रुग्ण आणि डॉक्‍टर यांचे समबंध

रुग्ण आणि डॉक्‍टर यांचे समबंध

कुठलाच व्यवसाय असा नसतो, की ज्यात एकमेकांवर विश्वास नसला तरी चालू शकते. विश्वास हा हवाच. श्रद्धा ही विश्वासाची अंतिम पायरी आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा तऱ्हेनेच प्रत्येक व्यवसाय करावा लागतो. त्यातही क्रम लावायचाच, तर सर्वांत वरच्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. या क्षेत्रात श्रद्धा हीच महत्त्वाची असते. यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे ज्ञान देण्याचा शैक्षणिक व्यवसाय. हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी आवश्‍यक असणारा पैशांचा व्यवहार हा प्रेमाचाच असावा आणि या व्यवसायातही श्रद्धेला खूप महत्त्व असावे. तिसऱ्या पायरीवर आहे वैद्यकीय व्यवसाय. या व्यवसायातही डॉक्‍टर व रुग्ण या नात्यांत (व्यवसायांत) श्रद्धा महत्त्वाची असते. 

संबंध - समबंध - सम बंधन हा शब्दच असे सांगतो, की यात दोघांवर काही विशेष बंधने लागू होतात, दोघांनाही काही नियम पाळावे लागतात. असे जे नाते- जवळीक- व्यवहार असतात, त्याला संबंध असे म्हटले जाते. संबंधांच्या बाबतीत एक गोष्ट समजून घेणे आवश्‍यक आहे ती म्हणजे, संबंध हे श्रद्धेवर असतात. दिवसेंदिवस माणसाची श्रद्धा कमी करण्याचे प्रयत्न काही लोक करत असतात असे दिसते. कारण त्यांना ज्या गोष्टी विकायच्या असतात, त्या भीतीपोटी विकायच्या असतात, मग ती औषधे असोत, अन्न असो, कपडे असोत, दूध असो, घर असो... गिऱ्हाइकाला भीती दाखवली की चार पैसे जास्त मिळतात आणि धंदा चांगला होतो. वस्तू एकरकमी घ्यायची ऐपत नसल्यास कर्जाने पैसे घेऊन लोक या गोष्टी विकत घेतात. 

सर्वांत वरच्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र. या क्षेत्रात श्रद्धा हीच महत्त्वाची असते. यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या पातळीवर असलेला व्यवसाय म्हणजे ज्ञान देण्याचा शैक्षणिक व्यवसाय. हासुद्धा अत्यंत महत्त्वाचा असल्याने यासाठी आवश्‍यक असणारा पैशांचा व्यवहार हा प्रेमाचाच असावा आणि या व्यवसायातही श्रद्धेला खूप महत्त्व असावे. तिसऱ्या पायरीवर आहे वैद्यकीय व्यवसाय. या व्यवसायातही डॉक्‍टर व रुग्ण या नात्यांत (व्यवसायांत) श्रद्धा महत्त्वाची असते.

अशा प्रकारे कुठलाच व्यवसाय असा नसतो की ज्यात एकमेकांवर विश्वास नसला तरी चालू शकते. विश्वास हा हवाच. श्रद्धा ही विश्वासाची अंतिम पायरी आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ अशा तऱ्हेनेच प्रत्येक व्यवसाय करावा लागतो. 

फॅमिली डॉक्‍टर हा डॉक्‍टर-रोगी यांच्या संबंधांतील उत्तम दुवा आहे. फॅमिली डॉक्‍टरांना रुग्णाच्या घरातील सर्वांविषयी प्रेम हवे, सर्वांचा डॉक्‍टरवर विश्वास हवा. त्यांनी घरातील सर्वांवरच केव्हा ना केव्हा उपचार केलेले असल्यामुळे त्यांना घरातील सर्वांचीच प्रकृती, स्वभाव, घरातील घडामोडी यांची कल्पना असते. विशेषज्ञ डॉक्‍टर (स्पेशालिस्ट) रुग्णाला कसे बरे करता येईल याचा विचार करून उपचारांची निश्‍चिती होण्यासाठी आवश्‍यक असले तरी या सर्व कार्यवाहीमध्ये फॅमिली डॉक्‍टरचा सहभाग असल्यामुळे सगळ्यांचेच एकमेकांशी संबंध उत्तम राहतात.  

वैद्यांनी कसे उपचार करावे, त्यांनी रुग्णाशी कसे वागावे याविषयी आयुर्वेदात मार्गदर्शन केलेले आढळते. येणाऱ्या रोग्याचा एकूण अभ्यास करून त्यावर करावयाच्या उपचारांची योजना करावी, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. डॉक्‍टरांनी रुग्णाला सांगितलेले वाक्‍य हे ब्रह्मवाक्‍य आहे असे समजून त्यानुसार आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, डॉक्‍टरांनी सांगितलेले पथ्य-अपथ्य व्यवस्थित सांभाळावे, दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत. रुग्णाला बरेच दिवसांसाठी पथ्य सांगितलेले असले तर रोगी कंटाळू शकतो. अशा वेळी अपथ्य केल्यास रोग उलटून पथ्य सांभाळण्याचा कालावधी वाढू शकतो. एकंदर, डॉक्‍टर-रुग्ण यांच्यात उत्तम संपर्क- संभाषण हवे. 

आम्हाला डॉक्‍टरांनी वेळ द्यावा, आमचे पथ्य- अपथ्य- औषधे- आचरण याबद्दल त्यांनी आम्हाला रोज समजवावे, अशी रुग्णांची बऱ्याच वेळा अपेक्षा असते. परंतु रुग्णाला शरीरशास्त्र, पॅथॉलॉजी कळत नसल्याने त्याला किती व कसे समजावून सांगणार हा प्रश्न आहे. आजारी पडल्यावर विशिष्ट अन्न खावे म्हणजे पचनाला सोपे होते, शरीराची ताकद लवकर भरून येते. 

रोगी बरा झाल्यावर डॉक्‍टर- रोगी यांचे संबंध प्रेमाचे राहतील यात आश्‍चर्य नाही; पण रोग बरा होईपर्यंत म्हणजे उपचार चालू असतानाही डॉक्‍टर- रोगी यांच्यातील संबंध प्रेमाचे, विश्वासाचे असावे, अविश्वास ठेवून काहीही साध्य होत नाही.

रोग्याच्या आजाराबद्दल डॉक्‍टरांना काही शंका असल्यास दुसऱ्या डॉक्‍टरांचा सल्ला (सेकंड ओपिनियन) घेणे आवश्‍यक असते, यात डॉक्‍टरांनी कुठल्याही प्रकारचा कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. रुग्णाला रुग्णालयात ठेवलेले असल्यास रुग्णाने रुग्णालयाने दिलेले अन्नच दिलेल्या वेळीच खायला हवे असा रुग्णालयाचा एखादा नियम रुग्णाला गैरसोयीचा असू शकतो. परंतु रुग्णासाठी पथ्याचे जेवण घरून आणले असले तर ते खाऊ देण्याची परवानगी मिळवून देण्यात कुटुंबाच्या फॅमिली डॉक्‍टरची मदत होणे अपेक्षित असते. रुग्णाची पैशांची व्यवस्था होत नसली तर त्यासाठीही रुग्णालयाने अडून राहण्याची गरज नसावी, रुग्णाला बरे करणे हे सगळ्यात महत्त्वाचे ठरावे. 

रोग बरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (पॅथी) असतात. त्याला बरे करण्यासाठी माझीच पद्धत बरोबर असा अहंकार न बाळगता रुग्ण लवकर बरा व्हावा हे ध्येय ठेवून इतर पद्धतींची मदत घ्यायला अडचण नसावी. म्हणजेच रुग्ण-डॉक्‍टर व इतर उपचार करणारे सर्व डॉक्‍टर यांचे संबंध सलोख्याचे असावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com