Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


क्रीडा
पर्थ - भारतीय संघात सलामीच्या स्थानासाठी रोटेशन पद्धत सुरु असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात सचिन तेंडुलकरला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. तिरंगी मालिकेत भारताचा सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मात्र सचिनला विश्रांती शक्यता कमी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज रोहित शर्माला संघातून वगळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Thursday, February 09, 2012 AT 05:32 PM (IST)

पर्थ -  तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताला अखेर विजयाचा मार्ग सापडला. मात्र, श्रीलंकेच्या 233 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या सुरेख अर्धशतकी खेळीनंतरही भारताला अनेक कोलांट उड्या घ्याव्या लागल्या. धावगतीत सातत्याने श्रीलंकेच्या पुढे राहणाऱ्या भारतीय संघावर तीन गडी झटपट बाद झाल्याने दडपण आले होते.

Thursday, February 09, 2012 AT 01:30 PM (IST)

नवी दिल्ली -  कॅन्सरवरील उपचार सुरू होण्यास झालेल्या विलंबाला मीच जबाबदार आहे. माझ्या "गुरुजीं'ना दोष देणे योग्य नाही, असे स्पष्ट करतानाच जिगरबाज क्रिकेटपटू युवराजसिंगने जोरदार "कमबॅक'चा निर्धार केला. प्रेरणा मिळविण्यासाठी, कॅन्सरवर "विजय' मिळविलेला अमेरिकेचा अद्वितीय सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंग याची तो भेट घेणार आहे. युवराजने "ट्‌वीटर'च्या माध्यमातून भावना व्यक्त केली आहे. त्याने "ट्‌वीट' केले आहे, की "अनेक जण "गुरुजी' (डॉ.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारताने बुधवारी पहिला विजय मिळविला असला, तरी श्रीलंकेने उभे केलेले आव्हान आवाक्‍यात असूनही त्यांना विजयासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली. अर्थात, तिरंगी मालिकेत विजयाचे खाते उघडले, हे सर्वांत महत्त्वाचे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी भक्कम फलंदाजी असातना आवाक्‍यातील आव्हानाचा पाठलाग करताना सहज विजय अपेक्षित असतो. अशा वेळी फलंदाज स्वतःहून चुका करून बाद झाले, की "ड्रेसिंग रुम'मधील वातावरण बिघडायला लागते.

Thursday, February 09, 2012 AT 12:45 AM (IST)

नवी दिल्ली - आर्थिक अनियमिततेच्या आरोपात अडकलेले इंडियन प्रिमिअर लीगचे (आयपीएल) माजी आयुक्त ललित मोदी यांच्यापुढील अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. आयपीएलमधील एका फ्रॅंचाइजीच्या अधिकाऱ्याने आता मोदी यांनीच मुंबई इंडियन्सला फायदा होण्यासाठी गोपनीय टायब्रेक नियम बनविल्याचा दावा केला. मोदी यांनी मंगळवारी एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना सर्व संघांना समान संधी देण्यासाठी टायब्रेकचा नियम करण्यात आला होता, असे म्हटले होते.

Thursday, February 09, 2012 AT 12:45 AM (IST)

कोलकता - भारताचा अव्वल टेनिसपटू महेश भूपती याने ऑलिंपिक स्पर्धेत रोहन बोपण्णाच्याच साथीत खेळण्याबरोबर लिएँडर पेसच्या साथीत न खेळण्याचे स्पष्ट संकेतच बुधवारी दिले. भूपती म्हणाला, ""सध्या बोपण्णाच्या साथीत तंत्र सुधारण्यावर भर देत असून, आमच्यासमोर या वर्षी मोठा मोसम आहे. रोहनने यापूर्वी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कोर्टवरील परस्पर समन्वय जुळवून आणण्यासाठी आम्ही सध्या कठोर मेहनत घेत आहोत.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली - भारतीय मुष्टियुद्ध संघाचा लंडन ऑलिंपिकच्या तयारीचा सराव कसून सुरू आहे. त्यासाठी कझाकस्तान दौऱ्यावर दहा खेळाडू रवाना झाले आहेत. ते स्पर्धेतही भाग घेतील. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अल्माटीमध्ये स्पर्धा होईल. भारतीय हौशी मुष्टियुद्ध महासंघाचे चिटणीस ब्रिगेडीयर पी. के. मुरलीधर राजा यांनी सांगितले की, स्पर्धा छोटी असली तरी त्यात रशिया, फ्रान्स, भारत व यजमान कझाकस्तान असे देश सहभागी होतील. सर्व देश पूर्ण ताकदीचा संघ उतरविणार आहेत.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

