बाप्पांच्या स्वागताची तयारी; बाजारपेठ हाऊसफुल्ल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मिरज - गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी मिरजकर नागरिक सज्ज झाले आहेत. शहरात चारशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उत्सव साजरा करत आहेत. गतवर्षीपेक्षा ही संख्या वाढली आहे. आज दिवसभरात काही मंडळांनी उंच मूर्ती नेण्यास सुरुवात केली.

उत्सवाच्या खरेदीसाठी लक्ष्मी मार्केटचा परिसर आज सकाळपासूनच फुलला होता. घरगुती मूर्तींच्या बुकिंगसाठी स्टॉलवर गर्दी होती. सराफ कट्टा, श्रीकांत चौक, किसान चौक, नागोबा कट्टा या परिसरांत रस्त्याच्या दुतर्फा मूर्तींचे स्टॉल लागले होते. ग्रामीण भागातील मंडळांनी मोठ्या मूर्ती आजच न्यायला सुरुवात केली होती. रोषणाईचे व सजावटीच्या साहित्याचे स्टॉल दुपारनंतर रस्त्यावर लावण्यात आले. मार्केटचा परिसर उद्या वाहतुकीसाठी बंद राहील. 

मंडळांचे कार्यकर्ते आजही विविध परवान्यांसाठी पोलिस ठाणे व महापालिकेत गर्दी करून होते. शहर पोलिसांच्या हद्दीत २८१ व गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८१ मंडळांनी नोंद केली. नोंद न केलेल्या लहान मंडळांची संख्या पन्नासहून अधिक आहे. यंदा उंच आणि अधांतरी तरंगणाऱ्या स्वरूपातील मूर्तींची संख्या जास्त आहे. दगडूशेठ, लालबागचा राजा या स्वरूपातील मूर्तींची संख्याही मोठी आहे. मंडळांचा भर रोषणाई, सजीव देखावे आणि उंच मूर्तींवर आहे.