Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


साहित्य संमेलन
रोशना मणचेकर  - सकाळ वृत्तसेवा ठाणे  - 84 व्या "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'चा हिशेब 31 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या संमेलनाच्या हिशेबाचा वाद गाजल्यानंतर ठाणेकरांनी धडा घेऊन एक महिन्याची "डेडलाईन' स्वत:साठी घालून घेतली आहे. हिशेब वेळेत देता यावा यासाठी सध्या संमेलन कार्यालयात खर्चाचा लेखाजोखा मांडला जात आहे.

Friday, December 31, 2010 AT 12:15 AM (IST)

नवी मुंबई  - नुकतेच 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात झाले. या संमेलनास नवी मुंबई महापालिकेने 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर करून स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र आपल्या परिसरात झालेल्या पहिल्या आगरी साहित्य संमेलनास व महिला साहित्य संमेलनास महापालिकेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. कोणतीही मदत केली नाही. नवी मुंबईतील नागरिक याविषयी आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

Friday, December 31, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे  - संमेलन सर्वदूर पोहोचावे यासाठी संमेलनात जसजसे कार्यक्रम होतील त्याची सर्व माहिती संमेलनाच्या वेबसाईटवर मिळेल. जेणेकरून परदेशात असलेल्यांनाही संमेलनाची माहिती मिळेल, असे आयोजकांनी संमेलनाच्या वेबसाईटच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले होते. मात्र, संमेलन झाल्यावर वेबसाईटवर संमेलनातील कोणत्याच कार्यक्रमाची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे संमेलन सर्वदूर पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न फसला आहे.

Wednesday, December 29, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे : ८४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या शेवटच्या पर्वात टिपलेली छायाचित्रे. (सकाळ छायाचित्रसेवा)

Tuesday, December 28, 2010 AT 01:12 AM (IST)

ठाणे : ८४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या शेवटच्या पर्वात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संमेलनाला भेट दिली. या वेळी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला.   महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा.

Tuesday, December 28, 2010 AT 12:30 AM (IST)

महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे)  - टांक, लेखनी जाऊन आलेल्या संगणकाच्या कळफलकाचा मराठी लेखनकलेवर काय परिणाम होईल याचा विचार करण्यासाठी जमलेल्या तज्ज्ञांनी हा प्रश्‍न भावी पिढीच्या हाती सोपवून दिला आहे. समीरण वाळवेकर यांनी आभासी विद्यापीठाची संकल्पना मांडून संवाद तंत्रज्ञान कला प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे असे सांगितले, पण यमाजी मालकर यांनी त्यावर आक्षेप घेतला. 70 टक्के जनता अजून या तंत्रापासून लांबच आहे.

Tuesday, December 28, 2010 AT 01:02 AM (IST)

शरद विचारे  - सकाळ वृत्तसेवा महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) - अठरापगड महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही त्याच्या बोलीएवढीच महत्त्वाची आहे. या लोकसंस्कृतीनेच मराठीच्या विविध बोली जतन करून ठेवल्या आहेत. त्यांच्या विविधरंगी-ढंगी सादरीकरणाने साहित्यसूर्य नारायण सुर्वे सभामंडप दणाणून गेला. ठाणे येथील लोकरंग संस्थेच्या डॉ. प्रकाश खांडगे व महाराष्ट्रातील इतर कलाकारांनी हा आविष्कार सादर केला. मार्मिक वर्णनासह प्रा.

Tuesday, December 28, 2010 AT 01:01 AM (IST)

विद्याधर कुलकर्णी  - सकाळ वृत्तसेवा महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे)  - महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती, संस्थात्मक, सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनाचे जतन, जोपासन व अभिवृद्धी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत.

Tuesday, December 28, 2010 AT 12:30 AM (IST)

महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे)  - वाचन संस्कृतीच्या विकासासाठी सार्वजनिक ग्रंथालये अपयशी ठरलेली नाहीत मात्र ग्रंथालय चळवळीमध्ये गुणात्मक बदल होण्याची आवश्‍यकता असून काळाची पावले ओळखून बदल घडवावेत, अशी अपेक्षा सोमवारी चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आली. "वाचन संस्कृतीच्या विकासासाठी सार्वजनिक ग्रंथालये अपयशी ठरली आहेत का?' या विषयावर जनकवी पी. सावळाराम सभामंडप येथे झालेल्या चर्चासत्रात मुकुंद अनगळ, डॉ.

Tuesday, December 28, 2010 AT 12:23 AM (IST)

महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) -  मराठीच्या अधोगतीला केवळ सरकारच नव्हे, तर समाजही जबाबदार आहे. भाषा समृद्ध करायची असेल, तर घरादारात साधी सोपी मराठी वापरायला सुरवात केली पाहिजे पण सरकारलाही आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, असा सूर "मराठी भाषेच्या अधोगतीस जबाबदार कोण?' या विषयाच्या अभिरूप न्यायालयात काढण्यात आला. बी. एन. देशमुख यांनी न्यायदानाचे काम केले.

Monday, December 27, 2010 AT 12:15 AM (IST)

महाकवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरनगरी (ठाणे)  -  संगणकावर मराठीचा इंग्रजीसारखा विश्‍वव्यापी वापर करता येतो आणि जगभरात तो कोठेही वाचला जातो, यावर ज्यांचा विश्‍वास नव्हता, अशांना आज आश्‍चर्याचा धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राने साहित्य संमेलनात "युनिकोड ः संगणकावर मराठीचा वापर व त्याचे प्रमाणीकरण' या विषयावर कार्यशाळा घेतली. त्यात मराठीच्या सुलभीकरणाचा उपस्थितांना प्रत्यय आला. राममोहन खानापूरकर यांनी याचे प्रात्यक्षिक दाखविले.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे -  साहित्यामध्ये परीस होण्याची शक्ती आहे. सातत्याने साहित्य वाचण्याची आवड जपली पाहिजे. कधीतरी तुम्हाला संपूर्ण जीवन बदलणारे साहित्य सापडेल, असा आशावाद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. तसेच या वेळी त्यांनी कालच्या भाषणाबद्दल संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे कौतुक केले. कांबळे यांचे भाषण सर्वसामान्यांच्या भावना व्यक्त करणारे होते, असे ते म्हणाले.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) -  कुंचल्याच्या फटकाऱ्यातून फळ्यावर उमटणारी पक्षी, प्राणी आणि फळांची चित्रे, कागदाच्या साह्याने ओरिगामी कलेतून निर्माण झालेल्या विविध कलाकृती, वर्तमानपत्राच्या कागदापासून बनविलेल्या वेगवेगळ्या टोप्या अशा माध्यमांतून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी आज बाळगोपाळांशी गप्पा मारल्या. संमेलनातील पी. सावळाराम सभामंडपात झालेल्या बालमेळाव्यात अवचट बालगोपाळांमध्ये रमले.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे -  ठाणे शहर तलावांचे... लेण्यांचे... हिरव्यागार डोंगराचे... इतिहासाचे, पुराणाचे आणि बदलणाऱ्या वास्तवांचे... वेड्यांना शहाणे करणारे आणि साहित्याचे वेडही लावणारे... या शहराला परंपरा आहे... इतिहास आहे, चळवळ आहे तशीच वैचारिक बैठक आहे. हा इतिहास साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चित्रफितीद्वारे रसिक श्रोत्यांसमोर उभा करण्याचे काम संजीवनी खेर आणि किरण चित्रे यांनी आज केले.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

साहित्यसूर्य नारायण सुर्वे सभामंडप (ठाणे)  - जगदीश खेबुडकर या चित्रपटकवीची लेखणीच नव्हे तर वाणीही कशी गारूड करते, हे शेकडो साहित्यरसिकांनी रविवारी (ता. 26) अनुभवलं. त्यांच्या गीत-कविता आणि किश्‍शांनी अशी काही बहार आणली की त्यांच्या मुलाखतीला वन्स मोअरऐवजी "वन मोअर... आणखी एक प्रश्‍न होऊन जाऊ दे'चा प्रतिसाद रसिकांनी दिला. रसिकांच्या भरघोस आग्रहामुळेच त्यांची मुलाखत लांबवावी लागली पण त्यानंतरही रसिकांचा "नका सोडून जाऊ...

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे  - अतिरेकी कोण असतात, त्यांचा धर्म कोणता असतो, याबद्दलचे पक्के ठोकताळे देशातच नव्हे तर जगातल्या अनेकांच्या मनात वर्षानुवर्षे अगदी ठाम बसलेले आहेत. प्रत्येक मुस्लिम हा अतिरेकी नसला तरीही प्रत्येक अतिरेकी हा मुस्लिमच असतो, याबद्दलचं व्यवस्थित "ब्रेनवॉशिंग'देखील काही विशिष्ट गटांकडून हेतुपुरस्सर केलं जातं. सर्वसामान्यांच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मुस्लिम बांधव निरनिराळ्या पद्धतीने प्रयत्न करीत असतात.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

सव्वीस वर्षांपूर्वी जळगावला भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनास मी हजर राहिलो होतो. शंकरराव खरात अध्यक्ष असल्याचे अप्रूप होते. कारण एका दलित लेखकास हा मान प्रथमच मिळाला होता. खरातांचे धडे पाठ्यपुस्तकात होते. त्यांचे साहित्य वाचले होते. लहानपणी शाळेत असताना ते ताट-तांब्या घेऊन बोर्डिंगचे जेवण जेवायला जात असत. पहिल्या दिवशी जेव्हा ते स्वयंपाकाच्या खोलीत गेले, तेव्हा तेथे तेच एकटे नवखे विद्यार्थी होते.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) -  जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा परिणाम ग्रामीण समाज आणि मराठी भाषेवर झाल्याच्या मुद्द्यावर परिसंवादात वक्‍त्यांचे एकमत झाले. चार वक्‍त्यांनी प्रतिकूल परिणामांकडे लक्ष वेधले तर दोघांनी जागतिकीकरणाच्या सकारात्मक पैलूंविषयी भाष्य केले. साहित्यसूर्य नारायण सुर्वे सभामंडपात "जागतिकीकरण, ग्रामीण समाज आणि मराठी भाषा' या विषयावरील चर्चासत्रात रमेश इंगळे-उत्रादकर, संजय बच्छाव, ऍड.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

ठाणे, वि. दा. सावरकर साहित्यनगर  - कविता म्हणजे काय, हे कवितेतून उलगडून दाखविताना अजीम नवाझ राही या सावरखेडा येथील कवीने 84 व्या अ. भा. साहित्य संमेलनात जोरदार दाद मिळविली. "कविता म्हणजे महाडच्या चवदार तळ्याला बाबासाहेबांचा स्पर्श' या त्यांच्या ओळी रसिकांनी डोक्‍यावर घेतल्या. शनिवारी संध्याकाळी कवी प्रवीण दवणे यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. सतीश सोळांकुरकर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

मंडप क्रमांक : 1 सकाळी 9.30 ते 11 कविसंमेलन अध्यक्ष - प्रा. अशोक बागवे सूत्रसंचालक : महेश केळुस्कर सहभाग : निमंत्रित कवी --- सकाळी 11.30 ते दुपारी 1 लोकसाहित्य व लोककला सादरीकरण डॉ. प्रकाश खांडगे व कलाकार ------- दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 कथाकथन अध्यक्ष - द. मा. मिरासदार सहभाग - विलास सिंदगीकर- लातूर, अनंत भोयर- नागपूर, सुरेश कानिटकर- भोपाळ, अशोक चिटणीस- ठाणे, चांगदेव काळे- ठाणे, प्रियवंदा करंडे- मुंबई, बाबा परिट ----- सायंकाळी 5.30 ते 7.

Monday, December 27, 2010 AT 12:00 AM (IST)

विद्याधर कुलकर्णी  वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) - "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी' या "मराठी अभिमानगीता'च्या साक्षीने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची ध्वजा फडकविण्याचे ध्येय बाळगत 84 व्या "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या "शब्दोत्सवा'स आज सुरवात झाली.

Saturday, December 25, 2010 AT 01:26 PM (IST)

""म. फुल्यांनी "शेतकऱ्यांच्या आसुडा'चं लेखन याच जिल्ह्यातील वांगणी या गावी केलं होतं...नव्या आसुडाची निर्मिती हेच या संमेलनाचं फलित असेल. चला, नव्या आसुडाच्या निर्मितीला लागू या...'' - इतक्‍या निःसंदिग्ध थेटपणाने साहित्यसंमेलनाचे फलित व अध्यक्षीय आवाहन उद्‌घोषित करणारे अध्यक्षीय भाषण बहुधा पहिलेच ठरावे. कृतप्रत्ययाने व आत्मविश्‍वासाने खळाळून वाहणाऱ्या या भाषणात नम्रता आहे पण क्षमाव्यंजक मंदस्वर कुठेही नाही, हेही एक वैशिष्ट्यच.

Sunday, December 26, 2010 AT 12:30 AM (IST)

स्वा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) - महाविद्यालयांतील सांस्कृतिक चळवळींपासून ते राज्याच्या सर्वांगीण ऐक्‍यापर्यंत विविध विषयांवरील परिसंवादांनी साहित्य संमेलनात शनिवारी रंग भरले.

Sunday, December 26, 2010 AT 12:36 AM (IST)

मुंबई - कल्पनेपेक्षा वास्तव भयानक असते त्यामुळे ते लिहिणे व मांडणे महाकठीण काम असते. कारण, वास्तव जगणेच कठीण काम असते! असे उद्‌गार प्रसिद्ध पटकथा व संवाद लेखक शिरीष लाटकर यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात "निरुत्तर' हा चित्रपट दाखविण्यात आला. गडकरी रंगायतन येथे झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. त्यानंतर परिसंवाद झाला.

Sunday, December 26, 2010 AT 12:16 AM (IST)

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर साहित्यनगरी (ठाणे) - संमेलनात एक पुस्तक खरोखरच रसिक-वाचकांशी बोलले... मनापासून! संयुक्त कुटुंबपद्धती, पती-पत्नीतील भावनिक धागे आणि एका महाराष्ट्रीय उद्योजकाची भरारी, अशा अनेक विषयांचे पदर या पुस्तकाने उलगडून दाखविले. राम गणेश गडकरी रंगायतन सभागृहात आज "ती आणि मी' हा आगळावेगळा दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Sunday, December 26, 2010 AT 12:15 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: