नवी दिल्ली -  भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज (गुरुवार) 'युवा' नावाचा आपला नवा इंटरनेट टीव्ही चॅनेल सुरु केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज पक्षाच्या मुख्यालयात या चॅनेलचे उदघाटन केले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, की या चॅनेलच्या माध्यमातून पक्षातील लोकांना स्वतःला सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. कोणताही व्यक्ती किंवा नेतृत्व दोष असलेले असूच शकत नाही.
पोर्ट ब्लेअर - जारवा जमातीच्या महिलांना नृत्य करायला लावण्याचा प्रकार पाहणाऱ्या पोलिसाला आज निलंबित करण्यात आले आहे. दक्षिण आंदमानचे पोलिस अधीक्षक एस. बी. एस. त्यागी यांनी सांगितले, ""संबंधित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलिसाचे नाव पी. सी. क्लॅटन आहे. तो हवालदार आहे. तो निकोबारी आदिवासी जमातीचा आहे. जारवांना नृत्य करायला लावले त्या वेळी तो सर्व प्रकार तेथे बसून पाहत होता असे निदर्शनास आले होते.
जोधपूर - भंवरी देवी हिच्या खून प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज कॉंग्रेसचे विद्यमान खासदार बद्री जाखड यांची चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तासभर ही चौकशी झाली.
नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा घेण्यासाठी मागितलेली परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 16 एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती.
श्रीनगर - बॉलिवुडमधील सुपरस्टार आमिर खानने भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह कॅन्सरच्या आजारातून लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच त्याने पुन्हा एकदा मैदानात उतरावे, असेही आमिरने म्हटले आहे. श्रीनगर येथे सुटीसाठी गेलेला आमिर म्हणाला, ''युवराज एक चांगला योद्धा आहे. युवराजने लवकर बरे व्हावे, यासाठी माझ्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत. तो लवकर मैदानात परतेल.
नवी दिल्ली - गुलमर्ग सोसायटी प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता असल्याने, भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आणण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले, ''मोदी हे २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधानपदाचे एक दावेदार असतील. गुजरात दंगल प्रकरणातून मोदी यांना क्लीन चिट मिळाली, तर तेच या पदाचे उमेदवार असतील.
चेन्नई - सेंट मेरी अँग्लो इंडियन स्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांने आज (गुरुवार) शिस्तप्रिय शिक्षिकेचा वर्गातच खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरी या शिक्षिकेचा खून झाला आहे. अतिशय शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून त्या शाळेत प्रसिद्ध होत्या. त्या हिंदी हा विषय शिकवायच्या. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचा राग आल्याने नववीच्या विद्यार्थ्याने त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुणे - महाराष्ट्राच्या पश्चिम भागासह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने पुनरागमन केले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, जळगाव आदी शहरांमधील किमान तापमान जवळपास नीचांकी पातळीवर पोहोचले असून दिल्लीत काल (बुधवार) रात्री गेल्या पाच वर्षांतील सर्वांत कमी तापमान नोंदविण्यात आले आहे. मुंबईत अतिथंड वाऱ्याने थैमान घातले आहे. काल रात्री मुंबईतील किमान तापमान 8.8 सेल्सिअस होते. पिंपरी-चिंचवडमध्ये चालू मोसमातील सर्वांत कमी तापमान नोंदविण्यात आले आहे.
अहमदाबाद -  लोकायुक्तांच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी बसलेल्या तडाख्यानंतर गुजरातमधील नरेंद्र मोदी सरकारला न्यायालयाचा आणखी एक दणका आज बसला. गुजरातमध्ये 2002 मध्ये उद्भवलेली गोध्रा दंगल हाताळण्यात मोदी सरकारने निष्क्रियता दाखवली व दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच नंतर गुजरातमध्ये अराजक माजले, असे ताशेरे गुजरात उच्च न्यायालयाने ओढले आहेत.
बंगळूर -  विधानसभेचे कामकाज सुरू असतानाच सभागृहात "ब्ल्यू फिल्म' बघणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या तिघा मंत्र्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी त्यांचे राजीनामे राज्यपालांकडे पाठविले होते. ते स्वीकारण्यात आले आहेत. सहकारमंत्री लक्ष्मण सवदी, महिला व बालकल्याणमंत्री सी. सी. पाटील आणि मंगळूरचे पालकमंत्री कृष्णा पालेमर हे तिघे विधानसभेचे कामकाज सुरू असताना मोबाईलवर "ब्ल्यू फिल्म' बघत असताना उघड झाले होते.
नवी दिल्ली - भर विधानसभेत अश्लील वेबसाईट पाहून भारतीय जनता पक्षाचा "खरा चेहरा' जगासमोर आणणाऱ्या कर्नाटकातील तीन भाजप मंत्र्यांच्या या "काम'काजाचा धसका व धक्का थेट दिल्लीतील संसद भवनापर्यंत बसला आहे. संसदेला "पेपरलेस' करण्यासाठी खासदारांना आयपॅड देण्याची टूम काढणाऱ्या संसद सचिवालयातील यंत्रणा आता चांगलीच धास्तावली आहे. आयपॅड देण्याच्या योजनेचाही फेरविचार होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली - गुजरात उच्च न्यायालयाने 2002 मधील दंगलींच्या वेळी नरेंद्र मोदी सरकार निष्क्रिय राहिल्याचा ठपका ठेवल्यानंतर कॉंग्रेसनेही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या विकासासंदर्भातील जाहिरातीच्या मुद्द्यावर मोदीस्तुतीच्या कथित आरोपांमुळे कॉंग्रेसची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसने मोदींवर टीकेची संधी साधली.
अहमदाबाद - गुजरात भेटीसाठी इच्छुक असलेल्या चीनच्या उद्योजकांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून हे शिष्टमंडळ येत्या मार्चमध्ये गुजरात भेटीवर येण्याच्या तयारीत होते. मुंबईस्थित उद्योजक श्यामसुंदर अग्रवाल आणि दीपक रहेजा यांना नुकतीच चीनमध्ये अटक करण्यात आली होती. व्यापारातील बिले अदा करण्याच्या वादातून ही कारवाई झाली होती. त्यांना चीन सोडण्यासही मनाई करण्यात आली होती.
अलाहाबाद - "जातीयवादाच्या पलीकडे जाऊन उत्तर प्रदेशाचा विकास करण्याचे कॉंग्रेसचे स्वप्न आहे. ते साकारण्यासाठी एकदा तरी आम्हाला संधी द्या. कॉंग्रेसवर प्रेम करून पाहा,' असे भावनिक आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज येथे केले. त्रिवेणी संगमाजवळील मैदानात त्यांनी विशाल सभा घेतली.   इंदिरा गांधी आणि बहुगुणा यांच्या काळातील उत्तर प्रदेश लयाला गेला आहे.
नवी दिल्ली - महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (पीडीएस) आमूलाग्र बदल होण्याची गरज येथे अन्न आणि कृषिमंत्र्यांच्या परिषदेत व्यक्त करण्यात आली. "पीडीएस'मधील त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होऊ शकणार नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.