प्रजासत्ताक दिनी अशा करा तिंरगी मिठाया!

केशर, पिस्त्याचा उपयोग तुम्हाला हे पदार्थ करण्यासाठी करता येईल.
Tricolour Sweets
Tricolour Sweets esakal

उद्या २६ जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक (Republic Day) दिन. हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही काही गोड-धोड (Sweet) करायचा विचार करताय का? तुम्ही या दिवसाचे निमित्त साधून तीरंगी मिठाई करू शकता. रेडिसन हॉटलचे शेफ राघवेंद्र सिंह यांनी तीन रंगाच्या करता येतील अशा रेसिपी (Food Recipe) सांगितल्या आहेत. त्यात तिरंगा पेढा, संदेश, तिरंगी बर्फी आदींचा समावेश आहे. हे पदार्थ कसे करायचे पाहूया.

Tricolour Sweets
बटाटा खाल्ल्यामुळे वजन होते कमी! कसे ते जाणून घ्या
tirangi pedha
tirangi pedha google

तिरंगी पेढा (४० ते ४५ पेढे होतील)

साहित्य- १ किलो मावा, २०० ग्रॅम साखर, ३०० ग्रॅम पिस्ता पेस्ट, २ ग्रॅम केशर, ५ लिटर दूध

कृती- दूध 30 - 45 मिनिटे गरम करा. गॅस कमी करा. नंतर माव्यात साखर मिसळा. मिश्रण 2 भागात विभागा. केशर रंग मिळविण्यासाठी एका वाडग्यात केशर घाला. तिसऱ्या वाडग्यात पिस्त्याची पेस्ट घाला. मिश्रण थंड झाल्यावर गोळे तयार करा. गोळे हळूवारपणे दाबा आणि त्यांना गोल आणि चपटा आकार द्या. रंगीत साखर, बदाम, काजू, पिस्ता किंवा मनुका घालून हे पेढे सजवा. पेढे सेट करून थंड होऊ द्या.

Tricolour Sweets
कॉफी आवडते! तीचे तीन फायदे वाचाच

तिरंगा बर्फी (१५ बर्फी होतील)

साहित्य- काजू १/५ किलो, साखर ४०० ग्रॅम, केशर ३ ग्रॅम

कृती- काजू तासाभरासाठी पाण्यात भिजवून ठेवा. एक तासाने स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा. त्यानंतर त्याची पेस्ट करून घ्या. त्यात साखर मिसळा. पेस्ट दुसऱ्या वाडग्यात काढा आणि मंद आचेवर 30-35 मिनिटे ढवळून घ्या. मिश्रण इतर 2 भांड्यांमध्ये विभागून घ्या. केशरी रंग येण्यासाठी एका वाडग्यात केशर घाला. हिरव्या रंगाची पेस्ट मिळविण्यासाठी तिसर्‍या भांड्यामध्ये पिस्ताची पेस्ट घाला. हाताला तेल लावून खाली हिरवी पेस्ट पसरा, मध्यभागी पांढरा आणि वर केशर असा रंग येऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर षटकोनी आकारात कापून घ्या. रंगीत साखर, बदाम, काजू, पिस्ता किंवा मनुका घालून सजवा.

Tricolour Sweets
मटार सॅंपल खाल्लत का? नाश्त्यासाठी आहे मस्त पदार्थ
tringa sandesh
tringa sandeshgoogle

तिरंगा संदेश (१५ संदेश होतील)

साहित्य- २ लिटर गायीचे दूध, १०० ग्रॅम साखर, १ ग्रॅम केशर, ५० ग्रॅम पिस्ता पेस्ट

कृती- दूध दहा मिनिटांसाठी उकळा. मग त्यात ४/५ विनेगर मिसळा. दह्याचे दूध काढा आणि छेन्यासाठी मठ्ठा काढून टाका. हे छेना गुळगुळीत होण्यासाठी चांगला मळून घ्या. नंतर मंद आचेवर शिजवून त्यात थोडी साखर घालून 10-15 मिनिटे ढवळा.मिश्रण 2 वाडग्यांमध्ये विभागून घ्या. केशरी रंग मिळविण्यासाठी एका वाडग्यात केशर घाला. एका डब्यात पिस्ताची पेस्ट घालून नीट ढवळून घ्या. पेस्टचे गोळे करून दंडगोलाकार आकार देण्यासाठी थोडे सपाट करा. २ तास फ्रिजमध्ये ठेवा आणि खायला द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com