|
|
|
|
|
|
मुंबई - महाराष्ट्रातील मतदारांनी १३ ऑक्टोबरला मतपेटीत बंद केलेला कौल  आज (गुरुवार) सकाळी ८ वाजता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांतून बाहेर येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत महाराष्ट्राचा येत्या पाच वर्षांचा कारभारी कोण, हे निश्चित झाले असेल.
Thursday, October 22, 2009 AT 01:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली -  महाराष्ट्रातील निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी उरलेला असताना या पदासाठी ज्यांची नावे घेतली जात आहेत ते आपण या पदाच्या स्पर्धेत नसल्याचे सांगू लागले आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने "आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच' असे जाहीरही करुन टाकले आहे. केंद्रीय वीजमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही, "ते केंद्रात खूष आहेत' असे सांगून मुख्यमंत्रीपदाबाबत फारशी उत्सुकता दाखविलेली नाही.
Wednesday, October 21, 2009 AT 06:19 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुमारे ७५ जागा मिळून जवळपास १५ ते २० सहयोगी आमदार मिळतील आणि राष्ट्रवादीच्या गोटातील आमदारांची संख्या जवळपास ९० वर पोहोचेल आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदावर नैसर्गिक दावा करता येईल, असा विचार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू झाला आहे.
Saturday, October 17, 2009 AT 06:19 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे -   विधानसभा निवडणुकीसाठीचा निकाल येत्या गुरुवारी (ता. २२ ऑक्टोबर) दुपारपर्यंत सर्वांसमोर येईल आणि मग चर्चा सुरू होईल ती मुख्यमंत्री कोण होणार, या मुद्द्याची. राजकीय पक्ष व आघाड्या आपापल्या मार्गाने ही निवड करतीलच परंतु मतदारांच्या मनांत काय आहे? आपल्या पसंतीचा 'मुख्यमंत्री' कोण असावा, हे राज्यकर्त्यांना सांगण्याची संधी 'सकाळ' देत आहे. आपण फक्त एवढेच करायचे.
Saturday, October 17, 2009 AT 06:06 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे  - बारमधील अंधुक दिव्यांच्या साक्षीने रंगीत मद्याच्या बाटल्यांची झाकणं उघडत आहेत... सोड्याच्या बाटल्या फटाफट फुटत आहेत... चिकन-मटणाच्या जोरकस ऑर्डरी सुटत आहेत... विजयासाठी काम करण्याच्या आणि पराजयातही साथ देण्याच्या आणाभाका दिल्या-घेतल्या जात आहेत... रात्रीचा प्रहर वाढत जाईल तसतशी मंडळींची भाषा सैलसर होत आहे... मद्याचे प्याले उंचावून नशा साजरी केली जात आहे...
Sunday, October 11, 2009 AT 07:58 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दक्षिण महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वीपर्यंत प्रचारासाठी कोणी नेता येणार की नाही असे वातावरण होते. स्थानिक नेते, तीच तीच भाषणे करीत आणि उखाळ्या पाखाळ्या काढत प्रचार करीत होते. अखेरच्या तीन-चार दिवसांत अनेक बाहेरचे नेते आले आणि त्यांनी प्रचारात रंगत आणली. प्रचारातील मुद्दे मात्र लोकांचे नव्हते, प्रत्येकाच्या राजकीय सोयीचे होते. त्यामुळे या निवडणुकीत किंचित अपवाद केला तर निकालाची पुनरावृत्तीच होईल असे चित्र आहे.
Sunday, October 11, 2009 AT 07:52 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव  - विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची होत आहे. पुनर्रचनेमुळे या मतदारसंघातील जातीचे समीकरणच बदलून गेले आहे. युतीचे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना सोपी वाटणारी ही निवडणूक आता आव्हान ठरू पाहात आहे. गावठी व शेलक्या भाषाशैलीच्या जोरावर "शिवसेनेची मुलूख मैदान तोफ' म्हणून ओळखले जाणारे श्री. पाटील जाहीर सभांना होणारी गर्दी तिचे रूपांतर मतात किती करतात, हा या मतदारसंघात उत्सुकतेचा विषय झाला आहे.
Sunday, October 11, 2009 AT 07:50 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दक्षिण मुंबई हा शिवसेना व भाजपचा बालेकिल्ला तर दक्षिण-मध्य मुंबई हा कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा विभाग. दक्षिण मुंबईत गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी चांगलीच मुसंडी मारली. मतदारसंघ पुनर्रचनेत या भागात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. दक्षिण व दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघांतील ९ आमदारांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यात पक्षीय राजकारणाचाही काही आमदारांना फटका बसला आहे.
Sunday, October 11, 2009 AT 07:47 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जातीय, धर्मांध शक्तींना आपण पुढे आणायचे की सर्वधर्मसमभाव घेऊन जाणाऱ्या पक्षाला साथ द्यायची, याचा विचार महाराष्ट्रातील मागासवर्गीय मतदार करतो आहे. समभावाच्या तत्वाला ताकद देण्याचे ज्यांच्या मनात आहे, असे गवईंसारखे घटक कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीबरोबर आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीमुळे मत विभागणीचा विशेष परिणाम होणार नाही. कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुशीलकुमार शिंदे यांनी संजीव पिंपरकर यांच्याशी केलेली बातचीत.
Sunday, October 11, 2009 AT 07:45 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लातूरला पोचले. अमित देशमुखांची पोस्टर, बॅनर सगळीकडे झळकत होती. इथेही चर्चा विकासाची- झालेल्या आणि होणाऱ्या. कार्यकर्त्यांनीच ठरवून टाकलंय, विलासरावांना पूर्वी मिळालेल्या मताधिक्क्यापेक्षा अमितला जास्त मतांनी निवडून आणायचं. विलासरावांमधल्या वडिलांना ते सुखावणारं. तेवीसपेक्षा जास्त जिल्ह्यांत फिरून आलेल्या, त्यामुळे घसा बसलेल्या विलासरावांनी प्रचाराच्या सभा रंगतदार केल्या.
Sunday, October 11, 2009 AT 07:38 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अंमळनेर विधानसभा मतदारसंघाची या वेळची निवडणूक फारशा मोठ्या मुद्यांच्या तथा वादांच्या भोवती फिरताना दिसत नाही. प्रथमच १५ या विक्रमी संख्येने उमेदवार रिंगणात आहेत. या वेळची निवडणूक अस्तित्वाच्या प्रस्थापनेसाठीच आहे. इतका अभूतपूर्व थरार मतदारसंघातील मतदार प्रथमच अनुभवत आहेत. नव्याने राजकीय अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जिवाच्या आकांताने जणू त्यांच्यासाठी ही जीवन मरणाचीच लढाई आहे, अशा पद्धतीने लढत आहेत.
Sunday, October 11, 2009 AT 07:36 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सिंधीभाषक हिंदू निर्वासितांची वसाहत म्हणून निर्माण झालेल्या उल्हासनगरमध्ये सुरवातीच्या काळात येथे जनसंघाचा प्रभाव होता. कॉंग्रेसचा प्रभावही लक्षणीय होता. त्यामुळे पालिकेत एकतर कॉंग्रेसची वा जनसंघाची सत्ता असे. १९६५ नंतर हळूहळू शहराचा विस्तार होत गेला. वाढत्या नागरीकरणामुळे ओसाड जमिनीलाही सोन्याचा भाव येऊ लागला. ओस जमिनींकडे बांधकाम व्यावसायिकांचे डोळे लागले. येथील बरीचशी जमीन शासकीय होती.
Sunday, October 11, 2009 AT 07:33 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे चंद्रकांत हंडोरे यांनी खेचून घेतलेल्या चेंबूर मतदारसंघात या वेळी चौरंगी लढत होणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय व व्यसनमुक्तीमंत्री म्हणून कामकाज पाहिलेल्या हंडोरे यांना या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे अनिल ठाकूर, रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे दीपक निकाळजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनिल चौहान यांचे आव्हान आहे.
Sunday, October 11, 2009 AT 07:30 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"लढाईला जाण्याआधीच तलवारी म्यान व्हाव्यात किंवा शक्तिपात व्हावा', अशीच काहीसी परिस्थिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात विरोधकांची झाली आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पाही संपत आला असताना हे चित्र असल्याने मुख्यमंत्री किती मतांनी विजयी होणार? याचीच चर्चा न रंगली तरच नवल. माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले (कै.) शंकरराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ आणि नांदेड ही चव्हाण कुटुंबीयांची कर्मभूमी.
Sunday, October 11, 2009 AT 07:26 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांत निर्णायक आघाडी घेऊन राज्यात सत्ता पुन्हा आणण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने अखेरच्या टप्प्यात प्रयत्नांची पराकाष्टा चालविली आहे, तर मराठवाड्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीनेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. युतीच्या तुलनेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत मोठी बंडखोरी मराठवाड्यात झाली आहे. मराठवाड्यात २२ मतदारसंघात प्रबळ बंडखोर निवडणूक लढवीत आहेत.
Sunday, October 11, 2009 AT 07:25 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई  - "मराठी माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या दोन्ही नेत्यांमध्ये पडलेली फूट दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडून लोकसभेसारखेच विधानसभा निवडणुकीचेही निकाल लागतील. महाराष्ट्राच्या हितासाठी या नेत्यांनी निवडणुकीनंतर तरी किमान एकत्र यावे,' अशी अपेक्षा मराठी नाट्य-चित्रपट कलावंतांनी व्यक्त केली. प्रचारासाठी अभिनेते जात असले, तरी त्याचा उपयोग फक्त गर्दी जमा होण्यासाठी होतो, त्याचे मतांत रूपांतर होत नाही, असेही या कलाकारांनी कबूल केले.
Sunday, October 11, 2009 AT 07:17 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रस्थापित आमदारांबरोबरच सर्व पक्षांनी नव्या चेहेऱ्यांना दिलेली संधी, मनसे आणि रिडालोसमुळे झालेल्या बहुरंगी लढती आणि फेररचनेमुळे बदललेले मतदारसंघ यांमुळे पुणे शहरात अनेक चुरशीच्या लढती होत आहेत. पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुरेश कलमाडी यांचे झालेले मनोमीलन हे पुण्यातील निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. जितेंद्र अष्टेकर ः सकाळ वृत्तसेवा उमेदवारीच्या वाटपाच्या वेळी तीव्र रस्सीखेच झाल्याने सर्वच पक्षांत उडालेला धुरळा आता खाली बसला आहे.
Sunday, October 11, 2009 AT 07:14 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे  - पश्चिम महाराष्ट्रातील ११ वजनदार मंत्री प्रबळ विरोधकांमुळे स्वतःच्याच मतदारसंघात जेरबंद झाले आहेत. दहा वर्षांपासून मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करणाऱ्या या मंत्र्यांवर आमदारकी टिकवण्यासाठी तालुक्यातच कडवा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले केवळ तीनच मंत्री याबाबतीत सुदैवी आहेत.
Sunday, October 11, 2009 AT 07:09 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई  - शिवसेनेतील सदा सरवणकर यांची बंडखोरी आणि टीव्ही स्टार आदेश बांदेकर यांना शिवसेनेने दिलेली उमेदवारी यामुळे माहीम मतदारसंघातील लढत केवळ लक्षवेधीच नव्हे, तर रंगतदार आणि दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचीही ठरली आहे. मराठी मतदारांचा प्रभाव असणाऱ्या या मतदारसंघात सदा सरवणकर यांना मैदानात उतरविण्याची खेळी यशस्वी होणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
Saturday, October 10, 2009 AT 11:48 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई  - भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या, भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन राव यांच्या उमेदवारीमुळे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील घाटकोपर विभागणीतून घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ तयार झाला आहे. येथे पूनम यांची लढत मनसेचे राम कदम, कॉंगेसच्या जेनेट डिसोझा आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार मुकुंद थोरात यांच्यात होत आहे.
Saturday, October 10, 2009 AT 11:47 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे चिरंजीव शिरीष चौधरी यांनी कॉंग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने केलेली बंडखोरी आणि कॉंग्रेस व भाजपने शेजारच्या यावल तालुक्यातील उमेदवारांना दिलेली संधी या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरली आहे. त्याचबरोबर भाजपचे युवा कार्यकर्ते भरत तोताराम महाजन यांनी अपक्ष उमेदवार दंड थोपटून लढतीत रंगत आणली आहे.
Saturday, October 10, 2009 AT 11:45 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जालना मतदारसंघामध्ये यंदा पहिल्यांदाच दोन मित्र परस्परांविरुद्ध रिंगणात आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे भास्कर अंबेकर हे जुने मित्र असून दोघेही माजी नगराध्यक्ष आहेत. शिवाय गोरंट्याल हे पूर्वी एकदा जालन्यातून निवडून गेल्याने तुलनेत ते अनुभवी आहेत. मतदारसंघाच्या फेररचनेत जिल्ह्यातील अंबड मतदारसंघ रद्द होऊन घनसावंगी आस्तित्वात आल्यानंतर त्या मतदारसंघात जालन्यातील काही गावे गेली.
Saturday, October 10, 2009 AT 11:44 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सोलापूर  - ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून संवेदनशील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. २६ सप्टेंबरला शेगाव (ता. अक्कलकोट) येथे भाजप उमेदवार तथा स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांच्या बैठकीदरम्यान कॉंग्रेस गटाकडून झालेल्या हल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात ग्रामविकास राज्यमंत्री म्हेत्रेंसह २९ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला.
Saturday, October 10, 2009 AT 11:43 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई  - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे शांतपणे, संयमाने मार्गक्रमण करणारे नेते, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे रोखठोक भूमिका मांडणारे, काहीसे संतापी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे सर्वच बाबतीत भिन्न. अशा या दोन्ही नेत्यांचे "फॅन्स'सुद्धा भिन्न असणे स्वाभाविकच आहे.
Saturday, October 10, 2009 AT 11:37 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नंदुरबार  - मिरचीचे आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील उमेदवारांना निवडणुकीत मिरचीची आठवण झाली आहे. मिरची उत्पादक आणि व्यापारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या वैयक्तिक अजेंड्यावर त्यांनी या विषयाला स्थान दिले आहे. नंदुरबारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील मिरची उद्योगाला चालना देण्यासाठी "खानदेश पॅकेज'अंतर्गत चिली पार्कची योजना आखली आहे.
Saturday, October 10, 2009 AT 11:33 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|