Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


मराठवाडा
परभणी - साहित्य व सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरलेले नटराज रंगमंदिर महापालिका प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणासह देखभाल दुरूस्ती अभावी काही वर्षांपासून बेवारस स्थितीत खितपत पडले आहे. दरम्यान, रंगदेवतेचे हे सभागृह दयनिय अवस्थेत सापडल्याने साहित्यासह सांस्कृतिक चळवळी खुंटल्या आहेत. "नटराज...' परभणीचे वैभव या शहरासह जिल्ह्यास साहित्यासह नाट्य व सांस्कृतिक चळवळीचा मोठा वारसा आहे.

Thursday, February 09, 2012 AT 02:00 AM (IST)

औरंगाबाद -  विकास आराखड्यानुसार शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू असून बुधवारी (ता. 8) जुनाबाजार येथे महापालिकेचे पथक मालमत्ता हटवत असताना एक वृद्ध जखमी झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महापालिकेच्या पथकावर दगडफेक केली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ परिस्थिती ताब्यात घेत दगडफेक करणाऱ्यांना पिटाळून लावले.

Thursday, February 09, 2012 AT 01:45 AM (IST)

औरंगाबाद - टपाल विभागाने त्यांच्या अधिकृत एजंटांचे वेगवेगळ्या गुंतवणूक योजनेचे कमिशन अर्धा टक्का केल्याने अनेक गुंतवणूक योजना कमालीच्या प्रभावित झाल्या असून पोस्टाचे उत्पन्न घटले आहे. पोस्टातील जवळपास 70 टक्के गुंतवणुकीच्या योजना एजंटांच्या माध्यमातून चालतात. मात्र, कमिशन फक्त अर्धा टक्का असल्याने एजंटांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. आधीच संकटात असलेला टपाल विभाग आणखी जास्त संकटात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 01:45 AM (IST)

नांदेड - राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता व पर्यावरण जनजागृतीसाठी देशातील तरुणाईंसमवेत संवाद साधण्यासाठी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "भारत जोडो अभियाना'ला यावर्षी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते काश्‍मीर व अरुणाचल ते गुजरात या दोन्ही "भारत जोडो अभियाना'त सहभागी झालेले सर्व युवक-युवती व संयोजकांचे बाबांच्या स्मृतिदिनी आनंदवनात गुरुवार (ता. नऊ) आणि शुक्रवारी (ता.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

औरंगाबाद - वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत निराधार मुलांना बालगृहांमध्ये राहता येते. मात्र, त्यापुढील वयाच्या मुलांची कोणतीच सोय नसल्यामुळे आपल्या पुढील वाटचालीचे काय, असा भला मोठा प्रश्‍न घेऊनच बाहेर पडावे लागते. आता त्यांना पुनर्वसनाची आणखी एक संधी मिळणार आहे.

Thursday, February 09, 2012 AT 01:15 AM (IST)

औरंगाबाद - जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 67.77 टक्के, तर पंचायत समितीसाठी सरासरी 67.11 टक्के मतदान झाले. अंधारी, भवन, बिडकीन, लोहगाव, वाहेगाव या जिल्हा परिषद गटांमध्ये सर्वाधिक 76 टक्‍क्‍यांवर मतदान झाले. सर्वांत कमी मतदान रांजणगाव शेणपुंजी, वडगाव कोल्हाटी व सातारा गटात झाले.   जिल्हा परिषदेच्या साठ गटांसाठी व नऊ पंचायतींच्या एकूण 119 गणांसाठी मंगळवारी (ता.सात) मतदान झाले.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

जालना - उच्च शिक्षणात स्थानिक गरज लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ क्षेत्र असावे, अशी महत्त्वाची शिफारस उच्च शिक्षण विभागाला डॉ. अनिल काकोडकर यांच्या समितीने केली आहे. ज्ञान, विकास व मनुष्यबळ साधने वाढावीत यासाठी विद्यापीठ असण्याची गरज व्यक्‍त करण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक विद्यापीठ क्षेत्रात या बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जाते. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

नांदेड - नांदेड महापालिकेला येत्या मार्चअखेर मालमत्ता कराची 17 कोटी तीन लाख रुपयांची वसुली करावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अद्याप 50 टक्केही वसुली झाली नाही. मोठ्या प्रमाणावर मालमत्ताकराची थकबाकी असून ती वसूल करण्यासाठी महसूल विभागाने क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक याप्रमाणे सहा पथकेही नेमण्यात आली आहेत. 11 कोटींचीच झाली वसुली महापालिकेच्या हद्दीत निवासी, अनिवासी आणि संमिश्र असे 84 हजार 991 मालमत्ताधारक आहेत.

Thursday, February 09, 2012 AT 01:15 AM (IST)

औरंगाबाद - शहरामध्ये मोठ्या संख्येने बोगस रेशनकार्ड असल्याचे सर्वश्रुत आहे. दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) संपूर्ण रेशनकार्डच बोगस मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कार्डावर रेशनदुकानदार धान्य देत नसल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीकडील "बीपीएल'चे रेशनकार्डच "डुप्लिकेट' असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी राहुल गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ते रेशनकार्ड जप्त केले.

Thursday, February 09, 2012 AT 01:30 AM (IST)

हिंगोली - जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतदान झाल्यानंतर उमेदवार व समर्थकांची आकडेमोड सुरू झाली आहे. आपल्या उमेदवाराला कोणत्या गावातून किती मते मिळतील, विरोधकाचे कसे राहील याचे आखाडे बांधले जात असून, जय-पराजयाची गणिते मांडली जात आहेत. तर कोण निवडून येणार याची उत्कंठा मतदारांत आहे. जिल्ह्यातील गट-गणांतील उमेदवारांचे समर्थक वही-पेन हातात घेऊन कोणत्या गावात किती मतदान झाले याची आकडेवारी जाणून घेत आहेत. यावरून कोणाला किती मतदान झाले.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

हिंगोली - वडिलांसोबत भिक्षा मागण्यासाठी गावोगाव फिरणारी नाथजोगी समाजातील पंचवीस मुले आता संगणक शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत. पाच विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीपूर्व (एसएचजी) अभ्यासक्रमास बसले आहेत. कोथळज भागात नाथजोगी समाज हिंगोली तालुक्‍यातील कोथळज भागात नाथजोगी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय मसनजोगी समाजाचीही संख्या या भागात जास्त आहे. मात्र या समाजातील मुलांना शिक्षणाचा गंधही नाही.

Thursday, February 09, 2012 AT 01:30 AM (IST)

हिंगोली - जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत खर्च करण्यातही उमेदवारांत चढाओढ बघायला मिळाली. अंदाजे दहा कोटी रुपयांचा चुराडा झाला असून, बहुतांश ठिकाणी मतदारांनी मोकळ्या हाताने पैसे घेतले, तर ओल्या पार्ट्यांतून दारूही मुक्‍तहस्ते वाटप झाली. भांड्याकुंड्यापासून साड्या, धोतरजोड्या ते रोख पैशांपर्यंत सारे काही मतदारांना वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीत या वेळी मोठी स्पर्धा दिसून आली. सर्वच पक्षांचे सवतेसुभे होते.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

बीड - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी मतदान होताच मतदारसंघातून नेते गायब झाले आहेत. खासदार गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके आणि आमदार पंकजा पालवे बुधवारीच (ता.8) महानगरपालिकांच्या प्रचारासाठी मुंबई, पुण्याकडे रवाना झाले आहेत. तर स्थानिकचे उर्वरित नेते बूथनिहाय झालेल्या मतदानावरून वेगवेगळे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

नांदेड - "सकाळ शॉपिंग उत्सव'चे नांदेड येथे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार (ता. दहा) पासून या उत्सवाला सुरवात होणार आहे. ता. 10 ते 15 फेब्रुवारी असे सहा दिवस चालणाऱ्या या शॉपिंग उत्सवात अत्याधुनिक उपकरणे, गृहपयोगी साहित्य, दैनंदिन जीवनात आवश्‍यक असलेल्या दर्जदार आणि नामांकित कंपन्यांच्या विविध वस्तू विक्रीसाठी राहणार आहेत. चार महिन्यांपूर्वी "सकाळ फूड फेस्टिव्हल'ला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

बीड - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालांचे गणित जुळविण्यात कार्यकर्ते दंग आहेत, त्यातच प्रमुख नेत्यांच्या प्रचारातील गैरहजेरींच्या कारणांचीही मीमांसा होऊ लागली आहे. यामध्ये कुणाचे आजारपण, काहींची नाराजी, काहींना डावलले तर अनेकांनी जाणीवपूर्वक दांडी मारल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. मंगळवारी (ता. सात) सायंकाळी मतदान यंत्रे सील होताच गावांतील पार आणि चौकांत निकालाचा अंदाज आणि विजयांचे गणित जुळविताना कार्यकर्ते दंग असल्याचे चित्र आहे.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: