍चर या पायाभूत क्षेत्रातील कंपनीने तिच्या विद्युतनिर्मिती कंपनी जीएमआर एनर्जीसाठी प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) करण्याचे ठरवले आहे. मात्र, हा आयपीओ बाजार अनुकूल झाल्यानंतरच दाखल करण्यात येईल, असे जीएमआर समूहाचे मुख्य वित्तअधिकारी सुब्बराव अमृतलुरू यांनी सांगितले आहे. याखेरीज 2012-13 या पुढील आर्थिक वर्षासाठी कंपनीने 140 अब्ज रुपये भांडवली खर्च करायचेही ठरवले आहे.

Thursday, February 09, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई -  आयसीआयसीआय सिक्‍युरिटीजने वित्त नियोजन, पोर्टफोलिओ तयार करणे आणि इस्टेट नियोजन अशा तीन नव्या सेवा सुरू केल्या आहेत. या सेवा देशभर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सेवा सुरू करण्यापूर्वी आयसीआयसीआय सिक्‍युरिटीजने एक सर्वेक्षण केले. आपल्या वित्तविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या आपण करत असलेली गुंतवणूक पुरेशी नसल्याचे मत 36 टक्के लोकांनी नोंदवल्याचे वित्तनियोजन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिषेक माथुर यांनी सांगितले.

Thursday, February 09, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई  -  ऍक्‍सिस बॅंकेने सुरू केलेल्या ट्रॅव्हल करन्सी कार्ड योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, याची विक्री 2 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. जगभरातील प्रिपेड परकीय चलन बाजारात भारत आघाडीवर असून, त्यात ऍक्‍सिस बॅंकेच्या या ट्रॅव्हल करन्सी कार्डाच्या विक्रमी विक्रीची भर पडली आहे. ऍक्‍सिस बॅंकेचे हे कार्ड बॅंकेच्या देशभर असलेल्या 1 हजार 500 शाखांतून उपलब्ध आहे.

Thursday, February 09, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई  - देशातील इक्विटी फंडांनी सरासरी 11 टक्के उत्पन्न दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मे 2009नंतर प्रथमच इक्विटी फंडांची कामगिरी उत्साहवर्धक झाली आहे. मध्यम आणि छोट्या भांडवलासाठी या फंडांनी गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवल्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. बॅंकिंग फांडांचीही कामगिरी जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार चांगली झाली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाची पुनर्गुंतवणूक या फंडांकडून केली जाते.

Wednesday, February 08, 2012 AT 04:00 AM (IST)

नवी दिल्ली  - भारतीय विमान कंपन्यांना जागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी करू देण्यास सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला हिरवा कंदिल दिला आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव कॅबिनेटकडे पाठवला जाणार असल्याचे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री अजित सिंग यांनी सांगितले आहे. विशेष मंत्रिगटाबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Wednesday, February 08, 2012 AT 03:15 AM (IST)

नवी दिल्ली -  उत्पादन, कृषी आणि खाण क्षेत्रातील मंदीमुळे 2011-12 या वर्षात आर्थिक विकासाचा दर 6.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हाच दर 8.4 टक्के इतका होता. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (सीएसओ) याबाबतचे अनुमानपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ 2.5 टक्‍क्‍यांनी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हाच दर 7 टक्के इतका होता. उत्पादन क्षेत्रातील विकासही मंदावला असून, या वर्षी हा दर 3.9 टक्के इतका असेल.

Wednesday, February 08, 2012 AT 02:30 AM (IST)

मुंबई  - खासगी क्षेत्रातील रत्नाकर बॅंकेला परदेशी बॅंकांतील अधिकाऱ्यांनी पसंती दिली आहे. ही पसंती रत्नाकर बॅंकेत नोकरी करण्यासाठी देण्यात आली आहे. याच पसंतीमुळे सिटीबॅंकेत 22 वर्षे सेवा केलेले जोगिंदर सिंग राणा हे रत्नाकर बॅंकेचे नवे मुख्य कामकाज अधिकारी म्हणून या महिन्यात रूजू होत आहेत. जोगिंदर सिंग राणा यांच्यावर बॅंकेच्या कामकाजाची आणि प्रशासनाची मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे.

Wednesday, February 08, 2012 AT 01:30 AM (IST)

मुंबई   -  कर्जे देणारी देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक म्हणून लौकिक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लघु आणि मध्यम उद्योजकांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील सेवाशुल्क आणि हमी माफ करण्याचे ठरवले आहे. लघु आणि मध्यम उद्योजकांना क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जांसाठी सेवाशुल्क माफ केले असल्याचे बॅंकेच्या राष्ट्रीय बॅंकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ए. कृष्ण कुमार यांनी सांगितले.

Wednesday, February 08, 2012 AT 01:15 AM (IST)

पुणे -  शेअर बाजारातील गुंतवणूक हा अनेकांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय असतो. मात्र, त्या बाबत सोप्या शब्दांत माहिती मिळण्याची सोय क्वचित असते. त्यामुळे या बाजाराविषयी विविध गोष्टी स्पष्ट करणारी कार्यशाळा "सकाळ पॉझिव्ह्यू'तर्फे येत्या सोमवारी (ता. तेरा) आयोजित करण्यात आली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि सीडीएसएलच्या गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. नवी पेठेतील गांजवे चौकाजवळील एस.एम.

Wednesday, February 08, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई - परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सातत्याने खरेदी सुरू ठेवल्याने आणि आशियातील बाजारांतून चांगली दिशा मिळाल्याने शेअर निर्देशांकातील वाढ आजही सुरूच राहिली. मुंबई शेअर निर्देशांकात 102 अंशांची वाढ होऊन तो 17,707.31 अंशांवर बंद झाला. अमेरिकेतील गेल्या आठवड्यातील रोजगाराच्या आकडेवारीमुळे आशियातील शेअर बाजार आज वधारले. युरो क्षेत्रातील पेचाबाबत गुंतवणूकदार अजून धास्तावलेले असल्याने युरोपातील शेअर बाजार मात्र सुस्त होते.

Tuesday, February 07, 2012 AT 02:30 AM (IST)

नवी दिल्ली - आगामी अर्थसंकल्पात वैयक्तिक करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष करसंहितेनुसार (डीटीसी) ही वाढ अपेक्षित असून, इतर करांसाठीचे स्लॅब्जही वाढण्याची शक्‍यता आहे, असे एका सूत्राने सांगितले. सरकारच्या विविध आर्थिक मर्यादा लक्षात घेता, करांचे दर कमी होण्याची शक्‍यता नसल्याचेही या सूत्राने सांगितले. डीटीसीमधील काही मुख्य शिफारशी सरकार स्वीकारेल.

Tuesday, February 07, 2012 AT 02:00 AM (IST)

नवी दिल्ली - दिल्ली सरकारने सर्व किमतींच्या मुद्रांकांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला असून, तिथे यापुढे ई-स्टॅंपिंगचाच वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यवहार सुलभ होणार असून, गैरप्रकारांनाही चाप बसणार आहे. सध्या 501 रुपयांपुढे ई-स्टॅंपिंगचा वापर करण्यात येतो. मात्र, आता सर्वच मुद्रांकांचा वापर बंद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Tuesday, February 07, 2012 AT 01:45 AM (IST)

मुंबई - पारंपरिक विमा गटामध्ये खासगी आयुर्विमा कंपनी असलेल्या आयएनजी वैश्‍य लाइफ इन्शुरन्सने तीन नव्या पॉलिसी बाजारात दाखल केल्या आहेत. आयएनजी सिक्‍युअर्ड इन्कम इन्शुरन्स प्लॅन, आयएनजीस्टार लाइफ आणि आयएनजी क्रिटिकल इलनेस रायडर अशी नव्या पॉलिसींची नावे आहेत. आयएनजी सिक्‍युअर्ड इन्कम इन्शुरन्स प्लॅनमध्ये पॉलिसीधारक आणि त्याच्या कुटुंबीयांना विमा संरक्षण दिले जाणार आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 01:15 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: