Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


जिल्हा परिषद निवडणूक
औरंगाबाद - ""जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नसल्याने अध्यक्षपदासाठीच्या चाव्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्या आहेत. मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच सत्तेसाठी कुणाची विनवणी करणार नाही. कॉंग्रेस पक्षाची विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे,'' अशी माहिती मंगळवारी (ता. 21) नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.

Wednesday, February 22, 2012 AT 01:15 AM (IST)

सिरसाळा - सिरसाळा जिल्हा परिषद गट या निवडणुकीत राज्यभर चर्चेत आला. दोन हजार लोकसंख्या असलेल्या हिवरा गावचे सरपंच व सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील वृक्षराज निर्मळ हा कार्यकर्ता भाजपकडून साडेतीन हजारांवर मतांनी निवडून आल्याने तालुक्‍यात पुन्हा एकदा लोकांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाला बळकटी दिली. ज्येष्ठ बंधू व राष्ट्रवादीचे नेते पंडितअण्णा मुंडे यांनी वेगळी चूल मांडली, पण त्यांना या गटातून पराभवाला सामोरे जावे लागले.

Wednesday, February 22, 2012 AT 12:00 AM (IST)

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जादुई किल्लीच्या साह्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत सत्तेत सहभागी व्हावे, यासाठी श्री. थोरात पुढाकार घेत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Tuesday, February 21, 2012 AT 12:45 AM (IST)

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत "पाटलां'नी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मराठा, धनगर, लिंगायत अशा समाजातील "पाटील' आडनाव असलेले 11 सदस्य विजयी झाले आहेत. 2002 च्या सभागृहात 11 पाटील होते. 2007 मध्ये तो आकडा घसरून आठवर आला. यंदा तो पुन्हा 11 झाला आहे. त्यामुळे सभागृहात पाटलांचाच आवाज घुमणार हे निश्‍चित. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या आखाड्यात आडनाव पाटील असलेल्या 26 जणांनी आपले नशीब अजमावले. त्यापैकी 11 पाटलांना यश मिळाले आहे.

Tuesday, February 21, 2012 AT 12:15 AM (IST)

ठाणे - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे मात्र या निवडणुकीत तालुकानिहाय कामगिरीचा विचार केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची काही ठिकाणी पीछेहाट झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्याऐवजी कुणबी सेना व श्रमजीवी संघटनेला मदतीला घेतले. या संघटनेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणुकीत उतरले. त्याचा या निवडणुकीत पक्षाला फायदा झाला.

Monday, February 20, 2012 AT 12:00 AM (IST)

नागपूर - जिल्हापरिषदेत युतीची सत्ता आल्याने आणि भाजपच्या सर्वाधिक जागा आल्याने या पक्षाकडे अध्यक्षपद जाणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे माजी जि. प. अध्यक्ष रमेश मानकर यांच्या पत्नी अरुणा मानकर, शुभांगी गायधने आणि संध्या गोतमारे यांची प्रमुख दावेदारी आहे. शिवसेनेच्या वाटयाला उपाध्यक्षपद जाईल. यासाठी भारती गोडबोले, नंदा लोहबरे या दावेदारी आहेत. अगदी काटोकाट युतीला बहुमत मिळाला असल्याने कॉंग्रेसही जोमाने भिडणार असल्याचे संकेत आहेत.

Sunday, February 19, 2012 AT 01:00 AM (IST)

येवला - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत येवल्यात कोणी काय केले, याचा सातबारा माझ्याकडे तयार आहे. येवल्यात येऊन मी बैठक घेऊन पुढील निर्णय घेईल. नवनिर्वाचित सदस्यांनी जनतेची कामे करून विश्‍वास सार्थ ठरवा, असा सूचनावजा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. शुक्रवारी निकाल घोषित झाल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांची नाशिक येथील फार्मवर सर्व विजयी उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या वेळी भुजबळांनी सर्वांचा सत्कार केला.

Sunday, February 19, 2012 AT 12:45 AM (IST)

गडचिरोली - गडचिरोली जिल्हापरिषदेच्या शुक्रवारी (ता. 17) जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हापरिषदेवर कॉंग्रेसच्या पंजाची पकड घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हापरिषदेच्या सर्वाधिक 14 जागांवर कॉंग्रेसचा पंजा उभा राहिला आहे. पण, सत्ताप्राप्तीसाठी त्यांना अद्याप 12 जागांची आवश्‍यकता आहे. त्यात 9 जागा पटकाविणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि 8 जागा पटकावणारा भारतीय जनता पक्ष हे दोन पर्याय कॉंग्रेसपुढे आहेत.

Sunday, February 19, 2012 AT 12:45 AM (IST)

देवरूख - गेल्या 20 वर्षांची सत्ता राखण्याचे कठीण आव्हान.. समोर दोन तुल्यबळ नेते प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलेले... आघाडी झाल्याने जोरही वाढलेला.. अशा कठीण स्थितीत निर्णायकी सेनेला एक खांबी तंबूनेच तारले.. जिल्ह्याची जबाबदारी असतानाही राजेंद्र महाडीक यांनी संगमेश्‍वरवरही लक्ष केंद्रीत केले आणि त्यांच्याच कौशल्याला यश येत संगमेश्‍वर पंचायत समितीवर पुन्हा युतीचा भगवा डौलाने फडकला.

Sunday, February 19, 2012 AT 12:00 AM (IST)

कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातूनच मोठी मुसंडी मारीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा खेचून जिल्हा परिषद निवडणुकीत काठावरचे बहुमत पटकावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी जिंतूर व सेलूमधून अभूतपूर्व यश पटकावले असून, त्यांच्याच गटाच्या नवनिर्वाचित महिला सदस्या अध्यक्षपदी विराजमान होतील, असे स्पष्ट संकेत आहेत. या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

परभणी - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातील डझनभर विद्यमान व माजी सदस्यांसह मातब्बरांना पराभवाचा मोठा तडाखा बसला. केवळ विद्यमान दहा सदस्य व त्यांचे कुटुंबीय नकारात्मक या लाटेतून कसबसे तरले. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची लाट नसताना व स्थानिक मुद्यांवरच निवडणुका लढल्या गेल्या. विविध पक्षांचे अनेक उमेदवार पक्षाच्या नव्हे तर जिल्हा पातळीवर नेत्यांच्या नावावर निवडणुकीत उतरले. कुठलाही पक्ष एकसंध होऊन निवडणुकीत लढला नाही.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

नांदेड - तालुक्‍यातील वाडी बुद्रुक व लिंबगाव गटातील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आपसात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वाडीमधून जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्या सौभाग्यवती आणि लिंबगावमधून संगीता पाटील डक यांचा पराभव झाला. हा निकाल स्पष्ट होताच नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख जयवंत कदम यांनी पत्रक प्रसिद्धीस देत माजी जिल्हाप्रमुख धोंडू पाटील आणि नांदेडचे (उत्तर) उपजिल्हाप्रमुख ऍड.

Saturday, February 18, 2012 AT 03:15 AM (IST)

जालना - अडीच वर्षांच्या कालखंडानंतर जालना जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजप - शिवसेना युतीला यश आले आहे. जालन्यावर वर्चस्व कायम राखत घनसावंगी पंचायत समिती शिवसेनेने ताब्यात घेतली. भोकरदन, जाफराबाद, परतूर भाजपकडे जाणार असून, बदनापूर, अंबड, मंठ्यात राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीकडे सत्ता जाईल, अशी चिन्हे आहेत. भोकरदनला दिग्गज पराभूत भोकरदन : गट व गणात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

जालना - जालना तालुक्‍यातील गट आणि गणांची मतमोजणी शुक्रवारी (ता.17) येथील आयटीआयमध्ये पार पडली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी एक वाजता संपली. केवळ तीन तासांत जिल्हा परिषदचे आठ गट आणि पंचायत समितीच्या 16 गणांची 32 टेबलवर ही मोजणी करण्यात आल्याने तीन तासांत सर्व निकाल मिळू शकले. आयटीआयमधील वर्कशॉपमध्ये डाव्या बाजूस गट आणि उजव्या बाजूस गणांच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी दोन टेबल, असे एकूण 16 टेबल लावण्यात आले होते.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

हिंगोली - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला बाजूला ठेवत स्वतंत्र लढणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फायदा घेत एकहाती सत्ता हिसकावत जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणले. बहुमतासाठी लागणारा पंचवीसचा आकडा ओलांडून शिवसेनेने 27 जागांवर विजय मिळविला. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आतापर्यंत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीची सत्ता होती.

Saturday, February 18, 2012 AT 03:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: