Weight loss साठी पाणीपुरी फायदेशीर; आश्चर्यचकित होऊ नका, हे वाचा!

पाणीपुरी वजन कमी करण्यास मदत करते
panipuri
panipurisakal

पाणीपुरी हा शब्द जरी ऐकला तरी तोंडाला पानी येतं. प्रत्येकाला चटपटीत खावसं वाटतं गोलगप्पा, गुपचूप म्हणून ओळखले जाणारी पाणीपुरी सर्वांना आवडचे. असा क्वचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नसावी. सर्वात लोकप्रिय फास्ट फूड समजली जाणारी पाणीपुरी बरेच लोक खाण्यास टाळतात. अनेकांचा हा समज आहे की पाणीपुरी शरीरास हानिकारक आहे पण पुर्णत: हा गैरसमज आहे. पाणीपुरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात आश्चर्यकारक फायदा म्हणजे पाणीपुरी वजन कमी करण्यास मदत करते. (panipuri helps to make weight los)

panipuri
लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करण्याची सवय आहे? पुरुषांना होऊ शकतो हा त्रास...

वजन कमी करणाऱ्यांसाठी पाणीपुरी हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही डाएट करत असाल आणि वजन लवकर कमी करायचे असेल, तर एक प्लेट पाणीपुरीचे सेवन करा. पण तुम्हाला वाटेल पाणीपुरी वजन कसं काय कमी करू शकतात? पण हे खरंय. पाणीपुरीचे पाणी खूप गरम आणि मसालेदार असल्याने, ते तुमची भूक कमी करण्यास मदत करते फक्त पाणीपुरीसोबत गोड चटणी टाळणेही गरजेचे आहे ज्यामुळे वजन कमी होते. त्यामुळे आता पाणीपुरी खाण्यास घाबरू नका आणि बिनधास्त पाणीपुरी खा.

panipuri
Google वर सेक्स बाबत ही प्रश्न सर्वाधिक Search केली जातात..

याशिवाय तोंडाच्या फोडांचा त्रास होत असेल किेंवा मळमळ, चिडचिड किंवा मूड स्विंगचा त्रास होत असेल तर पाणीपुरीचे सेवन करा, तुम्हाला बरं वाटेल. पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना, जिरे आणि हिंग टाकल्याने जळजळ आणि मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. वजन कमी करण्यासाठी घरगुती पाणीपुरीची घ्यावी. ती शरीरास अधिक फायदेशीर असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com