टेस्टी फुड खाऊनही वजन कमी करता येतं, जाणून घ्या कसं?

टेस्टी फूड ट्राय करुन तुम्ही वजन कमी करु शकता
कोशिंबीर
कोशिंबीरsakal

वजन कमी करणे प्रत्येकासाठी जोखमीचे काम आहे.यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो.वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार. योग्य आहार घेतल्याने वजन कमी करण्यास मदत होते.यासाठी आपण अनेकदा डाईट फॉलो करतो आणि या डाईटच्या नावाने अनेकदा आपल्याला बेचव पण पौष्टीक असं अन्न खावं लागते. काही मिळवण्यासाठी काही तरी गमवावं लागतं, असं म्हणत आपण हे बेचव अन्न पण सहज खाऊन टाकतो. पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की असं बेचव अन्न तुम्हाला खावं लागणार नाही आणि अगदी टेस्टी फूड ट्राय करुन तुम्ही वजन कमी करु शकता. हो, हे खरंय. (You can now do weight loss by eating delicious food)

कोशिंबीर
'या' पदार्थांचे सेवन करा; हार्ट अटॅकला दूर ठेवा

खरं तर काही भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असल्याने वजन कमी करण्यास मदत होते तर दह्यामध्ये प्रथिने जास्त असल्याने ते पण शरीर उपयुक्त आहे. त्यामुळे जर दही टाकलेली कोशिबींर खाल्ली तर पचनक्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी कोशिंबीर विषयी माहिती देणार आहोत ज्या शरीरासाठी हेल्दी तर असणारच पण सोबत टेस्टीही असणार आहे.

कोशिंबीर
आठवड्याभरात वजन कमी करायचंय? लिंबूपाणी ठरेल रामबाण, कसं ते वाचा

दुधीभोपळ्याची कोशिंबीर

दुधीभोपळा मध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. दुधीभोपळ्याची कोशिंबर बनवण्यासाठी उकडलेला दुधी भोपळा चांगला मॅश करा आणि त्यात फेटलेले दही मिसळा. हिरवी मिरची, काळे मीठ आणि जिरेपूड घाला आणि याचे मिश्रण एकत्र करा. तुमची दुधीभोपळ्याची कोशिंबीर तयार होणार

बीटची कोशिंबीर

किसलेले बीटमध्ये यासाठी 1 ते 2 कप दही फेटून घ्या. एक चमचा भाजलेले जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालात्यात बारीक चिरलेला कांदा घाला चवीनुसार तिखट घाला.

कोशिंबीर
कॉफी पिणं पडू शकतं महागात; Heart Attack येण्याचा धोका

काकडीची कोशिंबीर

काकडीत पाणी मुबलक प्रमाणात असते सोबतच त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी किसून घ्या त्यात एक कप दही फेटून चवीनुसार मीठ, तिखट, भाजलेले जिरे आणि काळी मिरी घाला. यानंतर आपली कोशिंबीर तयार होणार.

पुदिनाची कोशिंबीर

पुदिना आणि दहीची कोशिंबीर शरीरासाठी खुप पौष्टीक असते. पुदिन्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. ही कोशिंबीर बनवण्यासाठी १ ते २ कप दह्यात पुदिन्याची पाने घाला. त्यात मीठ आणि भाजलेले जिरे पूड घाला. पुदीनाची कोशिंबीर तयार होणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com