Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


फीचर्स
लिहिण्याची कल्पना छान आहेच पण आपण इथं जमलेल्या सर्वांनी महिन्याला पन्नास-शंभर रुपये वर्गणी काढून या मुलीचं शिक्षण पूर्ण केलं तर? सर्वांत जास्त आनंद आपल्याला होईल... आपण एक आयुष्य उभं केलं, ज्योत नव्हे तर फ्लड लाइटच लावला, असं समाधान आपल्याला मिळेल. गावानंच आपल्या गावातील पोरगी घडवली, हेही मोठ्या अभिमानानं सांगता येईल... बघा, विचार करा... तो तुम्हाला पटला तर मी माझ्या शंभर रुपयांपासून सुरवात करेन.

Sunday, February 05, 2012 AT 04:00 AM (IST)

माझ्या पीएने मला ज्या इमारतीत नेलं होतं त्या इमारतीचं नाव विश्रामगृह असं होतं. मला उगाचच लाक्षागृह आठवलं. या इमारतीत विश्राम करण्यासाठी मात्र कोणी येत नसणार. तिथल्या वातावरणात आढळणारे सूक्ष्म भावनांचे तरंग मी वाचू लागलो.

Sunday, February 05, 2012 AT 03:00 AM (IST)

पंधराव्या शतकात चंद्रपूर येथे गोंड राजांचे साम्राज्य होते. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे प्राचीन आणि गोंडकालीन वास्तू आजही आहेत. महाकाली मंदिर, अंचलेश्‍वर मंदिर, एकवीरा मंदिर आहे. परकोटाला चार द्वार असून, जटपुरा, पठाणपुरा, बिनबा आणि अंचलेश्‍वर अशी त्यांची नावे आहेत. शहरात गोंडकालीन वास्तूंमध्ये राजा वीरशहा आणि राणी हिराईची समाधी प्रसिद्ध आहे. वाकाटककालीन वास्तूही येथे आहेत.

Sunday, February 05, 2012 AT 02:15 AM (IST)

'रब से जियादा तेरा नाम लेता हूँ...रब मुझे माफ करे'...असं म्हणणाऱ्या सोहनी आणि महिवालची प्रेमकथा मनाला चटका लावून जाणारी. या दोघांचेही मृतदेह पाकिस्तानातील हैदराबादजवळील शाहदादपूरजवळ नदीत सापडले, अशी आख्यायिका आहे. याच ठिकाणी सोहनीची समाधी आहे. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे ' अशा एका गीताच्या ओळी आहेत. असं हे देवाघरचे देणे' असणारे प्रेम काहींच्या जीवनाचा अर्थ, त्याचा मार्गच बदलून टाकतं.

Sunday, February 05, 2012 AT 02:15 AM (IST)

अणुऊर्जेची वाढ ही पुढच्या शंभर वर्षांत कशी होईल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. ऊर्जेची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोळसा, तेल व गॅस यांचे साठे फार कमी राहतील व त्यांच्या किमती भरमसाट वाढलेल्या असतील. अणुऊर्जा ही सर्वांत जास्त सुरक्षित ऊर्जा आहे. पण, लोकांचा असा गैरसमज होतो, की अणुऊर्जा धोक्‍याची आहे. डॉ. होमी भाभा व पंडित नेहरू यांच्या दृरदृष्टीतून 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष डॉ. भाभा होते.

Sunday, February 05, 2012 AT 02:00 AM (IST)

सातारा- बदलत्या जीवनशैलीमध्ये सगळे बदलू लागले आहे. आधुनिकता भुरळ पाडत आहे. नव्या जगाची देणगी म्हणून आता साताऱ्याच्या राजवाड्यासमोरच खाण्यापिण्याचे असंख्य स्टॉल उभे आहेत. सातारकर या भागाला राजवाडा चौपाटी म्हणतात. कोल्हापुरी चिरमुऱ्यापांसून बनवलेल्या भेळेपासून झणझणीत चायनीज पदार्थ येथे मिळतात. शर्माची पावभाजी आणि सुपनेकरांच्या फिरत्या उपाहारगृहातील पॅटिस खाण्यासाठी बाहेरगावचे खवय्येही येथे येतात. सातारा हा महामार्गावरचा जिल्हा.

Sunday, February 05, 2012 AT 01:45 AM (IST)

माझं सत्तर वर्षापूर्वीचं लव्ह अफेअर (तुम्हालाही माहीत नसलेलं) कल्याण, ठाणे ओलांडले की माझ्या हातातले स्केच बुक कुतूहलाने... धास्तीने पाहण्यासाठी मागितले जाते. मी देतो. जो तो प्रवासी त्यातले आपले कॅरिकेचर कापून घेतो. खोटे हसत "थॅंक्‍स' म्हणतो आणि दुसऱ्याला ते स्केचबुक देतो. तो त्यातले आपले व्यंगचित्र काढून तिसऱ्याला देतो. असे करत करत माझ्या स्केचबुकचे फक्त बाईंडिंग शिल्लक उरते.

Sunday, February 05, 2012 AT 01:30 AM (IST)

संग्रहालयाच्या मांडणीत अजून ताजेपणा आणताना संयोजकांनी तरुण पिढीला क्रिकेटचे महत्त्व वेगळ्या इंटरॅक्‍टिव्ह पद्धतीने समजावे म्हणून वेगळी दालने मोठ्या विचारांनी मांडली आहेत. पहिल्या दालनात 1750 मध्ये क्रिकेट खेळायला वापरली गेलेली बॅट ठेवण्यात आली आहे. सर्वांत संस्मरणीय दालन अर्थातच सर डॉनच्या वस्तू जतन करून ठेवलेले आहे. सिडनीपासून फक्त 120 किलोमीटर अंतरावर असलेले बॉरल गाव म्हणजे क्रिकेट रसिकांकरता तीर्थक्षेत्र मानले जाते.

Sunday, February 05, 2012 AT 01:30 AM (IST)

पु. ल. देशपांडे यांच्या अजरामर अशा व्यक्तिचित्रांपैकी एक व्यक्तिचित्र म्हणजे नारायण होय. अनेक लग्नांमध्ये पैचीही अपेक्षा न ठेवता राबणाऱ्या नारायणला व्यवहार कधीच कळला नव्हता. पु.लं.चा नारायण आणि तो काळ इतिहासजमा झाला. आता बदललेल्या काळात बदलत्या जीवनमूल्यामध्ये "त्या' नारायणची मूल्ये कशी राहतील? त्या नारायणचा मुलगा म्हणजे ज्युनिअर नारायणचा हा काळ. कसा आहे तो, या लेखात त्याचे उत्तर मिळेल... मोबाईल वाजतो तसा फोटोतला नारायण दचकतो.

Sunday, February 05, 2012 AT 01:30 AM (IST)

मूळ संकल्पनाच खूप सुंदर होती नृत्ययात्रीची. नृत्यप्रेमींना त्यांच्या विश्‍वाची सफर घडवायची! 14 ते 19 जानेवारी 2012 या काळात गार्डियन हॉलिडेजच्या संचालिका सौ. मेघना साबडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही नृत्ययात्रा चेन्नई येथे जाऊन आली. नृत्यासंबंधीच्या ज्ञानात काही नवीन माहिती व अनुभवांची भर टाकणं, हा या सफरीचा मूळ हेतू. परंतु याचबरोबर जीवनाकडे जरा विचारपूर्वक बघण्याचा नवा दृष्टिकोन देणारी ही एक यशस्वी सहल ठरली.

Sunday, February 05, 2012 AT 01:30 AM (IST)

मुलगी, पत्नी, माता आणि आजीची चौथी भूमिका. कशी निभावता ही चौथी भूमिका? आपले अनुभव पाठवा, असे आवाहन झाले आणि राज्यभरातून पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. या अनुभवकथनातून अनेक मुद्द्यांना विविध ठिकाणच्या महिलांनी स्पर्श केला. आजीची भूमिका बजावणाऱ्या काही महिलांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत... ------------------------------------------------- वय विसरायला होतं लक्ष्मी दंडवते, पुणे वयाच्या पाचव्या वर्षांपासूनचं बालपण स्मरणात आहे.

Sunday, February 05, 2012 AT 01:00 AM (IST)

संपूर्ण स्पर्धा बघताना काही गोष्टी खटकल्यासुद्धा. "अतिस्पर्धात्मक' वृत्ती ही त्यातील महत्त्वाची. गरज नसताना भरपूर नेपथ्य आणि प्रकाशाचा अनाठायी वापर अगदी डोळ्यांवर आला. अभिनयाचे महत्त्वाचे अंग म्हणजे संवाद आणि त्याचे उच्चारण. त्याही बाबतीत अनेकदा निराशा पदरी पडली. हालचालींच्या उत्तम दृश्‍यात्मकतेच्या नादात काही वेळा संवाद निसटत होते. नाटकाची संक्षिप्त आवृत्ती म्हणजे एकांकिका, असा काहींचा समज असतो.

Sunday, February 05, 2012 AT 01:15 AM (IST)

इजिप्तमध्ये गत वर्षी झालेल्या क्रांतीनंतर होस्नी मुबारक पायउतार झाले आणि एक हुकूमशाही संपवल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. 11 फेब्रुवारी 2011 हा दिवस "निरोपाचा शुक्रवार' म्हणून गाजला, कारण त्याच दिवशी होस्नी सत्तेवरून खाली आले. इजिप्तमध्ये सुरू झालेली क्रांती यशस्वी करण्यासाठी तिथल्या स्त्रियांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. होन्सींना विरोध करण्यासाठी लाखो स्त्रिया कैरो आणि इतर शहरांतील रस्त्यावर उतरल्या होत्या.

Sunday, February 05, 2012 AT 01:15 AM (IST)

ज्या कुठल्याही गोष्टीतून नवा विचार किंवा ज्ञान मिळेल ती गोष्ट सत्ताधाऱ्यांना निषिद्ध ठरते, मग ते पुस्तक असो किंवा एखादा सिनेमा असो वा एखादी व्यक्ती. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जाते. असे मुस्कटदाबी करणारे संख्येने कमी आहेत म्हणून खरी जबाबदारी येते ती बहुसंख्याकांची. तेव्हा सततची जागरुकता ही स्वातंत्र्याची खरी किंमत आहे.

Sunday, February 05, 2012 AT 01:15 AM (IST)

कुसुमाग्रज म्हणतात, 'प्रेम कुणावरही करावं.' प्रेम ही मानवी जीवनाची भाषाही असते आणि आशाही. 14 फेब्रुवारी हा संत व्हॅलेंटाईनच्या सन्मानार्थ "व्हॅलेंटाईन डे' म्हणून जगभर साजरा केला जातो. याकरिता फेब्रुवारी महिन्यात "सप्तरंग' पुरवणीत प्रेम या विषयावरील कविता प्रसिद्ध केल्या जातील. अर्थात, या कवितांमध्ये प्रेमाच्या विविध छटा असतील. नव्या कवींच्या भावना व्यक्त करणारे हे सदर...

Sunday, February 05, 2012 AT 12:45 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: