मुंबई - "महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निष्प्रभ नेते ठरतील तर शिवसेना महाराष्ट्राच्या इतिहासात जमा झालेली असेल,'' असे भाकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. निवडक पत्रकारांशी ते बोलत होते. शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रतिस्पर्धी पक्षाची मदत आपण घेतली असल्याचे समीकरणही त्यांनी या वेळी मांडले.
पुणे - भारताचा आणि भगवा झेंडा घेऊन जगातील सर्वोच्च "माऊंट एव्हरेस्ट' शिखर सर करून, मराठी अस्मिता उंचावण्यासाठी पुण्यातील 20 गिर्यारोहकांचा संघ निघाला आहे. गिर्यारोहकांच्या या मोहिमेला गरज आहे आर्थिक पाठबळाची. त्यामुळे या संघाला आर्थिक मदत करून त्यांची ही मोहीम यशस्वीपणे पार करण्यास हातभार लावावा, असे आवाहन 'गिरीप्रेमी' या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
लंडन - गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास, मुलांमध्ये जन्मतः व्यंग निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनाअंती काढण्यात आला आहे. येथील न्यू कॅसल विद्यापीठाने हे संशोधन केले असून, "डायबेटॉलॉजीया' या वैद्यकीय विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनासाठी ईशान्य लंडनमधील चार लाख गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पुणे - शिवसेना-भाजप युतीसाठी मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. मात्र, स्वार्थासाठी त्यांनी ही कोंबडीच कापून खाल्ली, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. कॉंग्रेस नेते वस्त्रहरणाची भाषा करतात. मात्र, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत दहशतीची भाषा करणाऱ्यांचे मतदारच वस्त्रहरण करतील, असा टोला त्यांनी नारायण राणे यांना नाव न घेता लगावला आहे. आर. आर. पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत.
मुंबई - शिवसेनेने मुंबईची अवस्था कशी करून टाकलीय हे सर्वच जण बघत आहेत. या मंडळींनी शहराला काहीच दिले नाही मात्र ओरबाडले भरपूर. त्यांच्याकडे प्रचंड कल्पनादारिद्य्र आहे. आता बघा येणाऱ्या निवडणुकीत मनसेची सत्ता या शहरात येईल आणि कायापालट करून दाखवू आम्ही, अशा शब्दांत शिवसेनेचा समाचार घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत आपणच विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला.
मुंबई - ""शिवसेनेला मुंबई आणि मुंबईकर यांच्यासाठी जे काही करायचे होते, ते आम्ही करून दाखवले. कॉंग्रेसने केंद्रात आणि राज्यात काय दिवे लावले, ते आपण बघतोच आहोत. त्यामुळेच महाराष्ट्रावर कायमस्वरूपी सत्ता आणण्याच्या दृष्टीने अमलात आणावयाचा एक पूर्ण प्रयोग म्हणून आम्ही या निवडणुकीकडे बघत आहोत,'' अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी "सकाळ'ला दिली.
उद्धव यांचा राजवर हल्ला - कृपाशंकर यांच्या ताब्यात नाही देणार मुंबई मुंबई - मनसे..."मला मुळातच त्याविषयी बोलण्याची गरज वाटत नाही. चायनीज खेळणी टिकतात काय?'' अशी विचारणा करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी "राज ठाकरे यांचे आव्हानच नाही,' असे ठणकावून सांगितले. शिवाय मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई कृपाशंकर सिंह यांच्या ताब्यात मुंबईकर जनता देणार नाही, असा ठाम विश्वासही व्यक्त केला.
विलासराव देशमुख  - श्रेष्ठींनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा मुंबई - ""मंत्रिमंडळातले वाद इतक्या टोकाला पहिल्यांदाच गेले असावेत. ही मंडळी बैठकीत एकमेकांशेजारी बसतील का, परस्परांचे चेहरे पाहायला तयार होतील का? अशीच स्थिती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच आक्रमक होण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी "सकाळ'ला खास मुलाखत देताना केले.
राणे यांची जोरदार टीका - तोंड वाजवून राज्य नाही चालवता येत! मुंबई - "अजित पवार आणि आर. आर .पाटील या दोन मंत्र्यांना सत्तेचा गर्व झाला आहे. गरिबी, निरक्षरता, कुपोषण, नक्षलवाद या राज्यासमोरच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळ देणे गरजेचे आहे. तोंड चालवून राज्य सांभाळता येत नाही,'' अशी जोरदार टीका उद्योगमंत्री व कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.
गोपीनाथ मुंडे यांची अजितदादांवर घणाघाती टीका लोकच करतील आघाडीची बिघाडी बीड - "एकेकाळी पुरोगामी आणि विकासाच्या वाटेवर असणारा महाराष्ट्र आता मात्र देण्या-घेण्याच्या सात टक्क्यांत अडकून पडला आहे. भ्रष्टाचाराची ही साडेसाती महाराष्ट्राच्या मागे लागल्यामुळे भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला आहे.
अजितदादांची घणाघाती टीका राष्ट्रवादीला कोणी नाही अडवू शकत पुणे - "शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे हे हवेत असल्याने त्यांना त्यांच्या संघटनेत खालच्या पातळीवर काय चालले आहे, हे कळत नाही. त्यामुळे त्यांनी आधी स्वत-च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधावा आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसविषयी बोलावे,'' अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. "मनसे'चे प्रमुख राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता त्यांचाही फोलपणा या निवडणुकीत उघड होईल.
मुंबई - "पैशाने महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवला आहे,'' अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. ""आपला नाकर्तेपणा पैशाच्या थैल्यांनी झाकू नका,'' असेही त्यांनी राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारला सुनावले. गडकरी यांनी "सकाळ'शी खास बातचीत केली.
अन् "रिऍलिटी' शो ! क्रिकेटपटू हरभजन रिऍलिटी शोमध्ये आला...आधी कोण ती सनी लिओन आली... टीव्हीवरचे रिऍलिटी शो आता विचित्र बनताहेत...पुढच्या रविवारचा व्यंगचित्रासाठीचा विषय आहे रिऍलिटी शो! व्यंगचित्रे ई-मेलवरूनच पाठवावीत. त्यासाठीचा पत्ता - webeditor@esakal.com मध्ये पूर्ण नाव आणि पत्ता हवा.
पुणे- देशात मतदानाची घसरत जाणारी टक्केवारी हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला असताना, शेवगाव (जि. अहमदनगर) येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील शिक्षक उमेश घेवरीकर यांनी दीड मिनिटांचा 'व्होट फॉर इंडिया' हा लघुपट तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. (व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा) शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरत चालली आहे. त्यामागे विविध कारणे आहेत. ही समस्या लक्षात घेऊनच हा लघुपट तयार केल्याची माहिती घेवरीकर यांनी दिली.
क्वीन्सलॅंड - समुद्रातील कार्बनडाय ऑक्साईडचे (सीओटू) प्रमाण वाढत असून, त्यामुळे सामान्य आकाराच्या सागरी जीवांच्या मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, या सागरी जीवांची गंधाची तसेच पोहण्याची क्षमता कमी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.   ऑस्ट्रेलियातील काही जैवशास्त्रज्ञ समुद्रातील कार्बन डाय-ऑक्साईडच्या प्रमाणाचा अभ्यास करत आहेत.