कोपा अमेरिका: कोलंबिया उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

ईस्ट रुदरफोर्ड - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाने पेरुचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हिड ओस्पीना हा या विजयाचा हिरो ठरला.

ईस्ट रुदरफोर्डमधील मेटलाईफ मैदानावर झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सुमारे 80 हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत एकही गोल करण्यात अपयश आल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. पेरुचा मधल्या फळीतील खेळाडू मिग्एल ट्राउको याने मारलेला चेंडू ओस्पीना सुरेखरित्या अडवून कोलंबियाचा विजय निश्चित केला.

पेनल्टी घेणाऱ्या कोलंबियाच्या तिघांनीही गोल करण्याची संधी दवडली नाही. तर, पेरुच्या ट्राउकोपाठोपाठ ख्रिस्तियन क्युवा यानेही पेनल्टी दवडली. यामध्ये कोलंबियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. मेक्सिको आणि चिली यांच्यातील विजेत्यासोबत कोलंबियाचा उपांत्य फेरीचा सामना येत्या बुधवारी होणार आहे. 

फुटबॉल

सोची - जगज्जेत्या जर्मनीने कॉन्फेडरेशन्स करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी नवोदितांचा संघ निवडला आहे. त्यांना या स्पर्धेत सलामीच्या लढतीत...

बुधवार, 21 जून 2017

दोहा : हसन अल हैदोस याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर कतारने विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियावर 3-2 असा...

शुक्रवार, 16 जून 2017

सुवॉन (दक्षिण कोरिया) - इंग्लंडने व्हेनेझुएलास पराजित करत विश्‍वकरंडक युवा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. फुटबॉल जगतातील...

सोमवार, 12 जून 2017