Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


सोशल नेटवर्किंग
भूकंपाचे हादरवून सोडणारे धक्के आणि त्यानंतर काही वेळातच आलेल्या त्सुनामीच्या लाटांनी जपानमधील यंत्रणा गेल्या शुक्रवारी कोलमडली. अत्यंत प्रतिकूल अशा या परिस्थितीत जपानी नागरिकांच्या मदतीला धावून आले ते सोशल नेटवर्किंग. आधीच "टेक्‍नोसॅव्ही' असलेल्या जपानी लोकांनी नव्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केला.  भूकंपानंतर सुरवातीला काही वेळ तिथे मोबाईल लागत नव्हते.

Wednesday, March 16, 2011 AT 12:45 AM (IST)

इंटरनेटच्या महाजालात माहितीचा खजिनाच दडलाय. त्यांपैकी काही उपयुक्त, तर काही निरुपयोगी, काही आश्‍चर्यकारक तर काही नेहमीचीच, काहीमध्ये कल्पकतेचा पुरेपूर वापर, तर काही नुसतीच माहितीने गच्च भरलेली. एखाद्या विषयाचा शोध घेताना इथं कधी काय हाती लागेल, हे सांगता येत नाही. जे हवंय, ते शोधताना पहिल्याच झटक्‍यात सापडले, तर त्याला नशीबवान म्हणावे लागेल. "पोलिटिकल कंपास' हे असेच एक भन्नाट संकेतस्थळ.

Thursday, February 17, 2011 AT 12:00 AM (IST)

केव्हाही, कुठेही, कोणाबरोबर पटकन संवाद साधण्यासाठी ई-मेलचा उपयोग होत असला, तरी आजच्या तरुण पिढीचे मत थोडेसे वेगळे आहे. सोशल नेटवर्किंगला सरावलेल्या नव्या पिढीला हे माध्यम खूप हळू आणि पारंपरिक असल्याचे जाणवू लागलेय. एसएमएस, एमएमएस, इंन्स्टंट मेसेजिंग (आयएम), ट्विट्‌स, फेसबुक यांचा वापर केल्याशिवाय एक दिवसही न जाणाऱ्या विशी-पंचविशीतल्या वर्गाचा कल आता ई-मेलचा माफक वापर करण्याकडे वळू लागलाय.

Thursday, January 20, 2011 AT 12:15 AM (IST)

गेले दशक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांसाठी उत्साहवर्धक होते. दिवसेंदिवस फेसबुक, ट्‌विटर, ऑर्कुट, मायस्पेस, यू ट्यूब या संकेतस्थळांचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. माहितीच्या आदान-प्रदानाबरोबर वैयक्तिक अनुभव इतरांना सांगण्यापासून ते आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवरील प्रतिक्रियांना वाट मोकळी करून देण्यापर्यंत सर्वकाही या माध्यमातून शक्‍य झाले. सोबत छायाचित्रे, व्हिडिओंमुळे या सगळ्याला अधिक नेमकेपणाही आला.

Wednesday, January 05, 2011 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली- जगभर वाढती लोकप्रियता लाभलेल्या 'फेसबुक' या सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपले भारतातील कार्यालय हैदराबाद येथे सुरू केले आहे. गुरुवारी या कार्यालयाचा उद्‌घाटन समारंभ साजरा झाला. या कार्यालयाची धुरा किर्तिगा रेड्डी यांच्या हातात सोपविण्यात आली आहे. 'फेसबुक'च्या 'ऑनलाईन ऑपरेशन्स' संचालक असलेल्या रेड्डी भारतीय कार्यालयाच्या प्रमुख आहेत.

Friday, October 01, 2010 AT 01:55 PM (IST)

नवी दिल्ली -  अयोध्या खटल्याचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार असल्याने दिल्लीसह सर्व प्रमुख शहरातील सायबर कॅफे गुरुवारी गर्दीने वाहत होते. निकालानंतर राष्ट्रीय एकात्मता व धार्मिक सलोखा राहण्यासाठी अनेकांनी ट्विटर व विविध ब्लॉगवर आवाहन केले. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात कोणत्याही खटल्याचा निकाल पहिल्यांदाच ऑनलाइन जाहीर होणार असल्याने या निकालाविषयी कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये होती.

Thursday, September 30, 2010 AT 01:39 PM (IST)

न्यूयॉर्क- 'ऑर्कूट' वापरणाऱ्या लाखो लोकांना डोकेदुखी ठरलेला 'बॉम सबाडो' व्हायरस दूर करण्यात 'ऑर्कूट'ची मातृसंस्था असलेल्या 'गुगल'ला यश आले आहे. आपल्या ब्लॉगवर 'गुगल'ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काहींच्या 'ऑर्कूट प्रोफाईल'ना ज्याची बाधा झाली होती तो 'बॉम सबाडो' व्हायरस दूर करण्यात आम्हाला यश आले आहे. बाधा झालेल्या 'प्रोफाईल'ना पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरू आहे. 'बॉम सबाडो' या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे 'चांगला शनिवार'.

Monday, September 27, 2010 AT 12:58 PM (IST)

सोशल नेटवर्किंगमुळे संपूर्ण इंटरनेटविश्‍वाची दिशा बदलत चालली असून त्याला ईमेलसेवाही अपवाद राहिलेली नाही. फेसबुक, ट्‌विटरच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी जीमेलने "बझ्झ' आणण्याबरोबरच चॅटिंग, मोबाईल ऍक्‍सेस अशा भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जीमेल हे सध्या सर्व नेटिझन्सची पसंत, गरज आणि सवय बनली आहे. त्यामुळे अन्य ईमेल कंपन्यांनाही त्या तोडीच्या सेवा देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Tuesday, August 24, 2010 AT 10:35 AM (IST)

विद्यार्थी वर्गात सोशल नेटवर्किंगचा प्रसार होत असताना या संपर्क यंत्रणेचा चांगला वापर कसा करून घेता येईल, याचा विचार करायला हवा. म्हणजे शैक्षणिक संस्थेची व क्‍लासची निवड, करिअर प्लॅनिंग यांसारख्या विषयात या माध्यमाचा उत्कृष्ट उपयोग होऊ शकतो. गे ल्या पंधरा वर्षांपासून जगभरात इंटरनेटचा वापर सातत्याने वाढतो आहे. सुरवातीला माहितीचे मायाजाल म्हणून तसेच ई-मेलच्या माध्यमातून संपर्क व्यवस्था म्हणून इंटरनेटचा वापर झाला.

Saturday, August 14, 2010 AT 10:57 AM (IST)

सोशल नेटवर्किंगच्या वापरातून डॉक्‍टर आणि रुग्ण अधिक जवळ येऊ शकतात. या आधुनिक माध्यमामुळे जगभरातील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अ मेरिकेतील ही घटना. आधुनिक विज्ञानातील इंटरनेट/सोशल नेटवर्किंग माध्यमांचा रुग्णाच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठीसुद्धा कसा उत्तम उपयोग करून घेता येतो, याचे हे उत्तम उदाहरण. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील 'स्कॉर्च कैथ ('Scorch Keith' U.S.A.) या व्यक्तीची ही कथा. एका भयंकर विषाणू कीटकाने स्कॉर्च यांचा चावा घेतला.

Saturday, August 14, 2010 AT 10:53 AM (IST)

सोशल मीडियाचा वापर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी आणि नोकरी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अगदी जाता जाता बनवलेले "फेसबुक'वरचे तुमचे प्रोफाईलही कदाचित तुमची नोकरीची संधी ठरवू शकते. त्यामुळे नोकरीचा शोध घेताना अशा साइटस्‌वरील आपली प्रोफाईल्सही "अप टू डेट' ठेवली पाहिजेत. कोणत्या सोशल नेटवर्कचा कसा वापर करायचा नोकरीसाठी...? "कॉलेज संपले, आता नोकरी शोधली पाहिजे...'' "मला माझ्या नोकरीत आता बदल हवाय...'' "मी या नोकरीला वैतागलोय.

Monday, August 09, 2010 AT 12:59 PM (IST)

हा य गाईझ! 21 व्या शतकामध्ये आज आपणाकडे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. कारण आज आपण सर्व जण कशात ना कशात बिझी आहोत. त्यामुळे आपण सर्व प्रकारचे इमोशन्स व रिलेशन्स विसरत चाललो आहोत. परंतु या बिझी लाईफमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ही एक आधुनिक पद्धत आहे. सोशल मीडिया म्हणजे, ऑनलाईन मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे गट असतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या पातळीवरील माहिती एकमेकांशी शेअर केली जाते. यामध्ये खालील प्रकारची वैशिष्ट्ये असतात.

Monday, August 09, 2010 AT 12:58 PM (IST)

आधुनिकता नुसती तंत्रज्ञानाद्वारे येऊन चालणार नाही. ती मनोभूमिकेतही यायला हवी. शेवटी तंत्रज्ञान वापरणारं मन कसं आहे, त्यावर ते कोणत्याही उद्देशानं वापरलं जाणार, हे ठरत असतं. अणुपासून बॉंबही बनवता येतो आणि कर्करोगावर उपचारही करता येतात तसंच माहिती तंत्रज्ञानानं सर्वसामान्यांचं आयुष्य अधिक सुखी, समाधानी बनवता येऊ शकतं, तसंच ते उद्‌ध्वस्तही करता येतं. अ लीकडेच फिनलंड या देशानं आपल्या सगळ्या नागरिकांना एक अधिकार दिला.

Monday, August 09, 2010 AT 12:54 PM (IST)

'सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त 'सोशल नेटवर्किंग' या विषयावर विविध लेख प्रसिद्ध झाले आहेत. जगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या सोशल नेटवर्किंगविषयीची माहिती, साईटस, उपयोग अशा अनेक गोष्टींवर मान्यवर लेखकांनी लिहिलेले लेख 'ई-सकाळ 'च्या वाचकांसाठी... ओळख, मैत्री, प्रेम आणि सेक्‍सही   चकाकते ते सो. ने. नव्हे!   मोबाईल-मैत्री   हौसे, गवसे आणि नवशांची मांदियाळी   नवा जमाना....

Tuesday, August 03, 2010 AT 05:03 PM (IST)

संगणकीय तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा म्हणून ई-मेल (म्हणजे आधीचे पत्रलेखन), मेल ऍड्रेस (आधीचा घरचा पत्ता) करायला लावून मग गप्पा, मैत्री, समूह, संकेतस्थळ यांत खेचले जाते. त्यासाठी फेसबुक, फ्लिकर, लिंक्‍ड इन, ट्‌विटर वगैरे यांचा जन्म झाला आहे. म्हणजे या गोष्टी माध्यमही आहेत आणि उद्दिष्टही. विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा अमुक एक संघ जिंकेल असा पॉल नावाच्या एका ऑक्‍टोपसाने कौल दिला.

Thursday, August 05, 2010 AT 05:55 PM (IST)

जीवनात प्रत्येकाला मैत्री करायला आवडते. मैत्रीसाठी वय, जात-भेद, भाषा यांपैकी कशाची गरज लागत नाही. त्यामुळे आबालवृद्धापर्यंत प्रत्येक जण मित्र-मैत्रिणीच्या शोधात असतो. जीवनात कोणत्याही वळणावर ओळख होत असते, पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. तंत्रज्ञानामुळे तर जग एकदम जवळच येऊन ठेपले आहे, त्यामुळे मैत्री करण्यासाठी ओळख असायलाच हवी, असे काही नाही....

Wednesday, August 04, 2010 AT 04:11 PM (IST)

समाजपुरुष हा हे सर्व बरे-वाईट पुढे घेऊन जाणारा काळाचा आरसा आहे, असे मानले तर माहितीमध्ये बुडालेले हौसे, तंत्रामध्ये अडकलेले नवसे आणि कधी प्रत्यक्ष - कधी अप्रत्यक्ष सामाजिक घडामोडीत रमणारे गवसे यांनी देश ढवळून निघाला आहे. स ध्या सगळीकडे जुन्याच गोष्टी पुनःपुन्हा शोधून काढण्याची अहमहमिका लागलेली आहे. मग असे एखाद्याने केले की त्याचे श्रेय मिळवण्यासाठी माणसापासून देशापर्यंत मतभेद सुरू होतात.

Wednesday, August 04, 2010 AT 04:08 PM (IST)

आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोशल नेटवर्किंगमध्ये झालेले बदल तसेच यासंदर्भातील सद्यःस्थिती आणि या माध्यमाचा येणाऱ्या वीस-पंचवीस वर्षांत व्याप आणि विस्तार कसा वाढेल, याचे कल्पनाचित्र. ए कविसाव्या शतकात "घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीची जागा संगणक घेईल. संगणकाचा महत्त्वाचा उपयोग माहिती मिळवणे, साठवणे आणि देवाणघेवाण करणे असा असल्याने माहिती तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाणारे हे शास्त्र पुढील सहस्रकात सर्वव्यापी होईल.

Tuesday, August 03, 2010 AT 02:59 PM (IST)

समाज हा नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी, हितचिंतक यांनी बनलेला असतो. हा समाज आपल्याला सुरक्षितता देतो. मित्र-मैत्रिणी, सखे-सोबती आपल्याला मानसिक आधार देतात आणि अडीअडचणीला मदतही करतात. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयीन ठिकाणी नित्य नव्या मित्रांची भर पडत असते. मित्रसंचय वाढवत राहण्याची अनेकांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. मित्र आकर्षित होतात ते स्वभाव वैशिष्ट्यांमुळं.

Tuesday, August 03, 2010 AT 02:54 PM (IST)

गा वागावांमधले वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण यांसारख्या अनेक प्रश्‍नांशी संबंधित असलेले दबावगट उभे करणं, त्यांना दिशा देण्यासाठी या 'सोशल नेटवर्किंग'वाल्या वेबसाइट्‌समध्ये संबंधित तज्ज्ञांना सहभागी करून घेणं असे अनेक उपक्रम हाती घेणं शक्‍य आहे. 'सोशल नेटवर्किंग' हा प्रकार आपल्याकडे काही वर्षांपूर्वी आला, तेव्हा बऱ्याच जणांना त्याच्याविषयी फारशी कल्पना नव्हती.

Tuesday, August 03, 2010 AT 02:48 PM (IST)

इं डियन प्रीमिअर लीग म्हणजेच "आयपीएल'च्या कोची संघाच्या मालकीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि अखेर देशाच्या परराष्ट्र राज्य मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शशी थरूर यांच्यामुळे देशातील सर्वसामान्यांनाट्‌विटरची आणि पर्यायाने सोशल नेटवर्किंग साइट्‌सची ओळख झाली. ट्‌विटरवर फॉलोअर्सची संख्या 8-10 लाखांच्या घरात असलेले शशी थरूर यांना "ट्‌विटर मिनिस्टर ऑफ इंडिया' अशी ख्याती जगभर प्राप्त झाली.

Tuesday, August 03, 2010 AT 02:42 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: