सेलू (जि. वर्धा) - तहसील कार्यालय परिसरात ठेवलेल्या मोटारसायकलमधून पेट्रोल चोरणाऱ्या जोशीनगरात राहणाऱ्या अनिल बोरकर याला पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत किमान 100 मोटारसायकलमधून पेट्रोल चोरल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. तहसील कार्यालयासमोर नेहमीच मोटारसायकल ठेवल्या जातात. मतदानाच्या दिवशी कर्मचारी त्यांच्या मोटारसायकल ठेवून मतदान प्रक्रिया राबविण्यास गेले होते. अनिल बोरकर याला ही संधीच होती.
नागपूर - वाल्मीकनगर आणि भानखेडा या दोन्ही ठिकाणी मंगळवारी (ता. 7) झालेल्या खूनप्रकरणातील आरोपींना कोर्टाने 13 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डुक्कर चोरल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान धनराज शिव (वय 52) या व्यक्तीच्या खुनात झाले.
वणी (जि. यवतमाळ) - साठ वर्षांपूर्वी जन्मगाव सोडून गेलेल्या व पुढे मराठी सारस्वताचा मानबिंदू ठरलेल्या आपल्या बालपणीच्या मित्राची प्रत्यक्ष उरभेट व्हावी म्हणून आस धरून बसलेल्या दत्ताभाऊ व त्यांच्या सवंगड्याची अखेर त्या सारस्वतपुत्राशी भेट झाली आणि पाच तपांचा मित्रवियोगाचा दीर्घ प्रवास खंडित झाला. मित्रभेटीने फुललेला हा वसंत चंद्रपूरच्या मराठी साहित्य संमेलनातील एक अनोखा व दुर्मिळ प्रसंग ठरला.
नागपूर - महापालिकेतील निम्म्या जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या असताना काही महिलांनी पुरुषांना आव्हान दिले आहे. एकूण अकरा महिलांनी पुरुषांच्या खुल्या जागांवर निवडणूक लढण्याची हिंमत दाखवली असून यात माजी महापौर माया इवनाते, प्रियांका पंजवानी, बसपच्या कविता लांडगे यांच्यासह कॉंग्रेसच्या बंडखोर नगरसेविका शशिकला वडे यांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अर्ध्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
गोंदिया - मनोहरभाई पटेल यांच्या 106 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन उद्या (ता. नऊ) सकाळी मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रसिद्ध सुपरस्टार अमिताभ बच्चन उपस्थित राहणार आहेत. सुवर्णपदक वितरण समारंभाचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल राहतील.
नागपूर - रेल्वेस्टेशनवर बुधवारी (ता. 8) दुपारी साडेबाराच्या सुमारास जीटी एक्स्प्रेसमधून 70 बाटल्या जप्त करण्यात आल्या. येथे लोहमार्ग पोलिसांनी मागील दहा दिवसांत बनावट दारूच्या एकूण 132 बाटल्या जप्त केल्या आहेत. रेल्वेगाडी क्रमांक 12616 नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस बुधवारी (ता.8) दुपारी साडेबाराला नागपूर रेल्वेस्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर आली. या गाडीच्या जनरल बोगीत प्रकाश वाल्या घोघलोत (19) रा. चंद्रपूर, निजुहरी घोघलोत (19) रा.
चंद्रपूर - विद्यार्थ्यांना सुरक्षाकवच देण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेला निधीचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील 16 प्रस्तावांना समितीने मंजुरी दिली मात्र निधीच नसल्याने हे प्रस्ताव सध्यातरी अडून आहेत. अपघातामुळे पोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शासनाने "राजीव गांधी अपघात योजना' सुरू केली.
नागपूर - गडचिरोलीतील लोकशाही माओवाद्यांच्या दहशतीखाली असल्याचा गैरसमज मतदानाच्या आकडेवारीने खोटा ठरविला आहे. जिल्हापरिषदेसाठी पहिल्या टप्प्याच्या मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवून तब्बल 73.90 टक्के एवढ्या भरघोस मतदानाची नोंद केली. गडचिरोलीतील निवडणुकीवर नेहमीच माओवाद्यांच्या दहशतीची छाया असते. निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन माओवाद्यांकडून केले जाते.
बामणी - सिरोंचा तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यात जिल्हापरिषदेचे चार गट आहेत. त्यापैकी दोन गटांसाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. सिरोंचा तालुक्यात पंचायत समितीचे आठ गण आहेत. झिंगानूर, आसरअल्ली, विठ्ठलरावपेठा माल, जाफ्राबाद चेक, सिरोंचामाल, सिरोंचा रै, जानमपल्ली, अंकिसा माल, झिंगानूर या नामाप्र महिला प्रवर्गासाठी राखीव क्षेत्रातून पाच उमेदवार रिंगणात आहेत.
नागपूर - भोपाळ वायुगळतीतील कचऱ्याच्या नमुन्यांचा पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावाचा अहवाल अद्याप केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयाला सादर केलेला नाही. हा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश बुधवारी जबलपूर उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र शासनाच्या सचिवांना दिले आहेत.
गडचिरोली - जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मंगळवारी (ता. सात) पार पडलेल्या जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्यांसाठी दिग्गज उमेदवारांच्या क्षेत्रात तब्बल 25 कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा अंदाज आहे. यापैकी मतदानावर सर्वाधिक खर्च चामोर्शी तालुक्यात जयनगर-विसापूर क्षेत्रात झाल्याची चर्चा असून, कोणता उमेदवार निवडून येईल, कोणाला किती मते मिळतील, याविषयी सर्वत्र मोठ्या चवीने चर्चा सुरू आहे.
नागपूर - महापालिका निवडणुकांच्या आखाड्यात शहरातील अनेक गुंडांनी शड्डू ठोकत उमेदवारी दाखल केली. काहींनी आपल्या पत्नी, भाऊ आणि अन्य नातेवाइकांना उभे केले. दुसरीकडे पोलिसांनी शहरातील दोन कुख्यात गुंडांवर मोकानुसार कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबले. तर, आठ गुंडांना नागपुरातून हद्दपार केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अनेक "भाई' आपल्या नावापुढे "नगरसेवक' हे बिरूद लावून घेण्यासाठी सरसावले आहेत.
नेर (जि. यवतमाळ) - तालुक्यातील वटफळी येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी बुधवारी (ता. 8) शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अटक केली. सायंकाळी या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र तथा जिल्हापरिषदेचे विद्यमान अध्यक्ष राहुल ठाकरे वटफळी येथून जिल्हापरिषद निवडणूक लढवीत होते.
नागपूर - व्याघ्रप्रकल्प व वाघाचे अस्तित्व असलेल्या वनक्षेत्राच्या संनियंत्रणाच्या चौथ्या टप्प्याला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. विदर्भातील तीन व्याघ्रप्रकल्पासह इतर क्षेत्रातील वाघांचे छायाचित्र टिपण्यासाठी साडेअकराशेपेक्षा अधिक कॅमेरे, 800 कम्पॉस आणि 242 "रेंज फाईंडर' चा वापर केला जाणार आहे. ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पाचा परिसर समतल असल्याने येथे "रेंज फाइंडर'चा वापर करण्यात येणार आहे.
नागपूर - प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या विरोधात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला रतन टाटांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती ताहलियानी यांच्या एकल खंडपीठाने हे प्रकरण अंतिम निर्णयाकरिता राखीव ठेवले आहे.