पुणे - घोरपडी येथील रेल्वे उड्डाण पुलाचे (ओवहरब्रीज) काम सुरक्षेचे कारण पुढे करून लष्कराने का अडवून ठेवले आहे, असा संतप्त प्रश्न घोरपडी येथील रहिवासी करीत आहेत. या प्रलंबित प्रकरणामुळे येथील रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यासाठी काल (बुधवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) एम. के.
पुणे - पाच वर्ष करवाढ नाही, विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, झोपडीधारकांचे यशस्वी पुर्नवसन, परवडेल अशा दरात पेट्रोल आदी आश्वासनांची खैरात कॉंग्रेस पक्षाने पुणेकरांवर लुटली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज (गुरुवार) कॉंग्रेसचा पुणे महानगरपालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पुणे शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांचे आवाहन महापालिकांची निवडणूक आता रंगात येऊ लागली आहे. ती हिरिरीने लढविणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांची पुणे आणि पिंपरी महापालिकेबाबत भूमिका नेमकी काय आहे, या शहरांच्या समस्यांकडे ते कसे पाहात आहेत, त्यांच्या दृष्टीने निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र कसे असेल, याची माहिती देणारी या नेत्यांच्या मुलाखतींवर आधारित मालिका आजपासून सुरू करीत आहोत.
पुणे - महापालिका निवडणुकीबाबत आपली मते व्यक्त करण्यासाठी "सकाळ'ने उपलब्ध करून दिलेल्या "व्हॉइस ऑफ पुणे' या "फोरम'ला तरुणाईचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यावर युवा वर्ग विविध विषयांबाबत आपली मते व्यक्त करीत आहेत. या "फोरम'वर गेल्या दोन दिवसांत उमेदवार आणि त्यांच्या प्रचाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. "मतदान करणे सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
पुणे - ""स्वबळावर सत्तेवर येण्याची खात्री नसल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून वारंवार कॉंग्रेसवर टीका होत आहे. ही टीका पुन्हा "पुणे पॅटर्न'ची जुळवाजुळव करण्यासाठीच असल्याची शंका येते,'' असा आरोप कॉंग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष शरद रणपिसे यांनी बुधवारी केला. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड आणि रणपिसे यांनी कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले.
पुणे - ""सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळू शकणार नाही, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत पाच दिवसानंतरही मिळालेली नाही. यातून, सर्वोच्च न्यायालयात जाण्यास रोखण्याचा प्रयत्न दिसतो,'' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. "रोड शो'मुळे आचारसंहितेचा भंग झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी "निवडणूक आयोगाने 1995 पासून काय "शूटिंग' केले आहे, ते मला पाहायचेय. त्यात, किती जणांना शिक्षा झाली.
केडगाव - जिल्हा परिषद निवडणुकीत दौंड नगरपालिकेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार की आमदार रमेश थोरात यश मिळवून नगरपालिकेतील पराभवाचा डाग धुवून काढत ग्रामीण भागावर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करणार, याचा निकाल आता सतरा तारखेस लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व नागरिक हित संरक्षण मंडळ यांच्यात या निवडणुकीत काट्याची टक्कर झाली. काही गावांचा अपवाद वगळता अत्यंत चुरशीने मतदान झाले.
माळेगाव - माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) परिसरात सार्वजनिक शांततेचा भंग करणे, तलवार व काठ्यांचा धाक दाखवून मतदारांत दहशत पसरविणे, घरात जाऊन जबर मारहाण करणे या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी दहापेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
पाईट - कोहिंडे खुर्द आश्रमशाळेमध्ये 30 वर्षांपूर्वी एक जण सहावी, तर दुसरा चौथीमध्ये शिकत होता. रोज एकमेकांच्या ताटामध्ये जेवणारे, घरच्या आठवणींनी व्याकूळ होऊन सुख-दुःखाच्या गप्पागोष्टी करणारे, दंगामस्ती करणारे, आई-वडिलांच्या मायेच्या, वात्सल्याच्या हाताला भुकेलेले, कधी अर्धपोटी राहूनही शिक्षण घेणारे दोघे मित्र काल झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भामनेर खोऱ्यामध्ये भलवडी येथे सुमारे 30 वर्षांनंतर भेटले.
जुन्नर - जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख प्रतिस्पर्धी स्पर्धकांकडून आपल्या विजयाचे दावे करण्यात येत आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार वल्लभ बेनके म्हणाले, ""खरा निकाल सतरा तारखेलाच कळणार आहे. या वेळी मतदारांनी काय केले आहे हे समजणार असले तरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण होते, याचा फायदा पक्षाच्या उमेदवारांना निश्चितच होणार आहे.
पुणे - "आंबेडकरी विचारांनीच महापालिकेत सत्ता मिळवू,' असा दावा करीत झोपडपट्टीवासीयांना 550 चौरस फुटांचे घर तसेच 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देणार, अशी विविध आश्वासने भारिप बहुजन महासंघाने संकल्पनाम्यात दिली आहेत. भारिप बहुजन महासंघाने सन 2012 च्या महापालिका निवडणुकीचा "संकल्पनामा' नुकताच जाहीर केला.
पुणे - "राज्य सरकारकडून मेट्रो प्रकल्प मंजूर करून घेण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी एकहाती सत्ता द्या, असे आवाहन "ते' करीत आहेत,' अशी टीका भारतीय जनता पक्षाने बुधवारी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केली. "एक हाती सत्ता द्या, पाच वर्षात पुण्यात मेट्रो प्रकल्प राबवून दाखवतो,' असे आवाहन पवार यांनी केले आहे. शहर भाजपचे सरचिटणीस गणेश बिडकर यांनी त्यावर टीका केली आहे.
पुणे - पीएमपी बसची कमी होत जाणारी संख्या आणि त्यातील अनेक समस्यांमुळे शहरातील वैयक्तिक वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. नव्या वर्षात शहरातील दुचाकी व चारचाकींनी साडेबावीस लाखांचा आकडा पार केला आहे. कमकुवत झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे लोकांचा कल दुचाकी किंवा चारचाकी वाहने घेण्याकडे आहे. पुण्यात प्रत्येक दिवशी साधारण 800 वाहनांची नोंदणी होते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) देण्यात आली.
पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांची जात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता विभागीय जात पडताळणीसमोर शिक्षण आणि सेवाविषयक प्रकरणांचा निपटारा करण्याचे आव्हान आहे. या समितीकडे आता बारा हजार प्रकरणे प्रलंबित असून, त्यातील शैक्षणिक प्रकरणांना प्राधान्य देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
कॉंग्रेसला 28, तर भाजपला 9 उमेदवार पडले कमी पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी एकूण 882 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. त्यामध्ये विविध 12 राजकीय पक्षांचे 456, अपक्ष 416 आणि आघाड्यांच्या 10 उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी कॉंग्रेसला सर्व 128 जागांवर उमेदवार देता आलेला नाही.
पिंपरी - राष्ट्रवादीच्या ताकदीसमोर लढण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले होते मात्र, प्रचारासाठी अवघे सहा दिवस उरले असतानाही साधा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठीही प्रदेश पातळीवरचे नेते फिरकले नसल्याने, कॉंग्रेसच्या गोटात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कॉंग्रेसच्या प्रचाराचे तीन-तेरा वाजले आहेत.
पुणे - अधिकृत उमेदवारांना "एबी' फॉर्म उशिरा दिल्याने राष्ट्रवादीत 45 प्रभागांमध्ये बंडखोरीची लागण झाली आहे. शंभराहून अधिक बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. यातील किमान दहा ते बारा प्रभागांमध्ये पक्षाला अडचण होऊ शकते. राष्ट्रवादीने सर्व 152 जागांवर उमेदवार उभे केले असून 151 उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर एका उमेदवाराला पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आली आहे.
पुणे - अद्ययावत मतदार याद्या आणि मोठ्या सोसायट्यांमध्येच करण्यात येणारी मतदान केंद्रे, यामुळे गेल्या दोन निवडणुकांपेक्षा या वेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. "व्यवस्था बदलण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा,' असे जनजागरण विविध माध्यमातून होत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या 2002 च्या निवडणुकीत जेमतेम 50 टक्के आणि 2007 मध्ये 52.76 टक्के मतदान झाले होते.
पिंपरी - आमच्या उमेदवारांना धमकाविण्याचे प्रकार घडत आहेत मात्र यापुढे सहा दिवस आपण पुण्यातच तळ ठोकून बसणार आहे. कोण कशी दादागिरी करतो तेच मी पाहतो, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन बुधवारी (ता. 8) आकुर्डी येथे पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील तीस टक्के लढती या गावकी-भावकी व जवळच्या नात्यागोत्यातच होत आहेत. भावकीतील एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने मत कुणाला द्यायचे याची चिंता भावकीला सतावत आहे. शहरात बारणे, भालेकर, भालेराव, कलाटे, कुटे, तापकीर, भोंडवे, साने, गावडे, लांडगे, वाघेरे ही भावकी महापालिकेच्या निवडणूक रिंगणात आहे. तसेच सासू-सून, जावा-जावा, दीर-भावजय, चुलता-पुतण्या या नात्यांतच निवडणुकीतील लढाई पाहायला मिळणार आहे.
पिंपरी - "आरोप केला म्हणून कोणीही गुन्हेगार ठरत नाही', असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत केले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यातील आरोपी खासदार सुरेशभाई कलमाडी यांनीही याच प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना व गुन्हेगारांना पाठीशी घालणारे दादा-भाई एकाच माळेचे मणी असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड नागरी संघटनेचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केला आहे.
पिंपरी - ""शहरात मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या नावाखाली पालिका आयुक्तांनी सत्ताधारी पक्षालाच मतदान करण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याप्रकरणी, संबंधित अधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जावा. तसेच योग्य ती कारवाई केली जावी,'' अशी मागणी पिंपरी-चिंचवड नागरी संघटनेने बुधवारी केली.
पुणे - जिल्ह्यात पाणीटंचाईने यंदा जानेवारीपासूनच उग्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे ते या वर्षी जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्यातील 10 गावे आणि 54 वाड्यावस्त्यांना 11 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक नऊ टॅंकर एकट्या बारामती तालुक्यात सुरू झाले आहेत. आतापर्यंत पुणे विभागात सर्वांत आधी सोलापूर जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होत असत. चालू वर्षी यात पुण्याने पहिला क्रमांक पटकावला आहे.
जेजुरी - माघी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार संगमनेरचे होलम, सुप्याचे खैरे, जेजुरीचे होळकर या मानाच्या काठ्यांसह अनेक प्रासादिक काठ्या खंडोबा मंदिराच्या शिखराला टेकविण्यात आल्या. देवभेटीचा हा सोहळा जल्लोषात पार पडला. होलम राजाच्या काठीबरोबरच्या भाविकांनी भंडार-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. सुप्याचे खैरे व संगमनेरचे होलम यांच्यामध्ये मानाच्या विषयावरून यापूर्वी वाद होत राहिले.
पुणे - कॉंग्रेस पक्षाने मराठा समाजाचे सर्वाधिक 56, मुस्लिम 14, माळी 12 तर ब्राह्मण समाजाचे दोन उमेदवार महापालिका निवडणुकीत उतरवले आहेत. सर्व समाजाला न्याय दिल्याचा दावा पक्षाने केला. कोणत्या समाजाला किती प्रतिनिधित्व दिले, याचा तक्ता बुधवारी पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला. यात मराठा समाजाच्या खालोखाल मुस्लिम समाजाला संधी मिळाली आहे.
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या 14 सदस्यांच्या गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येलाच परवानगी दिली आहे. यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी सात जागा आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे (मावळ), दत्ता चव्हाण (ता. पुरंदर), राजेश जामदार (ता.
मंचर - आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा गणांसाठी निवडणुकीचे मतदान झाले. पंचायत समितीच्या आठ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने, तर शिवसेनेने सहा ते सात जागांवर विजयाचा दावा केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, असे विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले, तर जिल्हा परिषदेच्या तीन जागा शिवसेना जिंकेल, असा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शिरूर - जिल्हा परिषद - पंचायत समितीसाठी शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 21 व पंचायत समितीचे 46 असे मिळून सुमारे 67 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. आता निकालाबाबत विविध प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे. निकालाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. महाआघाडीत झालेली बिघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी - दोन वॉर्डांचा एक प्रभाग झाला आहे. यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचायचे कसे, याबाबत उमेदवार धास्तावले आहेत, तर उमेदवाराच्या प्रचारासाठी त्याचे कार्यकर्ते व नातेवाईकही झपाट्याने कामाला लागले आहेत. प्रचारासाठी वेळी-अवेळी येणाऱ्यांमुळे मतदार पुरते वैतागले आहेत. गुरुवारी (ता. 16) होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी दोन दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी प्रचार समाप्त होणार आहे. यामुळे प्रचारासाठी अवघे सहा दिवस उरले आहे.
पुणे - ""सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळू शकणार नाही, या उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत पाच दिवसानंतरही मिळालेली नाही. यातून, सर्वोच्च न्यायालयात जाण्यास रोखण्याचा प्रयत्न दिसतो,'' असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. "रोड शो'मुळे आचारसंहितेचा भंग झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी "निवडणूक आयोगाने 1995 पासून काय "शूटिंग' केले आहे, ते मला पाहायचेय. त्यात, किती जणांना शिक्षा झाली.
पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे "रोड शो' झाले पण त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यात अडकलेल्या वाहनचालकांनी "आमच्या अडवणुकीचा रोड शो बंद करा,' अशी मागणी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे केली. दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.