Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


विदेश
इस्लामाबाद - पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे सुरू करण्यासाठी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी स्विस प्रशासनाला पत्र लिहावे, असे मत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) व्यक्त केले. कुणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Thursday, February 09, 2012 AT 02:53 PM (IST)

माले - मालदीवचे माजी अध्यक्ष महंमद नाशिद यांच्याविरुद्ध आज (गुरुवार) न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यामुळे देशभरात आंदोलन आणि हिंसाचाराचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नाशिद सुरक्षित असल्याचा दावा नवनियुक्त अध्यक्ष महंमद वाहिद हसन यांनी केला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष महंमद नाशिद यांच्यासह माजी संरक्षण मंत्र्यांविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहेत.

Thursday, February 09, 2012 AT 01:48 PM (IST)

काठमांडू - आग्नेय काठमांडूतील नवलपरासी येथे काही वर्षांपूर्वी खास गिधाडांसाठी एक 'उपाहारगृह' सुरू करण्यात आले. या ठिकाणी गिधाडांना पोटभर अन्न पुरविले जाते. नेपाळमध्ये गिधाडांची घटत जाणारी संख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. (छायाचित्र - रॉयटर्स)

Thursday, February 09, 2012 AT 08:00 AM (IST)

मॉस्को - अंटार्क्‍टिका खंडात गेली किमान 20 दशलक्ष वर्षे बर्फाखाली दडलेल्या तळ्याचा शोध लावण्यात यश मिळाल्याचा दावा रशियन शास्त्रज्ञांनी केला आहे. या शोधामुळे पृथ्वीच्या सुरवातीच्या काळातील जीवसृष्टीचा वेध घेणे सोयीचे जाऊ शकेल, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात आला. अंटार्क्‍टिकामधील सर्वांत मोठे तळे असलेल्या "लेक व्होस्टोक'चा शोध लावण्यासाठी बर्फामध्ये जवळपास चार किलोमीटर खोल खणावे लागले.

Thursday, February 09, 2012 AT 01:00 AM (IST)

अमान - सीरियातील हिंसाचाराने कळस गाठला असून, होम्स शहरावर बॉम्बफेक अद्यापही सुरू आहे. गेल्या आठ तासांमध्ये 47 पेक्षा जास्त जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये हे नागरिक ठार झाले असल्याचे मानवाधिकार कार्यकर्ते मोहंमद हसन यांनी म्हटले आहे. होम्स शहरातील विद्युतपुरवठा खंडित पूर्ववत झाला असला, तरीही शहराचा काही भाग अद्यापही अंधारातच आहे.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

माले -  विरोधकांच्या बंडामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचे मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी म्हटले आहे. "बंडाच्या नाट्यानंतर मला राजीनामा द्यावा लागला असल्यामुळे उपाध्यक्षपदावरून अध्यक्षपदावर विराजमान झालेले मोहम्मद वाहिद हसन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,'' अशी मागणी नाशीद यांनी केली आहे. पक्षाच्या अंदाजे दोन हजार कार्यकर्त्यांशी नाशीद यांनी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

लंडन - अमली पदार्थांची तस्करी करून विक्री करणाऱ्या 160 जणांना लंडन पोलिसांनी आज ताब्यात घेतले. हे सर्वजण विविध 19 माफिया गॅंगमधील असून, शहराच्या विविध भागामध्ये अमली पदार्थांची विक्री करत होते. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात शहरात करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लंडन पोलिसांनी एक हजार पोलिसांच्या साह्याने ही कारवाई केली असून, शहरात विविध ठिकाणी 300 छापे घालण्यात आले. पहाटेपासून ही कारवाई सुरू होती.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

इस्लामाबाद - सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी खटल्यात पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान अर्ज दाखल केला. अध्यक्ष असिफ झरदारी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरू करण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही गिलानी यांनी हे खटले सुरू केले नाहीत. त्यामुळे गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजाविले होते.

Thursday, February 09, 2012 AT 12:30 AM (IST)

जेरुसलेम - इस्राईलमधील कामगारांच्या मुख्य संघटनेने संप पुकारल्यामुळे इस्राईलमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या संपामुळे अर्थव्यवस्थेला दररोज 50 कोटी डॉलरचा फटका बसत आहे. देशातील विमानतळ, समुद्रकिनाऱ्यावरील विविध तळ यांना या संपाचा फटका बसला असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्याही या संपात सहभागी असल्यामुळे अनेक कारखान्यांचे उत्पादन सध्या बंद आहे.

Thursday, February 09, 2012 AT 12:15 AM (IST)

तैवान - इंटरनेट कॅफेमध्ये सलग २३ तास कॉम्प्यूटरवर गेम खेळल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन रॉंग-यू (वय २३) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या खुर्चीवरच मृत्यू झाला. तैपेई येथील तो रहिवासी आहे. मृत्यू झाल्यानंतर चेनचा एक हात कि बोर्डवर आणि एक हात माऊसवरच होता.

Wednesday, February 08, 2012 AT 06:51 PM (IST)

गिग्लिओ - इटलीमध्ये नुकत्याच बुडालेल्या कोस्टा काँकोर्डिया या शाही प्रवासी जहाजाच्या कॅप्टनला, तब्बल २,५०० वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे जहाज बुडत असताना प्रवाशांची सुरक्षितता न पाहता पलायन करणाऱ्या या कॅप्टनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोस्टा काँकोर्डियाचा कॅप्टन फ्रान्सिस्को शेटिनो याच्यावरील गुन्हे सिद्ध झाल्यास, त्याला ही शिक्षा होण्याची शक्यता आहे.

Wednesday, February 08, 2012 AT 06:48 PM (IST)

फिलिपीन्स - सूर्य डोक्‍यावर तळपत असताना एखाद्या धबधब्याखाली बसून निवांत डुंबावे, त्यानंतर चार पावलांवर मस्त गरमागरम खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता घ्यावा, अशी प्रत्येकाची एक सुप्त इच्छा असते. ही इच्छा प्रत्यक्षात आणली आहे, फिलिपीन्समधील एका व्यावसायिकाने. "व्हिला एस्क्‍युडिरो' असे या हॉटेलचे नाव असून, अगदी आगळ्या-वेगळ्या संकल्पनेतून साकारलेल्या या हॉटेलला जगभरातील पर्यटक भेट देतात. घोटाभर पाण्यात बसून मस्त चमचमीत खाण्याची पर्वणी येथेच साधता येते.

Wednesday, February 08, 2012 AT 06:05 PM (IST)

मिरानशाह (पाकिस्तान) - अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात दहा संशयित दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज (बुधवार) दिली. अमेरिकेने उत्तर वझिरीस्तानमधील एका घरावर दोन मिसाईलद्वारे हल्ले केले. या घरांमध्ये दहशतवादी राहत असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली होती. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका विदेशी दहशतवाद्याचाही समावेश आहे.

Wednesday, February 08, 2012 AT 12:31 PM (IST)

माले -  लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मालदीवचे पहिले अध्यक्ष मोहंमद नाशीद यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपाध्यक्ष मोहंमद वाहिद हसन यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. देशातील असंतोष आणखी पसरू नये, यासाठी राजीनामा देत असल्याचे नाशीद यांनी स्पष्ट केले. देशात लष्कराचे बंड झाले नसल्याचा खुलासाही सरकारकडून करण्यात आला.

Wednesday, February 08, 2012 AT 01:45 AM (IST)

'फेसबुक'वरून खूप काळापूर्वी "डिलीट' केलेले, नकोसे वाटणारे फोटो तुम्हाला परत दिसत आहेत...? हा धक्का आहे पण खरा आहे. "फेसबुक'च्या सर्व्हरवरून हे फोटो डिलीट केले जातच नाहीत, असे आता उघडकीस आले आहे. परिणामी, जुन्या "लिंक'वरून हे नकोसे फोटो पुन्हा "युजर्स'च्या नजरेस पडत आहेत. "आयपीओ'मार्फत शेअर बाजारात उतरू पाहणाऱ्या "फेसबुक'च्या विश्‍वासार्हतेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Wednesday, February 08, 2012 AT 01:30 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: