#BappaMorya मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला मोठी मागणी रामदास वाडेकर 

#BappaMorya मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला मोठी मागणी रामदास वाडेकर 

टाकवे बुद्रुक - मावळच्या मर्दानी ढोल लेझीमच्या खेळाला, शहरात मोठी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ढोल लेझीम पथकांचा दणदणाट सातासमुद्रा पार गेला आहे. जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील या पारंपारीक वाद्यांना पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नवी मुंबई नगरसह राज्यातील इतर शहरात मावळच्या ढोल ताशाचा नाद घुमतोय, औद्योगिक नगरी म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड करांच्या कानातही हाच नाद गुंजतोय.

संकष्टी चतुर्थीला गणरायाचे स्वागत करून माघारी परतलेले ढोल पथकांचे सातव्या, नवव्या, दहाव्या आणि अनंत चतूर्थीला मोठे बुकींग आहे. सध्या पारंपारिक वाद्यांचे महत्व अधोरेखित झाल्याने डॉल्बी आणि डीजेच्या जमान्यातही ढोल ताशांनी आपले महत्व आबादीत ठेवले आहे. त्यातच कानठळ्या बसणाऱ्या कर्णकर्कश आधारावर न्यायालयाने निर्बंध घातले आहे. ढोल ताशांला परंपरा आहे, ही परंपरा कायम ठेवत गावाच्या उत्पन्नाचा हा श्रम प्रतिष्ठित मार्ग आहे. 

या श्रमातूनच गावच्या ग्रामदैवतांचे जीर्णोद्धार झाले आहे, पांडुरंगाची राऊळ उभी राहिली आहे. गावच्या यात्राजत्रा,अखंड हरिनाम सप्ताह याच बिदागीतून होत आहे. किमान पन्नास हजार रुपये बिदागी पासून पुढे साठ,सत्तर,ऐंशी, नव्वद ते लाख रूपये बिदागी मिळते.सातवा,नववा, दहावा,अकरावा किंवा अनंत चतुर्थी पर्यत एक एक ढोल पथक दोन ते चार सुपा-या वाजवत आहे.मिळालेली रक्कम विश्वासाने मंडळातील विश्वासू सहका-याकडे ठेवून गरजे नुसार या रकमेचा वापर केला जातो.मावळ तालुक्याचे नाव राज्याच्या राजधानीत, शिक्षणनगरीत किंवा औद्योगिकनगरीत खणखणत पोहचविणा-या ढोल पथकांचा गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. पण या पथकांची शहरात सुरक्षितता, प्रवासातील जोखीम फार महत्वाची आहे. या बाबत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीची गरज आहे. कायद्याची अचूक माहिती आणि ज्ञान आवश्यक आहे. या बाबतीत पथकांच्या कार्यकर्त्यांना प्रबोधनाची गरज आहे. 

इतकी मोठी संघटित युवा शक्ती समर्थपणे गावच्या विकासासाठी, गावच्या नावासाठी रक्क्ताचे पाणी करून ढोल ताशा बडवित आहे. या संघटित शक्तीला योग्य वळणाने दिशा दिली तर गावचा कायापालट करून सिंपल व्हिलेज, स्मार्ट व्हिलेज होईल. कारण या पथकाचे नेतृत्व करणारे सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सभापती पदा पर्यंत पोहचले. यातील काही जण प्रशासकीय सेवेत तर काही व्यापार, व्यवसायात उतरले. काही अपवादात्मक कार्यकर्ते नुसतेच ढोल ताशा वाजवत राहिले. 

आता या कार्यकर्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजनेची, सामूहिक विमा संरक्षणाची गरज आहे. प्रवास करताना गणेशोत्सव काळात सर्व ढोल माफ केले पाहिजे अशी मागणी सर्व ढोल ताशा पथकांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com