Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


मधुरांगण
अलीकडे अनेक रिऍलिटी शोजमधून प्रेमाचं नाटकीकरण दिसत असतं. जगात जेव्हा "ब्लॅकबेरी' आणि "ऍपल' नव्हते तेव्हापासून सहजसुंदर प्रेमाचे आपण साक्षीदार आहोत. आताही ते अगदी तशाच प्रकारचं असावं असं नक्कीच अपेक्षित नाही. पण त्याच्या देखाव्याशिवायही कधी तरी राहून बघावं. फेब्रुवारी महिन्यातील "व्हॅलेंटाइन डे'निमित्त जाणून घेऊ प्रेम नव्या नजरेतून...

Wednesday, February 08, 2012 AT 06:50 PM (IST)

प्रवासाला जाताना आपला उद्देश काय आहे हे आधी निश्‍चित करावं. आपण स्थलदर्शनासाठी जातोय का कुटुंबासमवेत आराम करायला जातोय हे ठरवावं आणि त्यानुसार जाण्याचं ठिकाण निवडावं. कपडे- कुठेही गेलात तरी कपडे हे सुटसुटीत असावेत ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणच्या हवामानानुसार कपड्यांची निवड करावी. थंड हवामानाच्या जागी अंग पूर्ण झाकणारे सुती कपडे न्यावेत. साड्या शक्‍यतो टाळा. पंजाबी सूट चालेल.

Wednesday, February 08, 2012 AT 05:56 PM (IST)

पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो आणि त्यासह सुरू होते ती दिवसाची प्रसन्नता. पक्ष्यांचं नातंच आपल्या उल्हासाशी जोडलं गेलं आहे. अनेकदा पक्ष्यांचे थवे न्याहाळतच राहावं असं वाटतं. कधी जंगलाच्या वाटेवर तर कधी एखाद्या ठिकाणी परदेशातला पाहुणा म्हणून वेगवेगळे पक्षी भेटतात. आपल्या दारातला आणि परदेशातला "पाहुणा' आपल्याला कधी आणि कुठे भेटतो हे भटकंतीच्या निमित्ताने आवर्जून जाणून घ्यायला हवं, आणि त्याला भेटायचं तर त्यासाठी तयारीही हवीच ना!...

Tuesday, February 07, 2012 AT 07:22 PM (IST)

फुलांचं सौंदर्य वादातीतच. गुलाबाचा ताटवा असो किंवा एखादं रानफूल, त्याचा मोह सगळ्यांनाच असतो. आपला देश अशाच सौंदर्याने नटलेला आहे. कुठे कुठे लपलं आहे हे सौंदर्य?... खास फुलांचं सौंदर्य नजरेत साठवायला तुम्ही काढू शकता यंदाच्या सुट्टीतली खास सहल. त्यासाठीच जाणून घ्या कुठे कुठे आहे हा निसर्गाचा नजराणा... नि सर्गाच्या रंगांची उधळण पाहायला मला आवडतं. आपण अनेकदा फिरायला जातो. काही विशिष्ट ठिकाणं पाहायला जातो, तसंच फुलं पाहायलाही जायला हवं.

Monday, February 06, 2012 AT 04:55 PM (IST)

मंदिरं म्हटली की सहसा फक्त मोठ्या देवस्थानांना देवदर्शनासाठी जाण्याचा विचार होतो. पण मंदिर हा आपल्याकडचा एक प्राचीन आणि सुंदर वास्तुप्रकार आहे. त्याचं सौंदर्य बघण्यासाठी म्हणूनही कधी तरी जावं. काहीशी अपरिचित, आडवाटांना असलेली बरीच प्राचीन मंदिरं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांमध्ये गिरिस्थानं, गड-कोट-किल्ले, लेणी यांचा जेवढा बोलबाला झाला आहे तेवढा प्राचीन मंदिरांचा झालेला नाही.

Monday, February 06, 2012 AT 04:49 PM (IST)

ट्रेकिंगची "क्रेझ' नेहमीच वाटते. लांबून सोपा वाटणारा एखादा गड किंवा किल्ला प्रत्यक्ष चढताना थरार अनुभव देतो. एकदा तो सर केला की त्याचा आनंद औरच असतो. प्रत्येकाने कधी ना कधी असं रांगडं पर्यटन करायलाच हवं. असेच काही रांगडे अनुभव... तुम्हालाही वेगळ्या वाटेचा आनंद देणारे आणि कडे-कपारीतल्या जगात जाण्यासाठी प्रेरणा देणारे... मकरंद गडावरची थरारक चढाई ऐन वेळी बदललेला बेत एक थरारक अनुभव पदरात टाकून जाईल याची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती.

Friday, February 03, 2012 AT 04:17 PM (IST)

"तनिष्का'च्या या नव्या वळणावर जेव्हा मला मनापासून वाटलं की काही स्त्रियांवर लिहिलं पाहिजे, तेव्हा चटकन आऊ आठवल्या."आऊ' मला अनेकदा भेटतात. कौतुक करतात. माझी दृष्टही काढतात. मी मात्र एखादं पुस्तक वाचल्यासारखी त्यांना न्याहाळत राहते. माझ्या शिवाजी मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी भेटल्या त्या मला. नऊवारी साडी मोठ्या झोकात नेसवणाऱ्या म्हणून खास त्यांना बोलावून घेतलं होतं. सर्व नृत्यांगनांमध्ये त्या आधीच लोकप्रिय होत्या.

Friday, February 03, 2012 AT 04:38 PM (IST)

घनदाट जंगलात जाणं, जंगलातले प्राणी पाहणं हा आयुष्यभर पुरणारा अनुभव असतो. जास्तीत जास्त सुरक्षितपणे अशा जंगल सफारी करणं हे अलीकडे खूपच सोयीचं झालंय. पण तरीही त्यात काही वेगळ्या प्रकारची काळजी घेणं भाग असतं. कारण आपण मानवनिर्मित सुरक्षित जगातून जंगलाच्या वेगळ्याच जगात जात असतो... पुण्याहून आलेलं एक कुटुंब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या काठावरच्या एका विश्रामगृहात मुक्‍कामी होतं. या ठिकाणचं आरक्षण या कुटुंबाने एका मध्यस्थामार्फत केलं होतं.

Friday, February 03, 2012 AT 04:34 PM (IST)

""आईची ओढणी घेऊन मी सगळ्या उपस्थितांपुढे बेफाम डान्स करायला लागले. पाहुण्यांना वाटलं, माझा डान्स आधीच ठरलेला होता पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. सगळे पाहुणे डॅडना म्हणाले, ""तेरी बिटिया तो फिल्मों में ही करियर बनाएगी ।'' ...सोनम सांगतेय तिचा करियरप्रवास.... माझे वडील अनिल कपूर जेव्हा "राम-लखन' चित्रपटाचं शूटिंग एका आडगावी करत होते तेव्हा मी लहान होते. डॅडना भेटायला मी गेले तेव्हा ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते.

Tuesday, January 31, 2012 AT 05:15 PM (IST)

रोजच्या आयुष्यात अनेक स्त्रिया काम करत असतात. कधी संसाराला हातभार म्हणून, कधी स्वतःची आवड म्हणून किंवा कधी स्वतःचं करियर म्हणूनही. कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय घेतला तरी एकसारखं काम करणारे अनेक चेहरे त्यात असतात. रोजच्या कामाला वेगळेपणं देऊनही हे चेहरे गर्दीत मिसळलेले असतात. गर्दीतून ते जगापुढे वेगळेपणानं येतच नाहीत. अशाच काही चेहऱ्यांना जगापुढे आणण्याचा हा प्रयत्न... गर्दीतला वेगळा चेहरा डॉ. मधू ओसवाल. बिहारमधलं एक होस्टेल.

Sunday, January 29, 2012 AT 06:24 PM (IST)

जसजशी महाराष्ट्रातील इतर शहरं वाढत जातील, तसतशा शहरांना भेडसावणाऱ्या समस्यांना त्यांनाही तोंड द्यावं लागणार आहे. आपल्या शहरांची स्वत:च एक कचराकुंडी बनण्याकडे जी वाटचाल होताना दिसते आहे ती टाळायची असेल तर शहरांत राहणाऱ्या नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. इंधन निमिर्तीसाठी कचऱ्याच्या उपयोगासारखे प्रयोग शहरांमध्ये करता येतील... शहरीकरणाला जोडून येणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक आहे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही.

Sunday, January 29, 2012 AT 06:17 PM (IST)

घर सांभाळणारी स्त्री घराचं आर्थिक नियोजनही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. गरज असते ती त्यासाठीच्या आत्मविश्‍वासाची. सध्याच्या काळात स्त्रियांनी गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाबाबत स्वावलंबी असणं गरजेचं आहे. यासाठीचे गुंतवणुकीचे हे मार्ग. तुम्हाला या नव्या वर्षात आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारेही... भारतीय घरात "स्त्री' ही घराचा केंद्रबिंदू असते.

Sunday, January 29, 2012 AT 06:08 PM (IST)

माणसाच्या नावाभोवतीच त्याचं आयुष्य उभं राहतं. नाव नावडतं असेल तर काहीजण कायदेशीर मार्गाने आपलं नाव बदलून घेतात. पण काही मुलींच्या नावातच त्यांना जन्माला येण्याचा, सन्मानाने जगण्याचा हक्क नाकारला जातो. "नकोशी' किंवा "नकुशी'सारखी नावं आता बदलली जात आहेत. पण पोटच्या मुलींना अशी नावं ठेवणारी मानसिकताच मुळातून बदलण्याची गरज आहे. असं घडलं तरच "लेक होती नावडती'ची गोष्ट याच शतकात संपेल.

Thursday, January 19, 2012 AT 07:50 PM (IST)

हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे निस्तेज होते. त्यासाठी मिनरल सप्लिमेंटेशनसारख्या थेरपी वापरता येतात. "स्पा'च्या नव्या थेरपी स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.... उत्तम बाह्यरंग हाच निरोगी शरीराचा चेहरा आहे. "स्पा'च्या नव्या थेरपीसाठी हेच तत्त्व लागू आहे. पाण्यातील घटकांचा शरीर आणि मनावर चांगल्या रीतीने उपयोग कसा करून घेता येतो याचा अभ्यास करून ही थेरपी तयार केली आहे. ते एक उत्तम तंत्रही आहे.

Wednesday, January 18, 2012 AT 04:45 PM (IST)

डिसेंबर-जानेवारी म्हणजे कडक थंडीचे दिवस. काही प्रदेशांमध्ये तर या काळात बर्फवृष्टीही होते आणि मग रंगतात निरनिराळे खेळ आणि स्पर्धा. स्किइंग हा त्यापैकीच एक प्रकार. स्किइंग हा बर्फावरून घसरत जाण्याचा क्रीडाप्रकार ब्रिटनमध्ये लोकप्रिय आहे. काही हौशी पर्यटक एखाद्या चांगल्या प्रशिक्षणसंस्थेत तात्पुरतं प्रशिक्षण घेऊन स्किइंगच्या साहाय्याने दूरच्या प्रवासाला निघतात.

Wednesday, January 18, 2012 AT 04:42 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: