|
|
|
|
|
|
मुंबई- दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आठ महानगरपालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत आज (बुधवार) जाहीर झाली. यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, मीरा भाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड महापालिकांचा समावेश आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज दुपारी दोन वाजता मंत्रालयात सोडतीद्वारे ही आरक्षण जाहीर केली. नाशिक, नवी मुंबईत महापौरपद खुल्या गटासाठी तर कल्याण-डोंबिवली ओबीसी महिलांसाठी तर ठाणे ओबीसीसाठी राखीव आहे.
Wednesday, February 22, 2012 AT 02:39 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - पुणे महापालिकेत आघाडी तसेच महापौर-उपमहापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत चर्चा करण्याची जबाबदारी कॉंग्रेसने सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील पुन्हा समोरासमोर येणार आहेत. पक्षाच्या नगरसेवकांशी चर्चा करून लवकरच आघाडीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
Wednesday, February 22, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - निवडणुकीनंतर महापालिकेची सूत्रे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी सत्तांतरानंतरच्या पहिल्याच वर्षी महापालिकेचा स्थायी समितीच्या अध्यक्षांचा अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार राष्ट्रवादी कॉंग्रेसला नव्हे, तर चक्क विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला मिळण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच समितीच्या मावळत्या अध्यक्षांना असे अधिकार मिळणार आहेत. समितीचे अध्यक्षपद सध्या भाजपकडे आहे.
Tuesday, February 21, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - महापालिका निवडणूक निकालानंतर विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेकीचे प्रकार सुरू झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत हडपसर, कात्रज, पाषाण, कर्वेनगर, सिंहगड रस्त्यावर वडगाव आदी ठिकाणी सात घटना घडल्या आहेत. यात सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत असून, राजकीय पक्षांनी तोंडावर बोट ठेवले आहे. अशा गुन्हेगारी घटनांतील कार्यकर्त्यांना दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
Tuesday, February 21, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - महापालिकेची स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांमध्ये बहुमत मिळविण्यासाठी सत्ताधारी पक्षाला तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल, असे प्राथमिक चित्र दिसत आहे. या समितीत प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार त्यांना प्रतिनिधित्व दिले जात असल्याने, अपक्ष आणि आरपीआयची भूमिका निर्णायक ठरू शकते. सभागृहात एकूण 152 नगरसेवक असतील, तर स्थायी समितीत 16 जणांचा समावेश असतो.
Tuesday, February 21, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - हरित विकास आराखडा, मेट्रो, जलवाहतूक यांसारख्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यातील मतभेदांमुळेच पुणे महापालिकेत आघाडी करण्याचा निर्णय जाहीर करण्यास मुहूर्त लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेत आघाडी करण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा निर्णय पक्का झाला आहे. पदवाटपाचे सूत्रही ठरले आहे परंतु मतभेदांमुळे कोणी माघार घ्यावयाची, यावरून दोन्ही कॉंग्रेसमध्ये खेचाखेची सुरू झाली आहे.
Tuesday, February 21, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सोलापूर - नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल 64 नवे कारभारी महापालिकेत येत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या नवख्या नगरसेवकांमध्येही महिलाराज असून, 64 पैकी तब्बल 40 नगरसेविकांचा समावेश आहे. उर्वरित चोवीसमध्ये तेवीस नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले असून, कॉंग्रेसचे विवेक खरटमल हे निवडणुकीद्वारे सभागृहात पहिल्यांदा प्रवेश करीत आहेत. गत टर्ममध्ये ते स्वीकृत सदस्य होते.
Tuesday, February 21, 2012 AT 12:12 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक - नाशिक महापालिकेत मनसे सत्तेत येण्यासाठी शिवसेनेच्या संमतीने भारतीय जनता पक्ष त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शहरातील निवडणूक निकालाचे विश्लेषण केल्यास 122 पैकी 86 जागांवर मनसे व शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रबळ लढत दिली आहे. सध्या जुळू पाहणारी राजकीय समीकरणे प्रत्यक्षात आल्यास कॉंग्रेसविरोधी मतविभागणीमुळे राज्यात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला डोकेदुखी ठरण्याची ठरण्याची शक्यता आहे.
Monday, February 20, 2012 AT 02:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर - लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने अधिक जागा जिंकल्या खऱ्या मात्र मतांच्या गणितात त्यांचा "परफॉर्मन्स' खूप काही चांगला नाही. आघाडी आणि युतीत फक्त पन्नास हजार मतांचे अंतर दिसते. त्याचवेळी अपक्ष साडेतीन लाखांच्या घरात आणि छोटे पक्ष लाखाच्या घरात जाऊन बसलेले दिसतात. जे लोकसभेत फारसे प्रभावी असणार नाहीत. लोकसभेची लढत थेट झाली तर भाजपच्या मतांचे प्रगतिपत्रक सहज विजयाचा दावा करू शकत नाही.
Monday, February 20, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर - महायुतीतही रिपाईंचे नेते रामदास आठवले अस्वस्थ आहेत. "दलितांची मते युतीला मिळाली. युतीची मते दलिंतांना मिळाली नाहीत. त्यामुळे अत्यल्प उमेदवार निवडून आले. रिपाईमुळे युती सत्तेत आली. हे विसरू नका. यामुळेसत्तेत वाटा अपेक्षित आहे. नाराज कराल तर...खबरदार' या शब्दात आठवले यांनी "महा'युतीकारांना पत्रकारपरिषदेतून सूचक इशारा दिला. श्री. आठवले म्हणाले, भिमशक्ती शिवशक्ती एकत्रित आल्याने मुंबईत महायुती सत्तेत आली. मात्र, दलितांचा वाटा कमी झाला.
Monday, February 20, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर - झेडपी आणि महापालिका निवडणुकांमध्ये पैशाचाच बोलबाला राहिला. स्पर्धेत आम्ही कुठेही टिकू शकलो नाही. त्यामुळे आजकाल निवडणुका जिंकायच्या तर भरपूर पैसाच हवा, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. कॉंग्रेससोबत आघाडी करणाऱ्या भारिप बहुजन महासंघाला कुठेही यश मिळाले नाही. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढल्यामुळे महासंघाला काही जागा तेवढ्या मिळविता आल्या.
Monday, February 20, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - नाशिक येथे मनसेचा महापौर बसणार हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या साथीला अपक्षांची साथ मिळाल्यावर खेडची नगरपालिका काबीज केल्यावर मनसेचा झेंडा फडकाविणारी पहिली महापालिका नाशिक ठरणार. मनसे राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाणार की भाजपबरोबर याबद्दल चर्चा रंगली होती. पण पुढील राजकारणाच्या वाटचालीसाठी मनसे भाजपसोबतच राहण्याची अधिक शक्यता आहे. नाशिकमधील भाजपला स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांना आपली ताकद दाखविण्याची संधी हवी होती.
Monday, February 20, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबरोबर आघाडी करूनही प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर लक्षणीय जागा कमी झाल्याने पक्षाच्या पदरी निराशाच पडली आहे. मुंबईतील कॉंग्रेस पक्षाच्या पराभवास कॉंग्रेस पक्षच जबाबदार असून या पराभवातून कॉंग्रेसचे नेते काही बोध घेणार का, असा सवाल मुंबई कॉंग्रेस पक्षाचे व्यथित कार्यकर्ते आता करीत आहेत.
Monday, February 20, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर "महापौर'पदासाठी लॉबिंग करणाऱ्या उमेदवारांना 22 फेब्रुवारीपर्यंत धीर धरावा लागणार आहे. यापूर्वी 33 टक्के महिला आरक्षणानुसार महापौरपदाचे आरक्षण जाहीर होत होते मात्र आता 50 टक्के महिला आरक्षणानुसार "आरक्षण' जाहीर होणार आहे. निवडणूक झालेल्या दहा महापालिकांमध्ये महापौर होण्याच्याच इच्छेने निवडून आलेल्या अनेक "संभाव्य' महापौरांचा या नव्या सोडतीनंतर अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.
Monday, February 20, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ठाणे - शिवसेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे ठाण्यात नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. बहुजन समाज पक्षाचे दोन नगरसेवक शिवसेनेने पळवून नेल्याची तक्रार बसपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक "मिसिंग' असल्याची नोंद केली आहे. दरम्यान, नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, युतीचे संख्याबळ 64 पर्यंत पोचले.
Monday, February 20, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|