Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


तनिष्का
"मैत्री'च्या काही स्वयंसेवकांनी मेळघाटमध्ये एक शैक्षणिक प्रयोग करून बघायचं ठरवलं. दिवसाची शाळा हा तो प्रयोग. डिसेंबरमध्ये सुरू झालेली ही शाळा या महिन्यात पूर्ण होत आहे. शाळेचा हा नमुना म्हणजे अनेक दुर्गम आदिवासी भाग, ऊसतोडणी मजूर अशा स्थलांतरित गटांतील मुलांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग आहे. क्‍यों झुनकी, आज स्कूल नहीं गयी? हाव .....

Sunday, March 25, 2012 AT 05:12 PM (IST)

"अपंगत्वावर मात करणं' असं म्हणण्याऐवजी "मी इतरांसारखीच आहे' असं म्हणणं अधिक होकारार्थी आहे. चिंचवडच्या छबूताईंचा दृष्टिकोन असाच आहे. विद्यार्थ्यांच्या रूपाने पुढची पिढी चांगली घडविण्याचा या शिक्षिकेचा प्रयत्न आहे. निवृत्तीनंतरही आपल्यातली शिक्षिका त्यांना जागी ठेवायची आहे. स्वतःचं अपंगत्व विसरून इतरांच्या हातांना बळ द्यायचं आहे... मंदिरात ओळीने प्रसादवाटप सुरू होतं. एका बाईंचा नंबर आला. त्यांनी डावा हात पुढे केला.

Sunday, March 25, 2012 AT 05:10 PM (IST)

गेल्या 20 वर्षांत महिलांना टप्प्याटप्प्याने अधिकाधिक आव्हानात्मक जबाबदाऱ्या देऊन लष्कराने महिला अधिकाऱ्यांवर विश्‍वास दाखवला आहे. नवनवीन संधी त्यांच्यासाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकीच स्क्वॉड्रन लीडर वीणा सहारन, स्क्वॉड्रन लीडर तेजी उप्पल आणि स्क्वॉड्रन लीडर निधी हांडा...ही नावं आहेत. भारतीय एअरफोर्सच्या ट्रान्सपोर्ट विभागातील काही महिला वैमानिकांची.

Friday, March 23, 2012 AT 05:50 PM (IST)

"वास्तव', "डोंबिवली फास्ट', "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', अशा चित्रपटांचे संवादलेखक, पटकथाकार आणि "कोण म्हणतो टक्का' नाटकाचे लेखक संजय पवार यांनी शब्दबद्ध केली आहेत, त्यांच्या जीवनात आलेली स्त्रीरूपं आणि मनात साठलेली स्त्री प्रतिमा... "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीहि सुंदर झालो असतो, वदले छत्रपती!' असं एक काव्यात्मक पण बहुधा अनैतिहासिक अवतरण आपण परस्त्रीकडे पाहण्याच्या नैतिकतेचं उच्चतम परिमाण म्हणून वाचतो, ऐकतो.

Friday, March 23, 2012 AT 05:36 PM (IST)

मधुरांगणच्या व्यासपीठावर झालेल्या रेसिपी स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रात भरघोस प्रतिसाद मिळाला. नेस्लेच्या सहकार्याने या स्पर्धा आणि रेसिपीचे कार्यक्रमही झाले. मधुरांगणच्या सभासदांच्या पाककृतींचा दरवळ या निमित्ताने राज्यभर पसरला. नामवंत तज्ज्ञांच्या रेसिपी प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाची लज्जत अधिक वाढली.

Friday, March 23, 2012 AT 05:28 PM (IST)

मध्यंतरी आय.टी.मध्ये काम करणाऱ्या काहीजणी भेटल्या. त्यांचा मुद्दा होता, आम्ही इतका पगार मिळवतो तरी स्वयंपाक काही सुटत नाही. स्त्री नोकरदार असो किंवा नसो, रोजचा स्वयंपाक तिलाच करावा लागतो आणि त्याच्या आधी व नंतरचं सगळं मॅनेजही तिलाच करावं लागतं. या विषयावर"तनिष्का'ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काहीजणींनी त्याच त्या कामाला कंटाळल्याचं सांगितलं, तर कोणाला नवऱ्याकडून किमान चहाची अपेक्षा असल्याचं समजलं.

Friday, March 23, 2012 AT 05:21 PM (IST)

निसर्गाच्या साथीने जगण्यात निराळाच आनंद असतो. तळेगावची मंजिरी लाटे स्वत: निसर्गात रमते आणि इतरांनाही निसर्गाबरोबर राहण्याचा आनंद देते. निसर्गाची शक्ती अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. यातूनच जगणं आनंदी होत राहतं.... अश्‍विन हा सातवीत शिकणारा एक हुशार मुलगा. केवळ एका सवयीमुळे तो कोणाकडेही राहायला जाऊ शकत नव्हता. अश्‍विनला रात्री झोपेत बिछाना ओला करण्याची सवय होती. या कारणाने तोही वैतागला होता.

Wednesday, March 21, 2012 AT 07:47 PM (IST)

निसर्गाचा अभ्यास करायचा तर निसर्गात फिरणं आलंच. असं फिरणं काही वेगळेच अनुभव देतं- धाडस निर्माण करतं. जंगलांमध्ये भटकण्याची एक वेगळीच नशा असते. असाच काहीसा अनुभव आहे अमृताचा. एक मुलगीही आता असं धाडसी पर्यटन सहज करते आणि भीती तिच्यापासून लांब पळते.... धाडसीपणाने टाकलेल्या प्रत्येक पावलाचे हे अनुभव... पुढे काय करणार हे लहानपणापासूनच मी ठरवलेलं नव्हतं. समोर येईल ते आव्हान स्वीकारायच्या मी तयारीत होते.

Wednesday, March 21, 2012 AT 07:38 PM (IST)

गरज म्हणून आजची स्त्री गाडी चालवायला शिकली तशी हौस म्हणून बाइक चालवायलाही. "हम भी कुछ कम नहीं!' असं म्हणत समुद्रसपाटीपासून सुमारे 18 हजार फुटांवर काही "बाइकरणी' गेल्या. आताच्या काळात असलं तरी हे निश्‍चितच धाडसाचं आहे. आजच्या स्त्रीचं कौतुक करावं अशाच या काहीजणी. यांच्यापैकीच एक मुग्धा चौधरी. बाइक चालविण्याचे आणि अनोख्या सफरीबद्दलचे तिचे हे अनुभव...महिलांना नवशक्तीसाठी प्रेरणा देणारे... सगळीकडे बर्फ. गुडघ्यापर्यंत पाणी, चिखल. निसरडा रस्ता.

Wednesday, March 21, 2012 AT 06:51 PM (IST)

अलकाताईंकडे काही मूकबधिर मुलं अशी भेटली, ज्यांना बोलत करण्यासाठी डॉक्‍टरी प्रयत्न झाले, शस्त्रक्रियाही झाल्या. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. अशा मुलांवरही केवळ स्पीच थेरपीचा प्रयोग अलकाताई करतात. मूकबधिर मुलांना सामान्य मुलांसारखं वागवावं, तसंच जगू द्यावं, याबद्दल त्या आग्रही असतात. हाच त्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा असतो. तिथून सुरू होतो एका आयुष्याचा बोलका प्रवास.

Tuesday, March 06, 2012 AT 07:47 PM (IST)

पिंकी आनंद, महताब बज्मी, पद्मा बंडोपाध्याय, किरण मुजूमदार-शॉ...प्रत्येक नावामागे अवितरत संघर्ष आणि लढाईचा इतिहास आहे. हा संघर्ष होता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा आणि लढाई होती स्वतःच्याच क्षमतांचा विकास करण्याशी. त्या जिंकल्या आणि एका उंचीवर पोहोचल्या. अशा 22 स्त्रियांनी "आजच्या' आणि "उद्याच्या' स्त्रीशी केलेलं हितगुज म्हणजे "वूमेन अँड सोसायटी' हे नवं इंग्रजी पुस्तक.. प्रकाशाच्या वाटा दाखवणारं आणि उद्यासाठी मार्गदर्शन करणारं.

Friday, March 09, 2012 AT 05:44 PM (IST)

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर दीड लाख महिला उदयाला आल्या आहेत. त्या हळूहळू पदभार स्वीकारून सक्रिय होतील. यापुढे निर्माण होणारा प्रश्‍न म्हणजे या महिला नेमकं काय करणार? राजकारणाला, सत्ताकारणाला वेगळं वळण देण्याची शक्‍ती या महिलांमध्ये आहे का? अनुभवावरून निघणारी अनुमानं काहीशी सकारात्मक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढताच बालविकासाच्या प्रश्‍नांवर अतिरिक्‍त भर दिला जातो आहे.

Friday, March 09, 2012 AT 05:41 PM (IST)

गडहिंग्लज या तालुक्‍याच्या ठिकाणी एक अभ्यासू राजकारणी, समाजसेविका सौ. ज्योती देशपांडे यांची नुकतीच भेट झाली आणि मन:पूर्वकतेने वाटलं, की खरंच, या "तनिष्का'बद्दल लिहिलंच पाहिजे. "स्त्रियांनी आणि विशेषत: सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्रियांनी राजकारणात आलंच पाहिजे' असं आग्रहपूर्वक म्हणणाऱ्या आणि त्यासाठी आसपासच्या स्त्रियांना सतत उत्तेजन देणाऱ्या, मदत करणाऱ्या हसतमुख ज्योतिताई मला प्रथमभेटीतच आवडून गेल्या.

Friday, March 09, 2012 AT 05:38 PM (IST)

काही कारणांनी मी आणि रणबीर एकमेकांपासून विभक्त झालो. त्यानंतर मात्र त्या गोष्टीचा मला विलक्षण मनस्ताप झाला. कदाचित असे प्रकार इतर अनेकांबाबत होतही असतील, पण मी तेव्हापासून प्रेमापासून चार हात दूरच राह्यचा निर्णय घेतला.   माझ्या कॉलेजमध्ये एकदा रॅम्प मॉडेलिंग झालं. त्यात मी रॅम्पवर उतरले. प्रसाद बिडप्पासारखा फॅशन मॉडेल गुरू हा परीक्षक होता. त्याने माझ्या पदार्पणातल्याच कौशल्याला दाद दिली. त्या क्षणी माझ्यातला आत्मविश्‍वास वाढला.

Sunday, February 26, 2012 AT 07:02 PM (IST)

सोन्यात किंवा भिशीत गुंतवणूक करण्याचा विचार स्त्री नेहमी करते, पण रियल इस्टेट किंवा फ्लॅटमधली गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे. जाणून घ्या योग्य परताव्यासाठी अशा गुंतवणुकीचा कसा कराल विचार?.... रियल इस्टेट म्हटलं की डोळ्यांसमोर येतात भव्य, अवाढव्य बांधकाम प्रकल्प, सर्व सुख-सोयी असलेल्या मोठ्या सोसायट्या. रियल इस्टेटमध्ये फायदा किती प्रचंड आहे हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. जागेतील भाववाढीमुळे खूपजण सधन, श्रीमंत झाले.

Wednesday, February 22, 2012 AT 04:02 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: