Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


मुंबई
नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवाजी पार्कच्या मैदानावर सभा घेण्यासाठी मागितलेली परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली. उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 16 एप्रिल रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती.

Thursday, February 09, 2012 AT 05:51 PM (IST)

मुंबई - बॉलिवुडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी आज (गुरुवार) स्वतःच्या ब्लॉगवर, आपली प्रकृती ठीक नसल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. शनिवारी त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे, 'रुग्णालयात आज माझ्या पोटावर काही उपचार करण्यात आले असून, त्याची माहिती मी कुटुंबीयांना देणार आहे. शनिवारी (११ फेब्रुवारी) शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Thursday, February 09, 2012 AT 04:01 PM (IST)

मुंबई - भूस्खलन रोखण्यासाठी अंधेरी येथील गिल्बर्ट हिलला केबल नेटिंग करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने दिला. गिल्बर्ट हिल परिसरातील बांधकामांमुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने गिल्बर्ट हिलला केबल नेटिंग करण्याचा आदेश मुंबई महानगरपालिकेला दिला आहे. भविष्यात गिल्बर्ट हिल परिसरातील बांधकामावर लक्ष देण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 02:27 PM (IST)

मुंबई - विरोधकांवर शेलक्‍या शब्दांत टीका टाळणाऱ्या शिवसेना कार्याध्यक्षांनी मुंबई महापालिकेच्या मुहूर्तावर मात्र रूप पालटल्याचे दिसते आहे. एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची "दुबळे' अशी संभावना करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज यांचेच साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मुंबईतील विकासकामे बघण्यासाठी घराबाहेर पडण्याची तसदी न घेणाऱ्या राज यांना गुजरातचा दौरा करण्यासाठी मात्र वेळ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)

मुंबई - मध्य रेल्वेच्या वतीने सोमाटणे-आपटा स्थानकांदरम्यान "मेगा ब्लॉक' सुरू असल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकाचे "तीन तेरा' वाजले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या दोन ते तीन तास उशिराने दाखल होत असल्यामुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत.   सोमाटणे-आपटा स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग नवीन लाईनला जोडण्याचे काम मध्य रेल्वेने सुरू केले आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

ठाणे - महापालिकांमध्ये टक्केवारी वसूल करणाऱ्यांनी टोलनाक्‍यांवर पारदर्शकतेची भाषा करू नये, असा टोला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज ठाण्यात लगावला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी, रिपाइं महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी अजितदादा पवार ठाण्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना- भाजप युतीच्या महापालिकांमधील कारभारावरून आणि टोलनाक्‍यांच्या आरोपांवरून टोलेबाजी करीत चोख प्रत्युत्तर दिले.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या गुन्ह्याची उकल करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला यंदाचा दीपक जोग उत्कृष्ट अन्वेषणाची ट्रॉफी जाहीर करण्यात आली. आज झालेल्या गुन्हे आढावा बैठकीच्या वेळी दहा माजी पोलिस महासंचालकांच्या उपस्थितीत या ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. मुंबई पोलिस दलात अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार गेल्या सहा वर्षांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बंद झाला होता.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - "गोळाबेरीज' या चित्रपटातील "म्हैस'चा संदर्भ वगळणार असल्याचे दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांनी आज सांगितले. आम्हाला कोणत्याही वादात पडायचे नाही. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अधिकार कुणाकडे आहेत, याचा निर्णय न्यायालयच देईल. त्यामुळे तूर्तास आमच्या चित्रपटातील "म्हैस' कथेला कात्री लावणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - राज्यात आठ मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी रोजी फेरमतदान घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी केली. मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालेल्या 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समित्यांच्या निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता आयोगाने शिथिल केली असल्याची माहितीही आयोगाच्या आयुक्‍त नीला सत्यनारायण यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यत लागू असतो.

Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीचे मतदान 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलावे, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात सादर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासून 21 दिवसांनी मतदान घ्यावे, या नियमाचा दाखला त्यासाठी याचिकाकर्त्यांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक 115 मधील अपक्ष उमेदवार अनघा अतीत कोल्हे यांनी ऍड्‌. पी. एम. मोकाशी यांच्यामार्फत ही याचिका सादर केली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)

विरार - वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रासाठी जकातीऐवजी स्थानिक संस्था कर आकारत आहे. या संस्था करामुळे व्यापारी आणि कारखानदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. या नाराजीची दखल घेवून महानगरपालिका स्थानिक संस्था कर कमी करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)

मुंबई -शिवसेना-भाजप यांनी रिपब्लिकन पक्ष आणि दलित पॅंथरशी दगाबाजी केल्याचा आरोप दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी आज केला. महापालिका निवडणुकीत दलित पॅंथरच्या उमेदवारांचा पराभव झाल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशाराही त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने रिपाइंला दिलेल्या मतदारसंघांपैकी क्रमांक 180 आणि 126 हे वॉर्ड दलित पॅंथरला मिळाले.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

वडांगळी (जि. नाशिक) - येथील ग्रामदैवत व राज्यातील बंजारा भाविकांचे कुलदैवत सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवात दोन दिवसांत तीन लाख भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. बंजारा भाविकांनी बोलीभाषेत गाणी म्हणत सामतदादाच्या नावाने कौल मागितला. यात्रेच्या माघ पौर्णिमेच्या मुख्य दिनी जिल्हा परिषदेचे मतदान असल्यामुळे यात्रेकरूंची संख्या कमी होती. आज दुसऱ्या दिवशी संख्येत भर पडली. चाळीसगाव (जि.

Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)

मुंबई - म्हाडाच्या गेल्या वर्षीच्या सोडतीत दलालांनी मिळून केलेल्या "425 घोटाळा' प्रकरणी आता फक्त 17 दलाल आणि दोनदा यशस्वी ठरणाऱ्या 29 अर्जदारांविरुद्ध नव्हे तर चौकशीअंती बोगस ठरलेल्या सर्व 334 अर्जदारांविरुद्ध फिर्याद (एफआयआर) नोंदवली जाणार आहे. शिवाय हे प्रकरण आर्थिक गुन्ह्याचे असल्याने पोलिस उपायुक्तही त्यात लक्ष घालत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - लग्नसराई आणि गुंतवणूक या दोन्हींसाठी मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदी या मूल्यवान धातूंचे भाव आज (ता.8) चांगलेच वधारले. मुंबई सराफा बाजारात सोने 10 ग्रॅममागे 28 हजार 530 रुपयांवर पोहोचले तर चांदी प्रतिकिलो 57 हजार 300 रुपयांवर गेली. सोन्यातील गुंतवणूक गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - सुरेश कलमाडी यांना आमच्या कॉंग्रेसने पक्षातून निलंबित केले असले तरी ते पुण्याचे खासदार आहेत, ते स्वगृही परतल्यावर त्यांचे समर्थक फटाके वाजवत असतील तर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. शिवाय ते परतले म्हणून चार लोक एकत्र आले तर त्यात चर्चा करण्यासारखे फारसे काही नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. आज पुणे येथे झालेल्या कलमाडींच्या स्वागताबद्दल प्रश्‍न विचारले असता त्यांनी नरो वा कुंजरोवा अशा आशयाचे प्रतिपादन केले.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

ठाणे - चौतीस बूथवर प्रतिनिधी व मतमोजणीसाठी प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी आणि ऐन वेळी कोणत्याही कार्यकर्त्याकडे जात पडताळणी सर्टिफिकेट नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकाने आपल्या नगरसेवक सहकाऱ्यालाच डमी उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे. महापालिकेच्या दिवा-दातिवली-साबे प्रभागात हा गमतीदार प्रकार घडला असून, डमी उमेदवार मानपाडा-कोलशेत प्रभागात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजातील गाणे रसिकांना "कहानी' या चित्रपटाद्वारे ऐकायला मिळणार आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या "एकला चालो रे' या कवितेवर हे गाणे आधारित आहे. "अग्निपथ', "कभी कभी' या चित्रपटांतील कविता तसेच "मेरे पास आओ', "रंग बरसे', "मेरे अंगने में' किंवा अगदी अलीकडचे "बुढ्ढा होगा तेरा बाप' अशी अमिताभच्या आवाजातील गाणी लोकप्रिय आहेत.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या डीसी-एसी परिवर्तनामुळे सीएसटी-वांद्रे-अंधेरी या हार्बर मार्गावरील मध्य रेल्वेच्या सेवेत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोंधळ सुरू आहे. गाड्या उशिरा सुटणे, ऐनवेळी लोकल रद्द होणे अशा घटना सर्रास घडत आहेत. मात्र ही समस्या लवकरच सुटण्याची शक्‍यता आहे. मध्य रेल्वेने सीएसटी-अंधेरी मार्गावरील सेवेसाठी यापुढे केवळ डीसी व एसी अशा दोन्ही यंत्रणेत चालू शकतील, अशा नवीन सिमेन्स रेकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांमधे आलेल्या कटुतेला आज राजधानी मुंबईत पूर्णविराम मिळाला. मुंबई महापालिकेची सत्ता खेचून घेण्यासाठी आघाडीच्या नेत्यांचे आज मनोमिलन झाले. गेल्या पंधरवड्यात एकमेकांच्या विरोधात गळे काढणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनी आज खांद्याला खांदा लावून संयुक्‍त जाहीरनामा प्रकाशित केला.

Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आश्‍वासनांचा वर्षाव करणारा "जम्बो' जाहीरनामा प्रकाशित केला. मात्र मुंबईकरांना दिलेली महत्त्वाची आश्‍वासने केंद्र सरकारी कायद्यांच्या कचाट्यात अडकणारी असल्याचे बोलले जात आहे. झोपड्यांच्या संरक्षणाचे न्यायालयात भिजत घोंगडे असताना, 1995 ते 31 डिसेंबर 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची ग्वाही आघाडीने दिली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:00 AM (IST)

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार "टू-जी स्पेक्‍ट्रम' घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाळा, छगन भुजबळ यांच्या ट्रस्टचा घोटाळा, अशा अनेक घोटाळ्यांमध्ये अडकले आहे. आमच्या घरातीलच काही विरोधात उठले असून दारातील भ्रष्टाचारी त्यांना सामील झाले आहेत. मात्र त्यांना झालेल्या राजकीय मोतीबिंदूवर आमच्याकडे इलाज आहे, अशी फटकेबाजी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज कुर्ला परिसरातील शिवसेना-भाजप-रिपाइं उमेदवारांच्या प्रचारसभेत केली.

Thursday, February 09, 2012 AT 03:00 AM (IST)

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा प्रचार उद्या (ता. 9) वांद्रे येथील संयुक्‍त सभेतून सुरू होईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत सरकारी वसाहतीमधील मैदानावर सायंकाळी चार वाजता आघाडीची जाहीर सभा होणार आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:00 AM (IST)

मुंबई - आपले घर तयार होताना आणखी कुणासाठी तरी एक छानसे घर तयार झाले तर? ही सुंदर कल्पना पुण्यात प्रत्यक्षात साकारते आहे. शहरांतील वाढत्या बांधकामांमुळे झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होऊन पक्षी बेघर होत आहेत. त्यांच्यासाठी घरे बांधण्याची संकल्पना शापूरजी ऍण्ड पालनजी कंपनी लि. या नामांकित बांधकाम कंपनीने साकारली आहे.

Thursday, February 09, 2012 AT 03:00 AM (IST)

मुंबई - शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी आचारसंहिताभंग केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राऊळ यांनी अधिकृतपणे प्रचार सुरू होण्यापूर्वीच धनुष्यबाणाचे चिन्ह असलेले मफलर वाटले, तसेच आचारसंहिता लागू असताना कार्यअहवालाचे वितरण केले, अशी तक्रार मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने केली होती.

Thursday, February 09, 2012 AT 02:45 AM (IST)

मुंबई - भाजी आणण्यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये भरधाव वेगाने जाताना टेम्पोचालकाला मिरगीचा झटका आल्याने त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या सहा गाड्यांना जोरदार धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी धारावी पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे. धारावीच्या नव्वद फुटी रस्त्यावर कामराज विद्यालयासमोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

Thursday, February 09, 2012 AT 02:30 AM (IST)

माणगाव - शहरातील तीन बत्ती नाका येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश मेहता यांच्या घरावर दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवीत सुमारे सहा लाख 80 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार- शहरातील तीन बत्ती नाका येथे राहणारे माणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश मेहता यांचे दार एका अनोळखी व्यक्तीने ठोठावले. त्यानंतर राजेश मेहता यांच्या पत्नी नीलम यांनी दार उघडून कोण आहे, असे विचारले.

Thursday, February 09, 2012 AT 02:00 AM (IST)

मुंबई - मलबार हिल येथील शिमला नगर झोपडपट्टीत काल (मंगळवार) रात्री एका दाम्पत्त्यात झालेल्या वादामुळे त्यातील पत्नी नूरजहॉँ सय्यद (वय 35) हिने स्वतःवर केरोसीन टाकून स्वतःला जाळून घेतले. ती 90 टक्के भाजली आसून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा पती गोरू सय्यद, (वय 40) हा सुद्धा 30 टक्के भाजला आहे. तसेच, त्यांची तीन मुले मेहजबीन (वय 11), मेहरून (वय 9) आणि मेहताब (वय 8) हे तिघेजण जखमी झाले आहेत.

Wednesday, February 08, 2012 AT 03:51 PM (IST)

मुंबई - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज सुमारे 65 टक्‍के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्‍त केला. राज्यभरातील संपूर्ण निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे. मतदानाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Wednesday, February 08, 2012 AT 12:15 AM (IST)

वसई- पालघरजवळ आज (बुधवार) सकाळी लग्नाचा ट्रक पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

Wednesday, February 08, 2012 AT 11:00 AM (IST)

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी 13/7 ला झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांना पैसे पुरवल्या प्रकरणी राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला दहशतवादी हरून रशीद नाईक याने अल्‌-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनची भेट घेतली होती, अशी खळबळजनक माहिती तपासात पुढे आली आहे. पाकिस्तानातील बहावलपूर येथे "जिहादी' कारवायांचे प्रशिक्षण घेत असताना नाईक लादेनला भेटला होता.

Wednesday, February 08, 2012 AT 04:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: