|
|
|
|
|
|
बटाटा व भात खाण्याने कुठलाही त्रास होत नाही. त्यात असलेली साखर मधुमेही व्यक्तींना नडते असे म्हणतात पण साखर नाही असा पदार्थ जगात नसतो आणि असला तरी तो कोणी खात नाही, खाल्ला तरी शरीर तो स्वीकारत नाही. पदार्थात असलेली शर्करा तो पदार्थ पचविण्यासाठी अग्नी म्हणून उपयोगाला येते. त्यामुळे बटाटा व भात खाल्ला तर साखर वाढेल, हे चुकीचे विधान केल्यासारखे होईल.
Friday, February 03, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आरोग्याचे प्रश्न सतत विचारले जातात. प्रश्न विचारण्याबरोबरच प्रश्नाचे उत्तर नीट समजून घेतले पाहिजे व ते स्वीकारण्याची तयारी पाहिजे. तसेच उत्तरात जे मार्गदर्शन केले आहे त्याप्रमाणे आपल्या दिनचर्येत बदल करण्याची गरज आहे व उपचाराची दिशा ठरवली पाहिजे बाळंतपणामध्ये काळजी न घेतल्याने वजन वाढणे, पोट वाढणे, सर्व अंग दुखणे, अंग गरम होणे, केस गळणे असा सध्या तब्येतीचा खूप त्रास होत आहे.
Friday, February 03, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सर्दी झाली, की नाक चोंदून श्वासोच्छ्वासाला होणारा त्रास अनुभवलेला असतो पण नाक केवळ सर्दीमुळेच चोंदत नाही त्याला इतरही कारणे असू शकतात. आपले नाक चोंदले आहे, याची जाणीव नाकातून वाहणाऱ्या हवेला अडथळा येऊ लागला की होते. असा अडथळा होण्याची अनेक कारणे असू शकतात.
Friday, February 03, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उदावर्त, म्हणजे वायूच्या नेहमीच्या गतीत बदल झाल्याने होणाऱ्या त्रासांची माहिती आपण करून घेतो आहोत. मल, मूत्र, भूक, झोप, यांसारखे नैसर्गिक वेग अडवून ठेवल्यामुळे उदावर्त होतो. त्याचप्रमाणे वातदोषाला बिघडविणाऱ्या पदार्थांच्या सेवनानेसुद्धा उदावर्त रोग होऊ शकतो. वायुः कोष्ठानुगो रुक्षैः कषायकटुतिक्तकैः। भोजनैः कुपितः सद्य उदावर्तं करोति हि।।...
Friday, February 03, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सल्ला ऐकला डोक्यातून येणारं रक्त थांबवत डॉक्टरांनी बंटाला विचारलं, ""डोक्याला जखम कशी झाली?'' बंटा उत्तरला, ""मी बुक्की मारून दगड फोडत होतो. कुणीतरी म्हणालं, की कधीतरी डोक्याचा वापर कर.'' अस्वस्थ क्षण डॉक्टर - बरं, आता मला सांगा, की तुम्हाला सगळ्यात जास्त अस्वस्थ कधी वाटतं? रुग्ण - हं... त्या वेळीच... जेव्हा आपल्या बिलाचे पैसे भरण्याची वेळ येते.
Friday, February 03, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझे वय 36 वर्षे असून माझे लग्न सात वर्षांपूर्वी झाले. बरेच उपचार घेऊनही मूल नाही. हार्मोन्सच्या तपासणीमध्ये बीजकोषाचे काम व्यवस्थित होत नसल्याचे समजले. आता मला टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला दिला आहे, पण याचा उपयोग होईल का? यावर आयुर्वेदिक उपचार असतात का?. ....सौ. सुनीता जयस्वाल उत्तर - यावर आयुर्वेदिक उपचार असतात.
Friday, February 03, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भूय एव तपसा ब्रह्मचर्येणश्रद्धया संवत्सरं संवत्स्यथयथाकामं प्रश्नान्पृच्छतयदि विज्ञास्याम- सर्वं ह वो वक्ष्याम इति ।। ...प्रश्नोपनिषद पिप्पलाद ऋषींना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला असता, त्यावर त्यांनी उत्तर दिले, ""आश्रमात माझ्याजवळ वर्षभर राहून पावित्र्य, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा वाढल्यानंतर प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो.'' प्रश्नोपनिषदातील हा श्लोक आहे.
Thursday, February 02, 2012 AT 03:50 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आरोग्याविषयीचे प्रश्न सतत येत असतात. खरे तर एवढे प्रश्न आहेत का? मुळात एवढे त्रास आहेत का? कोणी तरी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवलेले असल्यास, आपल्याला तशा तऱ्हेचा त्रास झाल्यावर औषध समजू शकेल किंवा तसा त्रास होऊ नये अशी काळजी घेता येईल. माझे वय 25 वर्षे आहे. तीन वर्षांपासून माझ्या मणक्याला थोडा वाक आलेला आहे, त्यामुळे पाठ सतत दुखते. एक-दोन तास बसल्यावर जास्ती त्रास होतो. सध्या व्यायाम व मसाज सुरू आहे. त्यामुळे थोडा आराम आहे.
Friday, January 20, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपली शास्त्रे, आपली परंपरा, आपल्यावर प्रेम करणारी वडीलधारी मंडळी, आपल्या देशातील विचारवंत यांनी सांगितलेल्या गोष्टी जुनाट व बुरसटलेल्या विचारांच्या आहेत असे समजून, त्यांना नावे ठेवणारे, त्यांच्याकडे काणाडोळा करणारे आणि जाहिरातींद्वारा दिलेला सल्ला उचलणारे अनेक दिसतात. त्यातून काही आजार झाला, की प्रत्येक वेळी पळापळ केली जाते. त्याविषयी एक मोठा प्रश्न उभा राहतो.
Friday, January 20, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।। ...श्रीमद्भगवद्गीता 4-34 भगवंत म्हणतात, ''मर्म जाणणाऱ्या ज्ञानीजनांकडे जाऊन तू ते ज्ञान करून घे. त्यांना नम्रपणे नमस्कार करून व त्यांची सेवा करून त्यांना प्रश्न विचारल्यास ते ज्ञानी लोक तुला ज्ञानाचा उपदेश करतील.'' ज्ञान मिळविण्याचा योग्य मार्ग या श्लोकात सांगितला आहे.
Friday, January 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डोके दुखण्याची कारणे बरीच आहेत. डोकेदुखीवर उपचार म्हणजे कारणावर उपचार. योग्य निदानाखेरीज केलेले उपचार अर्धवट परिणाम देतात. अनेक कारणांनी ताप येत असताना डोके दुखते. इन्फ्ल्यूएन्झा हे नाव सुपरिचित आहे. या आजाराची पुष्कळदा सुरवात कपाळ दुखण्याने होते. इन्फ्ल्यूएन्झाचा आजार येण्याची फारशी सूचना मिळत नाही. सहसा तीन ते पाच दिवस त्रास टिकतो.
Friday, January 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
तहान, भूक, झोप या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. ढेकर किंवा उलटी या क्रियाही काही कारणाने होतात. यापैकी कोणतीही प्रवृत्ती रोखून धरता कामा नये. या प्रवृत्ती रोखून धरल्याने त्रासच होतो. मूत्र वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवल्याने बिघडलेला वात कोणती लक्षणे तयार करतो, याची माहिती आपण घेतो आहोत. आज आपण ढेकर, उलटी, भूक वगैरे उर्वरित वेगांचा अवरोध करण्याने काय त्रास होतो, याची माहिती घेणार आहोत.
Friday, January 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सूर्योपासनेचे महत्त्वाचे अंग म्हणजे सूर्यनमस्कार. सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याच्या दिशेकडे तोंड करून सूर्यनमस्कार करण्याने सूर्यशक्तीचा लाभ होतो, अग्नीचे पचनसामर्थ्यही वाढते. शारीरिक पातळीवर सूर्योपासना करणे म्हणजे अग्निसंवर्धनासाठी प्रयत्न करणे. म्हणूनच संक्रांतीच्या निमित्ताने अग्नितत्त्वाचे आधिक्य असणारे तीळ, उष्ण वीर्याचा गूळ खाण्याची पद्धत आहे.
Friday, January 13, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माणसाला हवी असते ऊब आणि उबेमुळे मिळणारा आनंद व संपर्क. संपर्काची कल्पनाच ऊब देते. एखाद्या संध्याकाळी एखाद्या व्यक्तीला नुसते फोन करायचे ठरविले की बरे वाटायला लागते. साहजिकच समाधान ही ताणविरहित अवस्था व या आकर्षणालाच प्रेम म्हणायचे. म्हणून माणसाला प्रेम मिळणे हा ऊब मिळण्याचाच आनंद असतो व त्यामुळे तो सुखी होतो.
Friday, January 13, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अपानवायू, मल (विष्ठा), मूत्र, जांभई, अश्रू, शिंक, ढेकर, उलटी, वीर्य, भूक, तहान, श्रमानंतर लागणारा दम आणि झोप असे तेरा वेग असतात. या वेगांना अडवून ठेवणे किंवा बळेच प्रवृत्त करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट समजले जाते. त्यातही वेग अडवून ठेवला तर जोवर त्याची प्रवृत्ती होत नाही, तोपर्यंत वाताच्या गतीत अडथळा येत असल्याने वातअसंतुलन अधिक प्रमाणात होते.
Friday, January 13, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझ्या भावाला एक वर्षापासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. गुडघ्याच्या खाली शिरा सुजलेल्या दिसतात. काही ठिकाणी गाठीही तयार झालेल्या दिसतात. तो स्टॉकिंग्ज वापरतो, पण त्याचे पाय प्रचंड दुखतात. 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभे राहता येत नाही. त्याचे रोजचे काम बैठ्या स्वरूपाचेच आहे. कृपया उपाय सुचवावा.... - विशाल सावंत, पलूस शिरांच्या भिंतींमधले स्थितिस्थापकत्व वाढावे आणि एकंदर रक्ताभिसरणाला मदत मिळावी यासाठी पायाला नियमित अभ्यंग करणे उत्तम होय.
Friday, January 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने । जन्मान्तरसहस्रेषु दारिद्य्रं नोपजायते ।। प्रतिदिन सूर्यनमस्काराचा व्यायाम करणाऱ्याची केवळ या जन्मातच नाही, तर पुढील अनेक जन्मांत दारिद्य्रापासून सुटका होते. यात "दारिद्य्र' हा शब्द केवळ "धनाचा अभाव' या अर्थाने वापरला नसून, त्यात अस्वास्थ्य, अनारोग्य वगैरे गोष्टींचाही समावेश आहे.
Friday, January 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कोणताही स्नायू सातत्याने दीर्घ काळ आकुंचित स्थितीत राहिला तर दुखू लागतो. रक्तवाहिन्यांचे स्पंदन होताना रक्तवाहिन्यांच्या परिघात असणाऱ्या पेशी ताणल्या जातात. अतिरेकी स्पंदनांत हा ताण वेदनादायक ठरतो. स्नायूंतील तणाव आणि स्पंदने अथवा दोन्ही घटकांच्या कमी-जास्त मिश्रणाने झालेली डोकेदुखी रुग्णाच्या डोकेदुखीच्या वर्णनावरून सहज ओळखता येते.
Friday, January 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उगवत्या सूर्याचा प्रकाश कृमीनाशक असतो. मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्त असते. त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी सूर्यकिरणांचा उपचार म्हणून वापर केला जातो. थंडीचा कडाका वाढला, की सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेण्यासारखे दुसरे सुख नसावे. वर्षभर ऊब देण्याचे काम सूर्यनारायण करत असतातच, पण हिवाळ्यात ही ऊब हवीहवीशी वाटणारी असते. सूर्यकिरणांच्या माध्यमातून सूर्य ऊब तर देतोच शिवाय आरोग्य राखण्यासही मोठा हातभार लावत असतो.
Friday, January 06, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर ऊबही देतो. म्हणून जीवन जगण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळते. तसे पाहताना व्यायामाची ऊब मिळते, तीसुद्धा नाभीच्या ठिकाणी असलेल्या मणिपूर चक्रातील सूर्याच्या उत्तेजनेमुळेच. आहारातून मिळणारी ऊब हीसुद्धा जाठराग्नीमुळे मिळते. तसे पाहता आहार सूर्यामुळे मिळतो, तेव्हा सूर्य हाच सर्व उबेचा प्रणेता आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. सर्व आरोग्याचा, दीर्घायुष्याचा व शतायुष्याचा कारक सूर्यच आहे.
Friday, January 06, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कोणताही स्नायू सातत्याने दीर्घ काळ आकुंचित स्थितीत राहिला तर दुखू लागतो. रक्तवाहिन्यांचे स्पंदन होताना रक्तवाहिन्यांच्या परिघात असणाऱ्या पेशी ताणल्या जातात. अतिरेकी स्पंदनांत हा ताण वेदनादायक ठरतो. स्नायूंतील तणाव आणि स्पंदने अथवा दोन्ही घटकांच्या कमी-जास्त मिश्रणाने झालेली डोकेदुखी रुग्णाच्या डोकेदुखीच्या वर्णनावरून सहज ओळखता येते. डोके दुखण्याचा अनुभव नसलेली व्यक्ती विरळाच असावी.
Friday, January 06, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी "फॅमिली डॉक्टर'चा नियमित वाचक आहे. मी दोन वर्षांपूर्वी 10 फूट उंचीवरून मानेवर पडलो. त्यामुळे तीन ते सात या मणक्यांना इजा झाली. मी सर्व तपासण्या केल्या. ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक औषधे घेतली. औषधे घेत असेपर्यंत दुखणे थांबते. व्यायाम करण्याने बरे वाटते पण दुचाकी वाहन चालवताना पाठीत फार दुखते. कृपया मार्गदर्शन करावे...श्री. अरविंद उत्तर - पडल्यामुळे मणक्यांना झालेली इजा भरून काढण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो.
Friday, January 06, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वेगांना अडवून ठेवल्यास होणाऱ्या रोगाला "उदावर्त' असे नाव दिलेले आहे. ज्या वेगाला अडवून ठेवले असेल त्यानुसार उदावर्ताची लक्षणे बदलतात, मात्र या लक्षणांमध्ये वात-असंतुलन मुख्य असते. एकदा का वातदोष बिघडला, की त्यातून असंख्य रोग उत्पन्न होऊ शकतात. मूत्रादी वेगांना अडवल्याने वायूची प्राकृत गती उलटी झाली तर छातीवर दाब येणे, डोके दुखणे यासारखे जे त्रास होतात त्याला "उदावर्त' असे म्हणतात.
Friday, January 06, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
यथा सूर्यांशुभिः स्पृष्टं सर्वं शुचि विभाव्यते । तथा त्वदर्चिर्निर्दग्धं सर्वं शुचि भविष्यति ।। ...महाभारत महाभारतात अग्नीच्या संदर्भात हा श्लोक आलेला आहे ः सूर्यकिरणांचा स्पर्श झाला असता जशा सर्व वस्तू शुद्ध होतात, तसेच अग्नीच्या ज्वाळांनी सर्व वस्तू शुद्ध होतात. अनेक दिवस अंधाऱ्या जागी असलेले, सूर्यकिरणांचा स्पर्श न झालेले पाणी मृत होते. असे पाणी उकळल्याने किंवा कडक उन्हात ठेवल्याने पुन्हा वापरण्यायोग्य होते.
Friday, January 06, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात. ऋतुनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्यक असते.
Friday, December 30, 2011 AT 04:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भारतीय परंपरेतील सर्व सण-उत्सव, त्या उत्सवांच्या देवता, त्या सणाच्या देवतांना प्रसादरूपात अर्पण करायच्या वस्तू व पक्वान्ने या सर्वांचा हिशेब ऋतुमानाप्रमाणे व प्रकृतिमानाप्रमाणे केलेला असतो. थंडीच्या दिवसांत सूर्यध्यान व्हावे, या हेतूने सूर्याकडे पाहणे, पतंग उडवणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे हे जेवढे महत्त्वाचे, तेवढेच तिळगूळ खाणे व गुळाची पोळी खाणे हे सणाशी संबंधित ठेवलेले आपण पाहतो.
Friday, December 30, 2011 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वेदनेचे म्हणजे शूलाचे विविध प्रकार कोणते असतात याची माहिती आपण घेतो आहोत. वातदोष व पित्तदोष यांच्यामुळे होणाऱ्या वेदनांचे स्वरूप कसे असते हे आपण पाहिले आज आपण कफदोष, आमदोष वगैरेंमुळे होणाऱ्या वेदना कशा असतात याची माहिती घेणार आहोत. कोणतेही असंतुलन वेदनांना, दुःखाला निमंत्रण ठरते. कफदोष, आमदोष यामुळे वेदना म्हणजे शूल कसा होतो, हे येथे आपण पाहणार आहोत. वेदनेचे म्हणजे शूलाचे विविध प्रकार कोणते असतात याची माहिती आपण घेतो आहोत.
Friday, December 30, 2011 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
तिरपी मान ही व्याधीही असू शकते. यामध्ये डोके (शिर) व मान हे एका बाजूला खाली वळलेले असते. यामध्ये मानेचे स्नायू हे आखडलेले असतात. देवआनंद म्हटले की आठवते त्याची मान तिरपी ठेवून चालण्याची शैली, तिरपी मान. ही मानेशी संबंधित व्याधीही असते. यामध्ये डोके (शिर) व मान हे एका बाजूला खाली वळलेले असते. यामध्ये मानेचे स्नायू हे आखडलेले असतात. ही वळलेली मान कायमची किंवा तात्पुरती आखडलेली असते. काही मुलांमध्ये मानेचे स्नायू हे जन्मत:च आखडलेले असतात.
Friday, December 30, 2011 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझे वय 30 वर्षे असून, मला दोन महिन्यांपासून संपूर्ण अंगाला खाज येते, अंगावर लाल रॅशेस, चट्टे उठतात पोटात रखरखते, जेवणानंतर मळमळते, तरी यावर योग्य उपचार सांगावा... श्री. गिरीश धामणेकर, बेळगाव. उत्तर - ही सर्व लक्षणे पित्त असंतुलनाची आहेत. शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण किंवा "सॅनकूल चूर्ण' घेण्याचा उपयोग होईल. "संतुलन पित्तशांती गोळ्या' घेणे, "संतुलन अनंत कल्प' घालून दूध घेणे चांगले.
Friday, December 30, 2011 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गुलाबी थंडीपासून ते गारठवून टाकणाऱ्या थंडीपर्यंत थंडीची अनेक रूपं सध्या अनुभवाला येत आहेत. थंडीचा कडाका वाढतो, तशी अनेकांची पाठदुखी आणि कंबरदुखी बळावली असेल. काही वेळा थंडी नसली तरीही रोजच्या धकाधकीत आणि ऑफिसातल्या कामाच्या ताणाने ही दुखणी हमखास येऊ लागली आहेत. सर्दी - ताप तर असतोच. हा त्रास होऊ नये, यासाठी काय कराल? सर्दी नाकात धूळ जाणं, जागरण होणं, धूर जाणं यामुळे सर्दी होते, ती जाण्यासाठी अडुळशाचा काढा घ्यावा.
Friday, December 30, 2011 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बेशुद्ध झालेल्या माणसाला डॉक्टरकडे आणले जाते. डॉक्टर - (नाडी तपासत) हा तर मेलाय! बेशुद्ध माणूस - (उठून बसत) मी तर जिवंत आहे. बेशुद्ध माणसाची बायको - गप्प बसा हो. तुम्हाला काय कळतं? एवढे मोठे डॉक्टर काय खोटं बोलतात का? बंटा डॉक्टरांना घाईने फोन लावतो. बंटा - डॉक्टर माझी बायको गरोदर आहे आणि तिला प्रसववेदना सुरू झाल्यात. डॉक्टर - हे तिचं पहिलं बाळ ना? बंटा - नाही, मी तिचा नवरा बोलतोय.
Friday, December 30, 2011 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|