...म्हणून मोदी मला घाबरतात- राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची वैयक्तिक माहिती, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे ते मला बोलू देण्यासाठी घाबरतात, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी आज (बुधवार) नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी मला घाबरत असल्यामुळे चर्चेपासून दूर पळत असल्याचे यावेळी राहुल यांनी म्हटले आहे. 
 
नोटाबंदीसह अनेक विषयांवर आपल्याला बोलायचे असून, बोलू दिले तर ते सर्वांसमोर येईल, असे सांगून ते म्हणाले, "मला बोलू दिले तर त्यांचा फुगा फुटेल त्यामुळे पंतप्रधान मोदी घाबरत आहेत. मोदी यांच्याबद्दलच्या वैयक्तिक माहिती माझ्याकडे असून त्यावर मला लोकसभेत बोलायचे आहे. परंतु, मला बोलू दिले जात नाही."