वेंगुर्ले - येथील सागरेश्वर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांची 4 अंडी सापडली. स्थानिकांनी ती कासवमित्र सुहास तोरसकरांच्या हाती सुपूर्द केली मात्र येथील सुमारे 60 ते 70 अंडी चोरल्याचा संशय स्थानिकांनी वर्तविला. सागरेश्वर येथील मंदिराच्या मागे समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाने अंडी घातली. समुद्री कासव अंडी घातल्यानंतर लगेचच समुद्रात निघून जाते.
मालवण - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या काल झालेल्या निवडणुकीत तालुक्यात 66.51 टक्के मतदान झाले. तालुक्यात हिवाळे जिल्हा परिषद मतदारसंघात (69.95 टक्के) सर्वाधिक मतदान झाले. आचरा जिल्हा परिषद मतदारसंघात 3323 स्त्री, 3310 पुरुष असे एकूण 6633 मतदारांनी मतदान केले. या गटात 63.37 टक्के मतदान झाले. आचरा पंचायत समिती मतदारसंघात 1813 स्त्रिया, 1852 पुरुष असे एकूण 3665 मतदारांनी मतदान केले. या गणात 66.01 टक्के मतदान झाले.
रत्नागिरी - गेल्या दोन दिवसांत वातावरणामध्ये बदल झाला असून अचानक सुटलेल्या वेगवान वाऱ्यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारी ठप्प झाली आहे. समुद्रही उसळला असून मच्छीमारांनी समुद्रात जाणे नापसंत केले आहे. परिणामी शेकडो मच्छीमारी नौका बंदरातच उभ्या आहेत. यावर्षीच्या मच्छीमारी मोसमानंतर चौथ्यावेळी अशी स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम हे सातत्याने मच्छीमारीवर होत असतात. काल (ता. 7) सायंकाळी अचानक वेगवान वारे वाहण्यास सुरवात झाली.
कळणे - दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक मतदान पाळये आणि केंद्रे बुद्रुक येथे झाले. सर्वांतकमी मतदान कोनाळ येथे (46 टक्के) झाले. तालुक्यात 65 टक्के मतदान झाले. तालुक्यात 70 केंद्रांवर मतदान झाले. तालुक्यात 35,635 मतदारांपैकी 23,055 जणांनी हक्क बजाविला. यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर होते.
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात 67.17 टक्के मतदान झाले. सर्वांत जास्त देवगडमध्ये 73.11 टक्के, तर सर्वांत कमी दोडामार्गमध्ये 64.70 टक्के मतदान झाले. जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची आज अधिकृत टक्केवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील 5 लाख 43 हजार 77 पैकी 3 लाख 64 हजार 723 मतदारांनी हक्क बजाविला. याची टक्केवारी 67.
रत्नागिरी - पन्नास टक्के महिला आरक्षणाने जिल्हा परिषदेत महिलाराजचे वेध केव्हाच लागले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काल (ता. 7) झालेल्या निवडणुकीत महिला मतदारांनी घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत तरुणी, गृहिणी, कर्मचारी, वृद्धा आदी महिलांच्या सहभागाने मतदानाच्या स्वरूपात दिलेलं वाणच कारभारणींच लेणं ठरणार आहे. जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
देवरूख - संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरात असलेली अनेक पुरातन मंदिरे आजतागायत दुर्लक्षितच राहिल्याने आणि शासकीय दुर्लक्षाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा कमी पडल्याने तालुक्यातील हा पुरातन ठेवा आजघडीला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण कोकणातील विविध भागात असणाऱ्या पुरातन मंदिरे, ब्रिटिशकालीन वास्तू तसेच किल्ले, दूर्ग यांचे पर्यटक, इतिहासप्रेमी तसेच शिल्पकारांना मोठे आकर्षण आहे.
रत्नागिरी - तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख उरसानिमित्त येथील एसटी आगाराने 456 जादा फेऱ्यांमधून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. दोन दिवसाच्या वाहतुकीद्वारे एसटीला हे उत्पन्न मिळाले. दरवर्षी हातीस या पर्यटनक्षेत्री मुंबईकर चाकरमान्यांसह महाराष्ट्रातील सुमारे एक लाख भाविक येतात. पीर बाबरशेख बाबांच्या उरसानिमित्त मोठी जत्राही भरते. या भाविकांसाठी एसटीतर्फे दरवर्षी जादा गाड्यांची चांगली सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
सावंतवाडी - खनिज संपत्तीवर चालणाऱ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. नवा भूमिअधिग्रहण कायदा भूमिपुत्रांना मारक आहे. त्याऐवजी विकास नियोजनाच्या कायद्याची मागणी करीत असल्याचे जनआंदोलनांच्या ज्येष्ठ नेत्या मेधा पाटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मालवण येथील मच्छीमार संघटनेचे रविकिरण तोरसकर, जनआरोग्य अभियानाच्या डॉ. सुहास कोल्हेकर, प्रवीण सबनीस, ज्ञानेश्वर शेडगे उपस्थित होते.
देवरूख - संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरात असलेली अनेक पुरातन मंदिरे आजतागायत दुर्लक्षितच राहिल्याने आणि शासकीय दुर्लक्षाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा कमी पडल्याने तालुक्यातील हा पुरातन ठेवा आजघडीला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण कोकणातील विविध भागात असणाऱ्या पुरातन मंदिरे, ब्रिटिशकालीन वास्तू तसेच किल्ले, दूर्ग यांचे पर्यटक, इतिहासप्रेमी तसेच शिल्पकारांना मोठे आकर्षण आहे.
राजापूर - वर्षभरापूर्वी भूमिपूजन झालेल्या मात्र अद्यापही शुभारंभ न झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या शहरातील मटण-मच्छी मार्केट आणि कोंढेतड परिसर व बाजारपेठ यांना जोडणाऱ्या अर्जुना नदीवरील कोंढेतड पूलाच्या कामाच्या ठेकेदाराचे भवितव्य पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत ठरणार आहे. वर्षभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही कामाला सुरवात न केल्याने त्या ठेकेदाराचा ठेकाच रद्द होण्याची नामुष्की त्या ठेकादारावर येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी - "इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबरांच्या आदर्श शिकवणीची आज आवश्यकता आहे'', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी केले. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने येथील अल्पबचत स्भागृहात पैगंबर जयंती दिनाचे औचित्य साधून ईद-ए-मिलाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
लांजा - लांजा पंचायत समितीवर पुन्हा भगवा फडकणारच, असा दावा आमदार राजन साळवी यांनी केला. लांजा पंचायत समितीवर गेली 15 वर्षे शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याचे काम शिवसेनाच्या माध्यमातूनच केले गेले. त्यामुळे सातत्याने येथील जनतेने पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात दिली आहे. यावेळीही आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर शिवसेनेलाच येथील जनतेने स्वीकारले असल्याचे दिसून आले आहे.
आकेरी - दोनशे मीटरच्या आत गाड्या लावल्याने पोलिस आणि उमेदवार यांच्यात वादावादीचे प्रकार झाराप परिसरात आज बऱ्याचदा घडले. गाड्या लावण्यावरून वादाचे प्रकार परिसरात अनेकदा घडले. झाराप येथे मंदिर आणि शाळा अशा दोन्ही इमारती समोरासमोर आहेत. सकाळी दहाच्या सुमारास एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाड्या भरून मतदारांना मतदान करण्यासाठी आणले.
रत्नागिरी - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान झाले. या मतदान प्रक्रियेमध्ये 18 ते 108 वर्षापर्यंतच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धांमध्ये उमेद होती, नवख्या मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी उत्कंठा आणि भारताचा सजग नागरिक झाल्याचा अभिमान मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर चेहऱ्यावर दिसत होता.