सातारा - सहकारात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून सहकार चळवळीला बळकटी देऊन या संस्थांचे जाळे निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आजपर्यंत जनता सहकार महर्षी नावाने ओळखत होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त या वर्षीपासून सहकार विभागातर्फे राज्यस्तरावर सहकार महर्षी, पतसहकार भूषण पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा त्यामध्ये समावेश असेल.
सातारा - गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत चाललेल्या सातारा शहरालगतच्या परिसरात प्लॉटचे भाव भडकले आहेत. सदरबझार, शाहूनगर या उच्चभ्रू भागांत सर्वाधिक पैसे मोजले जात आहेत. शासकीय अधिकारी, दोघेही नोकरी करणारे शिक्षक, व्यापारी, तसेच स्थानिक पुढाऱ्यांनी मिळेल तेथे प्लॉट खरेदीचा सपाटा लावल्याने ही दरवाढ झाली आहे.
सातारा - गेल्या निवडणुकीत वरच्या भागात आपल्याला काहीच मत नव्हतं पण यंदा आमी लइ पोखरलंय. त्यामुळं भ्याचं काय कारण नाय. विजय आपलाच हाय, झेडपीत राष्ट्रवादीच येणार, कॉंग्रेस येणार इथंपासून ते आपला उमेदवार हजाराच्या वरनं निवडून येईल, अशा चर्चांना गावागावांतील पारा- शिवारांत आता उधाण आले आहे. आपल्या विजयाच्या आणि विरोधकांच्या पराजयाच्या सामिष जेवणापासून ते पोशाखापर्यंतच्या पैजाही लागल्या आहेत.
सातारा - पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर कोणते विषय घ्यायचे, यावरून दोन्ही आघाड्यांत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ठराविक पदाधिकाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेता विषयपत्रिका काढल्याचा आरोप करत काही सदस्यांनी पदाधिकाऱ्यांवर शरसंधान साधले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारची सभा गाजण्याची चिन्हे आहेत. नगराध्यक्षांच्या निवडीनंतर येत्या सोमवारी पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होत आहे.
कोल्हापूर - घरफाळा वाढीच्या विरोधात ओरड सुरू असतानाच महापालिकेचा आता पाणीपट्टी आणि आरोग्य सेवा शुल्कातही वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. गळती काढणे, पाईपलाईन बदलणे यामुळे वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टीत दहा ते पंधरा टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. आरोग्य सेवा शुल्कात 40 ते 80 टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.
कोल्हापूर - देशांतर्गत बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचा दर 2750 ते 2850 रुपये, तर परदेशी बाजारपेठेत हाच दर 2800 ते 2900 रुपये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे केवळ कारखान्यांची गोदामेच रिकामी होणार आहेत. त्याचा ऊस उत्पादक किंवा कारखान्यांना फारसा फायदा होणार नसल्याचेच चित्र आहे. देशातील दहा लाख 60 हजार टन साखरेची निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे.
कोल्हापूर - घरफाळा वाढीच्या विरोधात ओरड सुरू असतानाच महापालिकेचा आता पाणीपट्टी आणि आरोग्य सेवा शुल्कातही वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. गळती काढणे, पाईपलाईन बदलणे यामुळे वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टीत दहा ते पंधरा टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. आरोग्य सेवा शुल्कात 40 ते 80 टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.
सांगली - शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमंत्रणावरून कॉंग्रसचे नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी आणि प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल पाटील यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. हा प्रकार सायंकाळी पाच वाजता महापालिकेत घडला. केवळ महाआघाडीच्याच नगरसेवकांना निमंत्रण दिल्याने स्पर्धा वादात अडकण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाकडील प्राथमिक शाळेकडील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांना उद्यापासून प्रारंभ होत आहे. निमंत्रण पत्रिकांचे वाटप आज सुरू होते.
सांगली - जिल्हा परिषदेची निवडणुकीची मतमोजणी दहा दिवस लांबणीवर पडल्याने निवडणूक आयोगाला जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भत्त्यापोटी 25 लाखांहून अधिक खर्चाचा बोजा सहन करावा लागणार आहे. या मतदान यंत्राच्या बंदोबस्तांसाठी दहा तालुक्यांत 95 पोलिस अधिकारी व कर्मचारी, तर महसूलचे 46 अधिकारी नियुक्त आहेत. त्यांना आता दहा दिवसांचे सर्व भत्ते द्यावे लागणार असल्याने हा खर्च वाढणार आहे.
इचलकरंजी - गुजरातसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यात गावभाग पोलिसांना यश आले. दोघांना अटक केली असून, या टोळीने 25 हून अधिक गुन्ह्यांची कबुली दिली. शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मलकापुरातील औषध दुकानातील चोरीचा समावेश आहे. अमोल लालासाहेब शेळके (वय 22, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा त्यात समावेश आहे.
कोल्हापूर - कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे काल झालेले मतदान रद्द करून रविवारी (ता. 12) फेरमतदान घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज दिले. याबाबतचा फॅक्स आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाला मिळाला. येथील मतदान केंद्रातील यंत्रात काल तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तेथे कोणतेही बटन दाबल्यास "घड्याळा'लाच मतदान मिळत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या तांत्रिक बिघाडामुळे मशिन सील करून नवीन जोडण्यात आले होते.
कुडाळ - गेल्या वर्षी गळीत हंगामाच्या शेवटच्या सत्रात नोंद असूनही काही शेतकऱ्यांना खुदतोड करून ऊस घालवावा लागला, तसेच 12 महिने उलटूनही काहींच्या उसाला तोड मिळाली नसल्याने वेळेत ऊस न गेल्यामुळे विविध संघटना व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचाही मार्ग अवलंबिला होता.
सोलापूर - ""शेतीचा आगामी काळ हा वैयक्तिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी पूरक नाही. सामूहिक शेतीच किफायतशीर आणि फायद्याची ठरेल,'' असे मत राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी व्यक्त केले. "त्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाची, ज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी करून घेणे आवश्यक आहे,' असेही ते म्हणाले. कंदर (ता. करमाळा) येथील कण्वमुनी बचत गटातर्फे आयोजित कार्यक्रमात कृषी आयुक्त श्री. दांगट बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे होते.
नगर - ""जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षीय आणि वैचारिक चर्चेऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपच झाले विकासावर कोणी बोलायलाच तयार नव्हते. हे चित्र विदारक आहे. त्याच वेळी जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये फाईव्ह स्टार संस्कृती बळावल्याचे प्रकर्षाने जाणवले. आता ही फाईव्ह स्टार कॉंग्रेस पुन्हा झोपडपट्टीत नेण्याचा निर्धार आहे. त्यासाठी लवकरच जिल्ह्याचा दौरा करणार आहोत,'' असे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी आज स्पष्ट केले.
सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडांच्या हालचालींवर शहर पोलिस लक्ष ठेवून आहेत. याशिवाय रेकॉर्डवरील दोन हजार संशयितांची चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत "कायदा व सुव्यवस्था' अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. "भयमुक्त' आणि "शांततेत' निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलिसांची जोरदार तयारी सुरू आहे.