Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन


ब्लॉग
न क्षल चळवळीने 33 पैकी 22 राज्ये, 604 पैकी 232 जिल्हे, 12 हजार 476 पैकी 1 हजार 611 पोलिस ठाणी आणि 6 लाख 50 हजारपैकी 14 हजार गावे घेरली आहेत. भारताच्या 35 टक्के भागावर याचा परिणाम झाला आहे. हा भाग जम्मू-काश्‍मीर आणि पूर्वोत्तर भागाच्या तुलनेत मोठा आहे. 2011 मध्ये 259 नागरिक, 275 सुरक्षादलाचे कर्मचारी, 253 नक्षलवाद(ज्यांचे मृतदेह सापडले नाहीत?) असे एकूण 887 जण घातपातात मारले गेले.

Tuesday, February 07, 2012 AT 03:00 AM (IST)

ज न्मतारखेच्या घोळात देशाचे सेनापती, खुर्ची संघर्ष, कमजोर सरकार, शिरजोर सेनापती, जन्मतारीख की जन्मभूमी! सेनापतीची भारत सरकारशी सौदेबाजी, लष्करप्रमुखांना सरकारची चपराक अशा बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत. अशा बातम्या देण्यात संरक्षण मंत्रालय पटाईत आहे. यामागील सत्य काय आहे? अपयश सरकारचेच देशाचे लष्करप्रमुख जन्म तारखेच्या घोळात अडकले, हे लक्षण चांगले नाही. हा देशाचा अपमान आहे.

Monday, January 30, 2012 AT 03:42 PM (IST)

डिसेंबरची सुटी जवळ आली तसे आम्हाला भ्रमंतीचे वेध लागले. अर्थातच मागील अनुभवावरून या वेळाला आमची चक्रे जरा लवकरच म्हणजे चार पाच महिने आधीच फिरू लागली होती. राजस्थान केरळ करता करता गाडी शेवटी मलेशिया सिंगापूरवर आली. त्यानंतर मुलींच्या उत्साहाला आलेल्या उधाणापुढे बाकी कुठल्या पर्यायाचा विचारसुध्दा झाला नाही. अशाप्रकारे मलेशिया सिंगापूरची वारी पक्की झाली. या भागात हवा कायम आल्हादायक असते. तापमान २२ सेंटिग्रेडच्या पुढेच असते.

Friday, January 27, 2012 AT 03:56 PM (IST)

काश्‍मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फायदा करून घेण्याचे राजकीय नेत्यांना जमले नाही उलट विघातक राजकारणाने परिस्थिती चिघळत आहे. संकुचित सत्ताकारण देशकारणावर कुरघोडी करत आहे. दरवर्षी भारतीय लष्करातील दहा ते पंधरा अधिकारी आणि 350 ते 500 जवानांना काश्‍मीरसाठी वीरमरण येते. जबर जखमींची संख्या याच्या चौपट आहे. गेले पाच दिवस कुपवाडा भागात चकमक सुरू आहे.

Monday, October 03, 2011 AT 02:30 AM (IST)

झा रखंडच्या जंगलात माओवाद्यांनी शनिवारी केलेल्या भूसुरुंग स्फोटात प्रभारी अधिकाऱ्यासह 13 पोलिस शहिद झाले तसेच इतर दोघे जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास माओवाद्यांनी हा स्फोट घडवला. स्फोटोने उडालेल्या गाडीतून पोलिस बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, या माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रेही लुटली.

Monday, January 23, 2012 AT 03:31 PM (IST)

आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने वर्चस्ववादी भूमिका घेणा-या चीनचे व्यापारीही आता दादागिरी करू लागल्याचे दिसते. आपल्या वस्तू घेण्यास भाग पाडायचे आणि नंतर पैशाच्या वसुलीसाठी पठाणी मार्ग अवलंबायचा. शांघायजवळील यिवू शहरात एस. बालचंद्रन या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा झालेला छळ हा त्याच मानसिकतेचा परिपाक म्हटला पाहिजे.

Tuesday, January 17, 2012 AT 01:10 PM (IST)

ता पमानवाढीचा सर्वात पहिला फटका पशू-पक्षी आणि किटकांनाच बसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांत युरोप खंडाच्या सरासरी तापमानात वाढ झाली आहे. परिणामी पारंपरिक वातावरणाच्या शोधात पक्षी आणि फुलपाखरांच्या काही प्रजाती अधिक उत्तरेकडे स्थलांतर करू लागल्या आहेत.

Thursday, January 12, 2012 AT 02:45 AM (IST)

पाकिस्तानातील जम्मू-काश्‍मीर भागात ११ हजार चिनी सैनिक, गिलगिट टापूत काम करीत आहेत. काराकोरम रस्त्याचे रुंदीकरण त्यांनी सुरू केले आहे आणि हा रस्ता वाहतुकीला अधिक सोईचा करण्यासाठी तेथे काम सुरू केले आहे. तेथे लोहमार्ग बांधण्यात येणार असून, गॅस व पेट्रोलियम पदार्थ सिकियांग व पाकिस्तानातील ग्वादर बंदर, तसेच इराणमधील तेल क्षेत्रांमधून ने-आण करता यावेत हा त्यामागचा हेतू आहे.

Monday, January 09, 2012 AT 05:42 PM (IST)

आम्हाला सैन्याची गरज नाही. पोलिसदल पुरेसे आहे - पंडित नेहरू 'चीन भारतावर आक्रमण करणार नाही - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग १ ९६२ मधील चिनी आक्रमणाचे यंदा पन्नासावे वर्ष सुरू आहे. या युद्धापासून आपण काय बोध घेतला? सध्या आपले चीनशी हिंदी-चिनी भाई भाई संबंध आहेत, की चीनशी पुन्हा एकदा लढाई होणार आहे? तसे झाल्यास आपले सरकार व लष्कर कितपत कार्यक्षम आहे? वास्तविक पाहता १९६२ च्या युद्धात केवळ १० टक्के सैन्याने भाग घेतला होता.

Tuesday, January 03, 2012 AT 02:30 AM (IST)

१९६२ - चिनी आक्रमण भाग २ १ ९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? भारताभोवती 'ड्रॅगन'चा विळखा आणखी आवळत चालला आहे. सेशेल्समध्येही आता चीन नवा नाविक तळ उभारत आहे. या निमित्ताने चीनचा हिंदी महासागरातील वावर वाढणार आहे. याचा भारताच्या नाविक सामर्थ्याला असलेला धोका आपण तातडीने ओळखला पाहिजे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच 'चीन भारतावर आक्रमण करणार नाही,' असे विधान केले होते.

Monday, December 26, 2011 AT 02:15 PM (IST)

१९६२ चे चीनचे आक्रमण - भाग १ १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २१ नोव्हेंबर २०११ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष सुरू झाले. ६२ च्या युद्धानंतर चीनने थेट जरी आपली कुरापत काढली नसली, तरी अरुणाचल प्रदेशावर अद्यापि चीन दावा करीत आहे. चीनकडून प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला सर्वाधिक धोका संभवतो.भारताभोवती 'ड्रॅगन'चा विळखा आणखी आवळत चालला आहे.

Monday, December 19, 2011 AT 06:00 PM (IST)

1 965 व 1971 च्या युद्धाचा अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी जनरल झिया आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून "के प्लॅन' असे संबोधले गेले. भारतात विद्वेषाची बीजे रोवून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य भाग होता.

Wednesday, December 14, 2011 AT 02:15 AM (IST)

'ना टो'ने पाकिस्तानी ठाण्यावर अलिकडेच केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर (ज्यात २४ पाकिस्तानी सैनिक ठार झाले) पाकिस्तानी जनतेत मोठाच गदारोळ उठला. राजकीय नेते मंडळी, दूरचित्रवाणीवर राजकीय घटनांवर आधारित चर्चा-कार्यक्रम सादर करणारे सूत्रधार, सर्वसामान्य लोक या सार्‍यांचेच आवाज कर्कश, उर्मट, मगरूर होत गेले. सार्‍या जगाला पाकिस्तानी जनतेचा सामुदायिक संतप्त आकांत ऐकायला मिळाला.

Tuesday, December 13, 2011 AT 03:00 AM (IST)

1965 व 1971 च्या अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी, जनरल झिया आणि "आयएसआय' यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून "के प्लॅन' असे संबोधले गेले. भारतात विद्वेषाची बीजे रोवून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य भाग होता. यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणीही शीख माथेफिरू तरुणांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आली. काश्‍मीरचे विभाजन करण्याचाही डाव रचला गेला.

Tuesday, December 06, 2011 AT 03:00 AM (IST)

सोनालीचं अशोकवर मनापासून प्रेम होतं. पण अगदी शुल्लक कारणावरून लग्न मोडलं. त्याचा सोनालीला प्रचंड मनस्ताप झाला. लोकांची नाना प्रकारची बोलणी ऐकावी लागली. तरीही तिनं हिंमत सोडली नाही. गावातल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. आयुष्य पुन्हा सुरू केलं. कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. गावात वधू संशोधनासाठी आलेल्या विकासला ती आवडली. त्यानं तिला रीतसर मागणी घातली. दोघांचं थाटामाटात लग्न लागलं. पण सोनालीच्या मनाला काहीतरी निरंतर छळत होतं.

Tuesday, November 29, 2011 AT 02:47 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: