मुंबई - "महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निष्प्रभ नेते ठरतील तर शिवसेना महाराष्ट्राच्या इतिहासात जमा झालेली असेल,'' असे भाकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. निवडक पत्रकारांशी ते बोलत होते. शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रतिस्पर्धी पक्षाची मदत आपण घेतली असल्याचे समीकरणही त्यांनी या वेळी मांडले.
पुणे - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर होणारी पहिलीच महापालिका निवडणूक लढवणाऱ्या 4160 महिला उमेदवारांपैकी तब्बल 85 टक्के महिला पहिल्यांदाच निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. या निवडणुकांमध्ये राजकीय वारसा न सांगता शहराच्या कारभारिणी बनू इच्छिणाऱ्या महिलांची संख्या जशी लक्षणीय आहे, तशीच गृहिणींची संख्याही जवळपास 80 टक्के आहे.
मुंबई - लग्नसराई आणि गुंतवणूक या दोन्हींसाठी मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदी या मूल्यवान धातूंचे भाव आज (ता.8) चांगलेच वधारले. मुंबई सराफा बाजारात सोने 10 ग्रॅममागे 28 हजार 530 रुपयांवर पोहोचले तर चांदी प्रतिकिलो 57 हजार 300 रुपयांवर गेली. सोन्यातील गुंतवणूक गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
नागपूर - व्याघ्रप्रकल्प व वाघाचे अस्तित्व असलेल्या वनक्षेत्राच्या संनियंत्रणाच्या चौथ्या टप्प्याला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. विदर्भातील तीन व्याघ्रप्रकल्पासह इतर क्षेत्रातील वाघांचे छायाचित्र टिपण्यासाठी साडेअकराशेपेक्षा अधिक कॅमेरे, 800 कम्पॉस आणि 242 "रेंज फाईंडर' चा वापर केला जाणार आहे. ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पाचा परिसर समतल असल्याने येथे "रेंज फाइंडर'चा वापर करण्यात येणार आहे.
नाशिक - क्षय रोगाने पोखरलेले देह, साप, वाघ किंवा उंदरांनी कुरतडलेले पाय, अस्वलाच्या पंजांनी बोचकारून काढलेले चेहरे घेऊन शे-सव्वाशे किलोमीटर जंगल तुडवत येणारे माडिया गोंड आदिवासी.
पुणे - शिकारी पक्षी आणि त्यांच्या संरक्षणासाठी अभ्यासाची आवश्यकता, या मुख्य उद्देशाने येथील ईला फाऊंडेशनतर्फे येत्या शनिवारी (ता. ११) विशेष माहितीपट दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निसर्गसेवक संस्थेने प्रायोजित केला असून, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) टाटा सभागृहात होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे डॉ. सतीश पाटील आणि राजगोपाल पाटील यांनी येथे दिली. या कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क नाही.
मुंबई - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सुमारे 65 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला. राज्यभरातील संपूर्ण निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे. मतदानाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी 13/7 ला झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांना पैसे पुरवल्या प्रकरणी राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला दहशतवादी हरून रशीद नाईक याने अल्-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनची भेट घेतली होती, अशी खळबळजनक माहिती तपासात पुढे आली आहे. पाकिस्तानातील बहावलपूर येथे "जिहादी' कारवायांचे प्रशिक्षण घेत असताना नाईक लादेनला भेटला होता.
मुंबई - "राज्य सरकारने मुंबई घाण करायची, ती घाण महापालिकेने साफ करायची. पालिका म्हणजे घरगडी वाटली का? या लोकांना मुंबईतील पैसा दिसतो, पण मुंबईकर दिसत नाही,'' अशी आरोपांची फैरी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज झाडल्या. ""मुंबईत कोणतीही मतपेटी उघडल्यावर भगवा फडकलाच पाहिजे कोणतेही फडके दिसू देऊ नका,'' असे आवाहन त्यांनी वरळी येथील महायुतीच्या प्रचारसभेत केले. उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर आसूड ओढले.
जळगाव - राज्यातील वेगवेगळ्या पक्षांच्या असलेल्या तेरा केंद्रीय कामगार संघटनांतर्फे सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत योग्य निर्णयाच्या लढ्याबाबत 28 फेब्रुवारीला देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय सर्व संघटनांतर्फे घेण्यात आला. याबाबतची घोषणा भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे यांनी केली. सातारा येथे भारतीय मजदूर संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. अधिवेशनात राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात श्री.
मुंबई - बैलगाड्यांच्या तसेच बैलांच्या शर्यतीवर बंदी लादण्यात आली असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. नवी मुंबईतील गृहिणी नंदिनी मराठे यांची ही याचिका असून, तिच्यावर आठवड्याभरात खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेषतः राज्याच्या ग्रामीण भागात भरणाऱ्या जत्रांमध्ये बैलांच्या झुंजी, बैलगाड्यांच्या शर्यती आदी प्रकार होतातच.
पुणे - राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरीहून दोन ते तीन अंशाने वाढले आहे. गुरुवारनंतर (ता. 9) त्यात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे राज्यात थंडी गायब झाल्याचे चित्र असून, उकाडा जाणवत आहे. पश्चिमी चक्रावात जम्मू- काश्मीरवर दाखल झाल्याने हरियाना, पंजाब, राजस्थान व उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. देशाच्या उर्वरित भागात बहुतेक ठिकाणी किमान तापमान वाढले आहे.
मुंबई - महानिर्मितीची कामगिरी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासूनच ढासळली आहे. वीजनिर्मिती घटल्यामुळे महावितरणला 800 ते 1000 मेगावॉट वीज खुल्या बाजारातून घ्यावी लागते त्याची झळ आता ग्राहकांना बसणार असून, वीजवापरासाठी दरमहा 100 ते 200 रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे. महानिर्मितीकडून महापारेषणमार्फत महावितरणला वीज मिळते. कोळशाच्या तुटवड्याचा फटका देशातील सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना बसला होता.
पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षेला नऊ विभागीय मंडळातून 13 लाख 17 लाख 46 हजार 305 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीला 17 लाख 11 हजार 214 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी ही माहिती दिली.
मुंबई - येत्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकांसाठी दहा हजार उमेदवार रिंगणार उतरले आहेत. माघारीची मुदत संपल्यानंतर 10 ठिकाणी मिळून 9732 उमेदवार मैदानात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी प्रत्येक प्रभागात किमान चौरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होतील. सर्वाधिक म्हणजे 2233 उमेदवार मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. मुंबईत 227 जागांसाठी निवडणूक होणार आहे.