मुंबई - भारतीय अभिजात संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींमुळे कालची (बुधवार) सायंकाळ येथील हॉटेल इंटरकाँटिनेंटल - द ललित गजबजून गेले होते. प्रसिद्ध गझलगायक जगजितसिंह यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'जगजितसिंह - यादों का सफर' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या तरुण दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे अतुल काळे. "मातीच्या चुली' या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून यशस्वी पदार्पण केल्यानंतर अतुलने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अतुलने "स्ट्रगलर', "देह', "विरुद्ध', "लाईफ हो तो ऐसी', "रक्त' आणि "लालू प्रसाद यादव' या सिनेमांसाठी अतुलने सहायक दिग्दर्शकाचे काम पाहिले.
मुंबई - रवींद्रनाथ टागोरांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या 'चित्रांगदा' या प्रेमकथेवर आधारित नृत्यनाटिकेचा पहिला प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. या नाटकाच्या निमित्ताने टागोरांच्या साहित्याचे नाट्यरूपांतर पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. या प्रयोगाला अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी सिक्रेट व्हिजिटही दिली होती. भारतीय राष्ट्रगीताचे शिल्पकार आणि आपल्या असाधारण साहित्यकृतींनी टागोरांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते.
मुंबई - महापालिकांच्या निवडणुकींचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. त्यात मराठी सेलिब्रेटीजचा सहभाग मोठा आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी स्लॅप युवर वोट हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईतल्या दैनंदिन आयुष्यात माणूस अनेक समस्यांना तोंड देत असतो. या समस्यांशी दोन हात करताना महापालिकेच्या नावाने नेहमीच बोट मोडत असतो. मात्र, आपण मतदान न केल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा विसर त्याला पडतो.
मुंबई - चित्रपटसृष्टीत नावलौकिक प्राप्त झाल्यानंतर काही कलाकार चित्रपटनिर्मितीकडे वळतात. आपल्याला आवडणाऱ्या विषयावर ते चित्रपटाची निर्मिती करतात. यापूर्वी शाहरूख खान, अक्षय कुमार, लारा दत्ता, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, प्रीती झांगीयानी आदी कित्येक कलाकारांनी चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि आपले नशीब अजमावले आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल अभिनेता दिनो मोरियाने टाकले आहे.
मुंबई - अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा खान मराठी नाटकात काम करीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध "चित्रांगदा' या कादंबरीवर बेतलेल्या चित्रांगदा या नृत्यनाटिकेत साराने काम केले आहे. तिला आशीर्वाद देण्यासाठी खास सैफ अली खान प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात उपस्थित राहिला होता. त्या वेळी त्याच्यासोबत करिना कपूरही होती. या दोघांनी अगदी मनमुरादपणे या नृत्यनाटिकेचा आस्वाद घेतला.
मुंबई - उद्योजक सिद्धार्थ मल्या याच्यापासून वेगळी झाल्यानंतर, दीपिका पदुकोनने तिचा जुना मित्र निहार पंड्या याच्याबरोबर पुन्हा सूत जुळविण्यास सुरवात केली आहे. दीपिका मॉडेलिंग करत असताना तिचे नाव निहारबरोबर जोडले जायचे. "ओम शांती ओम'च्या चित्रिकरणाच्या दिवसांमध्ये ती निहार बरोबर राहत असल्याचीही चर्चा होती. तरीही निहार तिचा "चांगला मित्र' म्हणूनच ओळखला जात होता.
"तुजवीण सख्या रे'मधील अगदी मॉडर्न मुलगी आणि आता "पुढचं पाऊल'मधील टिपिकल गृहिणी अशा परस्परविरोधी भूमिका लीलया साकारणाऱ्या जुई गडकरीने रसिकांच्या मनात आपले स्थान भक्कम केले आहे. उच्चविद्याविभूषित असलेली जुई सध्या मुंबईत राहत असली तरी ती मूळ कर्जतची. तिथे त्यांचा मोठा वाडा होता. कालौघात आता तेथे अपार्टमेंट झाले असले तरी कर्जतच्या घराला जुई कधीच विसरू शकत नाही. त्या घराबद्दलचे तिचे मनोगत... कर्जतमध्ये आमचं मोठं घर आहे.
मुंबई - बॉलिवुडमध्ये सध्या दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, ती करीना कपूरची. अलिकडेच एका प्रसिद्ध दैनिकाने करीना एका विमानतळावर आलेली असताना, एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने तिचे छायाचित्र टिपले. आपली छाबी कोणी टिपत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. मात्र ते प्रसिद्ध झाल्यापासूनच दबक्या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा आहे ती गर्भवती असल्याची. खरेच गर्भवती आहे काय? विमानतळावर आलेल्या करीनाने हिरव्या रंगाचा लांब टीशर्ट घातला होता.
अनंत महादेवन आता घेऊन येतायत स्टेईंग अलाईव्ह हा सिनेमा. ज्यात ते स्वतः दिग्दर्शनासोबतच अभिनयही करणार आहेत. हा सिनेमा म्हणजे एक डार्क कॉमेडी असेल. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा एकाला मरणाची भीती आहे, तर दूसऱ्याला त्याची सवयच झाली आहे. एका रुग्णालयात या दोन्ही पात्रांची भेट होते. एक आहे पत्रकार तर दुसरा अंडरवर्ल्ड डॉन. या दोघांची ओळख होते रुग्णालयातील बेडवर, जिथे हे दोघे एकाच आजाराशी लढत असतात.
देसी बॉईजमध्ये अक्षय आणि जॉनने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती. आता बॉलिवुडमध्येही अशा भूमिकांना चांगलाच वाव मिळू लागलाय. बॉलिवूडचा आणखी एका स्टार, असा बोल्ड रोल करण्यासाठी सज्ज झाला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा देसी बॉईज या सिनेमात अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमने मेल स्ट्रिपर्सची भूमिका केली होती.   आता रणदीप हूडाही काहीशा अशाच भूमिकेत दिसणार आहे. मात्र, रणदीप हा जॉन आणि अक्षयच्या एक पाऊल पुढे गेलाय.
मुंबई- अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जेनेलिया हे आज (शुक्रवार) ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये दुपारी 12 च्या सुमारास विवाहबद्ध झाले. शाही विवाहाला चित्रपटसृष्टीबरोबरच राजकीय नेतेही उपस्थित होते. रितेशची वरात ग्रॅंड हयाच्या मैदानातून दिमाखात वरात काढण्यात आली होती. यावेळी त्याने पांढरा शेरवानीवर लाल फेटा परिधान केला होता. यावेळी नववधू जेनेलियाही साडी, नथ, मुंडावळ्यामध्ये ती शोभून दिसत होती.
मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळी भारताबरोबरच परदेशातही चित्रीकरणासाठी पोहोचलेली आहे. कित्येक चित्रपटात स्वीत्झर्लंड, लंडन, इटाली, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे विविध देश आपण पाहिलेले आहेत. पाकिस्तानातही काही चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. परंतु अलीकडच्या काळात तेथील एकूणच कायदा-सुव्यवस्था पाहता कोणताही चित्रपट निर्माता-दिग्दर्शक पाकिस्तानमध्ये चित्रीकरण करण्याचे धाडस दाखवीत नाही.
मुंबई -मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत गेली कित्येक वर्षे काम करणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता वेगळी इनिंग खेळणार आहे. "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. "शेजारी शेजारी', "लपंडाव', "क्षण' या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सचिन पारेकरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बदलत चाललेल्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.
मुंबई - "अग्नीपथ' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी संजय दत्त याने दिलेल्या पार्टीत, फराह खानचा पती शिरीष कुंदर याने शाहरुख खान याला उद्देशून अपशब्द वापरले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या किंग खानने त्याला थप्पड मारली होती. मंगळवारी संध्याकाळीच त्यांच्यातील वाद संपला असल्याचे, त्या दोघांचा मित्र साजिद नडियादवाला याने सांगितले. या घटनेनंतर पार्टी संपल्यावर शाहरुख खानच्या घरी जाऊन साजिद आणि शिरीष यांनी हा वाद मिटविला.