चैतन्यदायी गणेशोत्सवाचा जल्लोषी माहौल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमन सोहळ्यांना उत्साहात प्रारंभ झाला असून आजही अनेक मंडळांच्या मिरवणूका निघाल्या. गंगावेश, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प आदी ठिकाणी वाद्यपथकांनी हजेरी लावली आहे. उद्या (ता. 24) दुपारपासून पुन्हा या आनंदाला भरते येणार आहे. शुक्रवारी  (ता. 25) हा आनंदोत्सव टीपेला पोचणार असून घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. 

दरम्यान, विद्युत रोषणाईने शहर उजळून निघाले आहे. बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. आज रात्री महाव्दार रोड वाहतूकीस बंद केला. 

अंबाबाई मंदिरातील गणपती 
एकशे सत्तावीस वर्षांची परंपरा असलेल्या अंबाबाई मंदिर गरूड मंडपातील मानाच्या गणरायाचा आगमन सोहळा उद्या (ता. 24) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. करवीर नाद ढोलताशा पथक, सुप्रभात बॅंडच्या निनादात पापाची तिकटी येथून मिरवणूकीला प्रारंभ होईल. 1890 पासून महालक्ष्मी भक्त मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा होतो. यंदाच्या उत्सवानिमित्त मंदिरात "शाहूकालीन पाणी व्यवस्थापन' या विषयावर फलकांतून प्रबोधन केले जाणार आहे. त्याशिवाय पन्नास हजार माहितीपत्रके वितरित केली जाणार आहेत. 

केएमटी फेऱ्यांत कपात 
शुक्रवार (ता.25) पासून पाच सप्टेंबरपर्यंत गणेश चतुर्थी, चौथा शनिवार व रविवार, गौरी गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्थी यामुळे प्रवासी संख्या कमी असेल. या पार्श्‍वभूमीवर केएमटी बसेसच्या फेऱ्यामध्ये कपात केली आहे. आर. के. नगर व पाचगाव बसेस उद्या (ता.24) पासून पाच सप्टेंबरपर्यंत महाराणा प्रताप चौक, लुगडी ओळ ऐवजी लक्ष्मीपुरी, शिवाजी टेक्‍निकल, बिंदू चौक आणि पुढे नियमित मार्गावरून धावतील. 

"तालब्रम्ह' मिरवणुकीत 
नव्याने स्थापन झालेले तालब्रम्ह ढोल-ताशा पथक शुक्रवारी (ता.25) पहिल्यांदाच मिरवणूकीत सादरीकरण करणार आहे. फुलेवाडी सहावा स्टॉप येथील कारीआई तरूण मंडळाने या पथकाला निमंत्रित केले आहे. 

टॅग्स