दुबई - इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणारा फिरकी गोलंदाज सईद अजमल याने आपल्याच वक्तव्याने नवे वादळ निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यावर सारवासारव करताना गोलंदाजी शैलीसाठी अजमलला कोणतीही विशेष सवलत दिली नसल्याचा खुलासा केला. दुबईत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने कसोटी क्रमवारीतील अव्वल संघ इंग्लंडला 3-0 असे पराभूत केले होते.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

नवी दिल्ली - ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेची जोरदार तयारी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनी कॅनडा, फ्रान्स संघांचे खरे आव्हान असल्याचे मत बुधवारी व्यक्त केले. पुढील आठवड्यातच पात्रता हॉकी स्पर्धेला सुरवात होत आहे. भारतीय संघाच्या तयारीवर नॉब्ज समाधानी दिसत असले, तरी कोणत्याही क्षणाला गाफिल राहून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""स्पर्धेच्या दृष्टीने संघाची तयारी चांगली झाली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

लंडन -  भारतातील 1984 च्या भोपाळ वायुदुर्घटनेशी संबंधित डाऊ या अमेरिकन केमिकल्स कंपनीने कितीही टीका होत असली, तरी ऑलिंपिक स्टेडियम्स आकर्षक बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे म्हटले आहे.   भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) लंडन ऑलिंपिकमधून डाऊला हटवावे, अशी मागणी केली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

पर्थ - दुखापतीतून सावरत असलेला वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन सध्या सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात संघात पुनरागमन करू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी म्हटले आहे. पॅटिन्सन भारताविरुद्ध केवळ दोन कसोटी सामने खेळला. पायाचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागली. त्याने दोन कसोटींत 11 बळी मिळविले होते आणि मेलबर्न कसोटीत तो "सामनावीर'ही ठरला होता.

Thursday, February 09, 2012 AT 12:15 AM (IST)

इंदूर - दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 12 तारखेपासून इंदूरमध्ये होईल. पूर्व विभाग आणि मध्य विभाग यांच्यात ही पाच दिवसांची लढत रंगेल. मध्य विभागाने उपांत्य फेरीत चेन्नईला पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर दक्षिण विभागाला हरविले तर पूर्वेने उत्तरेला दिल्लीत याच निकषावर हरविले. मध्य विभागाने चार वेळा दुलिप करंडक जिंकला आहे तर एकदा पश्‍चिम विभागासह संयुक्त विजेतेपद मिळविले आहे. पूर्वेला अद्याप ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

Thursday, February 09, 2012 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली - भारताच्या आघाडीच्या चार रिले धावपटूंवर घालण्यात आलेल्या एक वर्षाच्या बंदीमुळे असमाधानी जागतिक डोपिंग विरोधी पथकाने (वाडा) या निर्णयाविरुद्ध अपील करताना दोन वर्षांच्या बंदीची मागणी केली आहे. 4 बाय 400 मीटर रिले संघातील आशियाई सुवर्णपदक विजेत्या अश्‍विनी अकुंजी, सिनी जोस, प्रियांका पवार आणि टियाना मेरी थॉमस यांच्याशिवाय अन्य तीन ऍथलिट्‌सवर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंदीची कारवाई झाली. वाडाच्या याचिकेवर 15 फेब्रुवारीला सुनावणी होईल.

Thursday, February 09, 2012 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली - पुढील आठवड्यात मकाव येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीबाबत विश्‍वास व्यक्त करताना भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू अजय जयराम याने बादफेरीपर्यंत मजल मारू असे सांगितले. अजय प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहे. तो म्हणाला,""थॉमस स्पर्धेत खेळण्यासाठी मी कमालीचा उत्सुक आहे. भारताच्या विजयासाठी मी शक्‍य ते प्रयत्न करेन. स्पर्धेचा "ड्रॉ' जाहीर झाला असला तरी तो पाहिलेला नाही.

Thursday, February 09, 2012 AT 12:15 AM (IST)

कोलकता - भारताचा माजी एकदिवसीय क्रिकेटपटू रोहन गावसकरने आपला अखेरचा प्रथमश्रेणी सामना खेळल्याच्या तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पत्र पाठवून आपला निर्णय कळविला. महान फलंदाज सुनील गावसकर यांचा मुलगा रोहनने जानेवारी ते सप्टेंबर 2004 दरम्यान 11 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने एका अर्धशतकासह 18.

Thursday, February 09, 2012 AT 12:15 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: