Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


मुक्तपीठ
स्वयंपूर्ण झाल्याचे आपण समजतो पण नेत्रदानाच्या क्षेत्रात आपल्याकडे अंधारच आहे. आपली गरज थोडीबहुत भागवतो तो श्रीलंकेसारखा देश! आपल्याकडे आज सुमारे एक कोटी लोक दृष्टिहीन आहेत. नेत्रदान करून आपण त्यांच्या आयुष्यात प्रकाश नक्की आणू शकतो. शेवटी "दृष्टिविना सृष्टी व्यर्थ आहे...' माझ्याबाबतीतील घडलेली ही घटना. माझ्या घरातील वातावरण सामाजिक. माझी बहीण मीरा 2008 मध्ये अचानक वयाच्या 38 व्या वर्षी गेली.

Thursday, February 09, 2012 AT 12:05 PM (IST)

"व्हॅल्यू' म्हणजे फक्त किंमत नाही, तर मूल्य, मोल व संस्कार यांचे एक वेगळे मिश्रण असते. अर्थात, ही संकल्पना व्यक्तिसापेक्ष असते. प्रत्येक व्यक्तीनुसार आणि पिढीनुसार ती बदलत जाते याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलाय... मध्यंतरी एका कॉलेजमध्ये "व्हॅल्यू इंजिनियरिंग' हा विषय शिकवण्याची संधी मिळाली. त्या वेळी झालेल्या चर्चेतून "व्हॅल्यू' या शब्दाचे विविध पैलू स्पष्ट करावे लागले.

Tuesday, February 07, 2012 AT 09:19 AM (IST)

ते सुंदर उद्यान, त्यात बागडणारे ते पक्षी... उद्यानात बसलेल्या आम्ही मैत्रिणी. इच्छा एकच होती, सुरेख पाऊस यावा अन्‌ त्याचा आनंद घेता यावा... जणू आमची इच्छा कळाल्याप्रमाणे मस्त सर आली आणि नंतर दिसले इंद्रधनुष्य... कसा व्यक्त करायचा तो आनंद शब्दांत? मी आणि माझ्या मैत्रिणी अशाच एके दिवशी पु. ल. देशपांडे उद्यानात गप्पा मारण्यासाठी, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी गेलो. तेव्हा पावसाळ्याचे दिवस चालू होते. दोन-तीन दिवस पावसाचा काही पत्ता नव्हता.

Monday, February 06, 2012 AT 07:52 AM (IST)

आपल्याजवळ भरपूर असताना दुसऱ्याला काही देण्यात विशेष काही नाही पण मुळात आपल्याजवळ थोडं असताना त्यातून दुसऱ्याला काही देण्याची इच्छा होणं हे फार मोठ्या मनाचं लक्षण. या गृहस्थानं आमच्यासाठी आणलेली भेट त्यामुळेच आम्ही स्वीकारली... माझे पती 2007 मध्ये निवृत्त झाले आणि आम्ही दोघं पुण्याला कायमचं राहण्यासाठी आलो. या पूर्वी आमचं कुटुंब नांदेडला राहत होते. माझे पती एका नामांकित कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करीत होते आणि ते विद्यापीठात डीन पण होते.

Thursday, February 02, 2012 AT 01:33 PM (IST)

आज साठी शांत होताना मन मात्र अशांत आहे. वाढती जीवघेणी स्पर्धा, अपघात, खून यांचे वाढत चाललेले प्रमाण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार दिसला, की मन उद्विग्न होते. वाईट गोष्टींची आहुती दिली गेल्यावरच खरी शांतता लाभेल... वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्या दिवशी मला 61 वे वर्ष लागले. सकाळीच मुलाने व सुनेने माझा आवडता "पाइनापल पेस्ट्री' समोर ठेवून मला कापायला लावले आणि माझे तोंड गोड केले. दिवसाची सुरवात छान गोड झाली.

Saturday, January 28, 2012 AT 04:43 PM (IST)

आज साठी शांत होताना मन मात्र अशांत आहे. वाढती जीवघेणी स्पर्धा, अपघात, खून यांचे वाढत चाललेले प्रमाण आणि बोकाळलेला भ्रष्टाचार दिसला, की मन उद्विग्न होते. वाईट गोष्टींची आहुती दिली गेल्यावरच खरी शांतता लाभेल... वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्या दिवशी मला 61 वे वर्ष लागले. सकाळीच मुलाने व सुनेने माझा आवडता "पाइनापल पेस्ट्री' समोर ठेवून मला कापायला लावले आणि माझे तोंड गोड केले. दिवसाची सुरवात छान गोड झाली.

Saturday, January 28, 2012 AT 08:28 AM (IST)

कोणा विघ्नसंतोषी माणसानं तोडलेलं ते घरटं, त्यातली ती निरागस पिलं आणि त्यांचे केविलवाणे आई-बाबा. मी त्या पिलांना थोडं सांभाळलं आणि पुढचं कर्तव्य त्यांच्या आई-बाबांनी पार पाडलं. पंखांत बळ आल्यावर पिलं उडून गेली खरी पण जाताना मला निःस्वार्थीपणाची शिकवणही त्यांनी दिली... चैत्र महिन्याला नुकतीच सुरवात झाली होती. झाडांची पानगळपण चांगलीच होत होती. दुपारच्या वेळी ग्रंथालयात बसले असताना, अचानक खिडकीकडे लक्ष गेले.

Tuesday, January 24, 2012 AT 08:18 AM (IST)

आम्ही जिवावरच्या संकटातून बचावलो होतो. आता प्रश्‍न होता तो चेपलेल्या गाडीचे काय करायचे हा. अपघातानंतर अडचणीत असलेल्यांना नशिबाने मदत मिळते, असे ऐकले होते. आम्हाला मात्र योगेशच्या रूपाने देव भेटला... अपघातानंतर अडचणीत असलेल्यांना केवळ नशिबानेच मदत मिळते. माणुसकीला स्मरून निरपेक्ष भावनेने मिळालेल्या मदतीचे मोल ठरविणे केवळ अशक्‍य आहे परंतु कृतज्ञता व्यक्त करणे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. असाच एक प्रसंग माझ्या स्मरणात राहिला आहे.

Monday, January 23, 2012 AT 08:24 AM (IST)

विद्यार्थ्यांच्या त्या जगात मी रमून गेले. आठ आण्यांची चूक कबूल करणारा मुलगा, दुसऱ्यांचा डबा खाणारा आणि आज एक नामवंत सर्जन बनलेला मुलगा, मला साक्षात आई मानणारा मुलगा... माझे हे विद्यार्थी आता खूप मोठे झाले आहेत आणि तोच माझा अनमोल ठेवा आहे... लहानपणी माझे एक स्वप्न होते, शिक्षक होण्याचे. माझे वडील- गुरुवर्य बाबूराव जगताप- महाराष्ट्रातील एक थोर शिक्षणतज्ज्ञ. त्यामुळे त्या क्षेत्रातील निरनिराळ्या छोट्या मोठ्या लोकांची ये-जा आमच्या घरी सतत असे.

Saturday, January 21, 2012 AT 01:30 PM (IST)

राहुरी कृषी विद्यापीठात गेलो होतो माझ्या कार्यक्रमासाठी. तेथे अनपेक्षितपणे व्यंकटेश माडगूळकरांशी भेट झाली. त्यांचे ते रसदार कथाकथन ऐकण्यात मी रंगून गेलो होतो. रात्री पुण्याला जायचं कसं, हा प्रश्‍न होता. माडगूळकरांनी आपुलकीने केलेली मदत विसरता येत नाही... आज जवळजवळ 20 वर्षे झाली असतील. तो प्रसंग म्हणजे मी माझ्या आयुष्यातील वेचलेले सुवर्णक्षणच म्हणता येतील. "मुक्तपीठ'च्या वाचकांना व साहित्य प्रेमिकांना ते नक्की भावतील म्हणूनच हा लेखन प्रपंच.

Monday, January 16, 2012 AT 03:48 PM (IST)

साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट पण मनात अजूनही ताजी आहे. श्रावण महिना होता. आम्ही आमची फॅमिली स्वतःच्या गाडीने नीलकंठेश्‍वरच्या दर्शनाला चाललो होतो. खडकवासल्याहून पुढे पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. दुपारचे तीन वाजले असतील. पोचायला अजून 10 कि.मी. अंतर बाकी असेल. श्रावण महिना असल्यामुळे मंदिरात गर्दी असेल याची कल्पना होतीच. अधूनमधून बारीक पाऊस पण येत होता. गाडी माझे मिस्टर चालवत होते. मधूनच पेट्रोलचा वास येऊ लागला.

Saturday, January 14, 2012 AT 08:04 AM (IST)

1980 पूर्वी मी अनुभवलेला हा प्रसंग. त्या वेळी मी तापोळे (महाबळेश्‍वर) भागात शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होतो. उपशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत बामणोली भागातही शाळातपासणीसाठी जावे लागत असे. एकदा उपशिक्षणाधिकारी यांच्याबरोबर तापोळ्याहून लॉंचने वाघावळे या गावी गेलो. कांदाटी नदीतून प्रवास. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांच्या रांगा. गर्द हिरवाई. दोन्ही बाजूंना घनदाट जंगल. सर्वत्र पसरलेला नयनरम्य निसर्गाचा आनंद मिळत होता.

Friday, January 13, 2012 AT 08:14 AM (IST)

देव आनंद गेला त्याला महिना होत आला. या काळात कितीदा त्याची आठवण होऊन माझे डोळे भरून आले त्याला गणती नाही. ज्या दिवशी ज्या वेळी ती दुष्ट बातमी पडद्यावर पाहिली, त्या क्षणी मोठ्यांदा हंबरडा फोडावा असे वाटले होते. वास्तविक, वयाचे अर्धशतक मीही पार केले आहे. मृत्यू... तोही प्रिय माणसाचा, किती विदारक असतो हे गेल्या चार वर्षांत मी दोनदा अनुभवले होते. त्या दोन्ही घटनांमधून मानसिकदृष्ट्या सावरणे मला अत्यंत कठीण गेले होते.

Thursday, January 12, 2012 AT 08:36 AM (IST)

दिवसभराच्या धावपळीमुळे सगळेच जाम थकले होते. कार्यक्रम नेटका झाल्यामुळे सगळे आनंदी होते. कोणतंही मंगलकार्य ठरवणं सोपं असतं पण ते तेवढ्याच ताकदीनं पार पाडणं आणि पार पडणं दोन्हीही अवघड. सगळ्याच बाबी जुळून याव्या लागतात. आजच्या कार्यक्रमाचंही तसंच होतं. गेले पंधरा दिवस "त्याचं' कुटुंब हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा विचार करून तयारी करत होतं. घरातील प्रत्येकाला कामे नेमून दिलेली होती.

Wednesday, January 11, 2012 AT 06:54 PM (IST)

सुमारे 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे पण आजही त्या प्रसंगाची आठवण झाली, तर माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. मी तेव्हा नववीची परीक्षा दिली होती. शाळांना मे महिन्याची सुट्टी होती. मुंबईहून माझी आत्या तिच्या मुलांना घेऊन आमच्याकडे आली होती. सगळ्यांनी कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखला. वाईजवळील धोम या गावी आम्ही गेलो. रमतगमत नदीकाठी फिरत होतो. नदीला छान पायऱ्या होत्या. आम्ही बहिणी नदीच्या काठावर बसलो. चार-पाच मुले नदीत पोहत होती.

Tuesday, January 10, 2012 AT 08:34 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: