|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभेत 'ब्लू फिल्म' पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तीन मंत्र्यांची कारागृहात रवानगी करून, विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज केली आहे. अण्णा हजारे यांनी म्हटले आहे, की विविध राजकीय पक्ष अशाप्रकारच्या नागरिकांनी भरले आहेत. आपल्या लोकशाहीची मंदीरे असलेल्या संसदेत आणि विधासभेत अशा प्रकारची कृत्ये नेत्यांकडून करण्यात येतात.
Thursday, February 09, 2012 AT 03:52 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे - धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात दोंडाईचा येथील दादासाहेब रावल महाविद्यालयातील प्रा. शरयूबाला पवार- झोळ या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती आणि साहित्यिक प्रा. रविकिरण झोळ जखमी झाले. धुळे- नंदुरबार बायपास रस्त्यावर अमरावती नदीवरील पुलाजवळ ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने हा अपघात झाला. महाविद्यालयातून प्रा. झोळ घराकडे जात होते. या अपघातात प्रा. झोळ जखमी झाले.
Thursday, February 09, 2012 AT 03:48 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक - तब्बल 66 किलो गांजा विकण्याचा तयारीत असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना आज (गुरुवार) अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिलांसह पाच बांगलादेशी नागरिकांना निफाड तालुक्यातील चितगाव फाट्याजवळ आज अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ 66 किलो गांजा सापडला आहे. त्याची बाजारातील किंमत जवळपास 6 लाख 36 हजार रुपये आहे. काही व्यक्तींना गांजा विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
Thursday, February 09, 2012 AT 01:56 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव - वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात आज (गुरुवार) सकाळी बंदुकीच्या पावडरच्या साठ्यात झालेल्या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप राम चौधरी (रा. फुलगाव, वय 40) आणि हरून रुबाब तळवी (रा. आयुध निर्माण कारखाना, वय 35) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामागचे नेमके कारण अजून समजू शकले नाही.
Thursday, February 09, 2012 AT 10:55 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक - प्रभाग क्रमांक 46 च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार ज्योती शिंदे यांचे प्रचार कार्यालय काही अज्ञात व्यक्तींनी आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास जाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 46 च्या उमेदवार ज्योती शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाला आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आग लावली. आगीत कार्यालयासमोरचा मंडप जळून खाक झाल्याचे समजते. याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Thursday, February 09, 2012 AT 10:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन झाल्यानंतर उमेदवारांनी आतापासूनच शक्तिप्रदर्शन करण्यास सुरवात केली आहे. शक्तिप्रदर्शनासाठी लागणारी माणसे आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. त्यात शेती, बांधकाम, सर्व्हिस स्टेशन, गॅरेज आदी ठिकाणी काम करणाऱ्यांना प्रचारकार्यात खेचण्यात येत आहे.
Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक - निवडणुकीच्या प्रचारात जसजसा जोर चढू लागला आहे तसतशी उमेदवारांची आश्वासने आणि त्यांच्या विकासाच्या गप्पांना वेग आला आहे. मतांच्या या आकडेमोडीत उमेदवारांना झोपडपट्टीतील गरीब, दीनदुबळ्यांची आणि त्यांच्या व्यथांची आठवण झाली आहे. पंधरा लाख लोकसंख्येच्या नाशिकमध्ये विविध झोपडपट्ट्यांतील मतदारांची संख्या सुमारे पावणदोन लाख आहे.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वडांगळी (जि. नाशिक) - येथील ग्रामदैवत व राज्यातील बंजारा भाविकांचे कुलदैवत सतीदेवी सामतदादा यात्रोत्सवात दोन दिवसांत तीन लाख भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. बंजारा भाविकांनी बोलीभाषेत गाणी म्हणत सामतदादाच्या नावाने कौल मागितला. यात्रेच्या माघ पौर्णिमेच्या मुख्य दिनी जिल्हा परिषदेचे मतदान असल्यामुळे यात्रेकरूंची संख्या कमी होती. आज दुसऱ्या दिवशी संख्येत भर पडली. चाळीसगाव (जि.
Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक - डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते असणे काळाची गरज आहे. डॉक्टर शेवटच्या क्षणापर्यंत रुग्णाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. मात्र, काही ठिकाणी अपुऱ्या सेवासुविधांअभावी रुग्णाला वाचविता येत नाही.
Thursday, February 09, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव - गेल्या 38 वर्षांपासून असलेली जळगावकरांची विमानतळाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. जळगावातून विमानात बसून मुंबई, पुणे आणि त्यानंतर जगात कुठेही जाण्याचे स्वप्न साकार होणार आहे. विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. धावपट्टीवर प्रवाशांसाठीच "टर्मिनल' इमारतीचे कामही पूर्ण झाले आहे. विमानतळ विमानांसाठी खुले आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाची.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे - संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेतील 2010- 2011 या वर्षांतील तालुकास्तरावरील गावांची नावे तब्बल वर्षभर उशिराने जाहीर झाली आहेत. आता या गावांच्या तपासणीसाठी वर्धा जिल्हा परिषदेच्या आगमनाची येथील जिल्हा परिषदेला प्रतीक्षा आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबवीत गाव स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला जातो.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भुसावळ - येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून झालेले नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. वाढती महागाई, त्यात वेतन नसल्याने घर संसार चालवावा कसा? असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिध्द केले होते. आज पालिका कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून पालिकेसमोर धरणे आंदोलन केले. शासनाकडून वेतनासाठीचे अनुदान आलेले नसेल तर पालिकेच्या फंडातून वेतन करावे.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सामनेर (ता. पाचोरा), ता. 8 ः येथून जवळच्या असलेल्या पाचोरा- जळगाव मार्गावरील लासगाव गावाजवळील खैऱ्या नाल्यालगतच्या वळण रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंत व गतिरोधक करावे, अशी मागणी होत आहे. पाचोऱ्याकडून वाहन येताना वीटभट्टीजवळ नेमक्या वळणावरच नाल्या पूल आहे. पुलावरील वळण काटकोनी असल्यामुळे विशेषतः येथून पहिल्यांदाच वाहनाने येणाऱ्यांच्या हे वळण सहसा लक्षात येत नाही.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शहादा - "इंटर इंजिनिअरिंग स्टुडंट स्पोर्टस असोसिएशन'तर्फे (इंडिया) राज्यातील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या जी. एम. चौधरी तंत्रनिकेतनच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी मुंबई विभागाचे दोन्ही संघ विजयी झाले, तर पुणे विभागाचा संघ न आल्याने कोल्हापूर विभागाच्या संघाला पुढे चाल देण्यात आली.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
येवला -गावाच्या राजकारणाला दिशा देणारी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम थंडावली आहे. मात्र, अजूनही निकालासाठी नऊ दिवसांची प्रतीक्षा असल्याने गावोगावचे राजकारण तप्तच आहे. तालुक्यात ही निवडणूक सर्वच संस्थांतील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी चांगलीच तापदायी ठरली आहे. मंत्रिमहोदयांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राष्ट्रवादी सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे.
Thursday, February 09, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|