नाशिककरांनी वाजत-गाजत केले गणरायांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नाशिक - "गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करत आज भाविकांनी घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. काल पावसाने ओढ दिली असतांना आज सकाळपासून पावसांच्या सरींनी भाविकांचा उत्साह वाढविला. घरातील चिमुरड्यांपासून तर ज्येष्ठ मंडळीमध्ये गणशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. वाजत-गाजत, धुम धडाक्‍यात बाप्पांचे आगमन झाले असून पुढील दहा दिवस भक्‍तीभावाने गजाननाची आराधना केली जाणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण होते. बाप्पाच्या आगमनाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. सजावटीच्या वस्तुंनी बाजारपेठ सजली होती. आज सकाळपासून श्रींच्या प्रतिष्ठापनेची लगबग शहरात बघायला मिळाली. यंदा प्रथमच त्र्यंबकरोडवरील ठक्‍कर डोम येथे स्टॉल्स लावण्यात आल्याने नाशिककरांनी तेथे गर्दी केली होती. सकाळी आठपासून भाविकांची गर्दी होण्यास सुरवात झाली. ढोल-ताशासह अन्य वाद्यांसह वादकांनी उपस्थिती नोंदविली होती. तसेच पुजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य आदींचेही स्टॉल्स होते. भाविकांनी पारंपारीक वेशभुषेत उपस्थितीत होत गणपती बाप्पांचा जयघोष करत श्रींची मूर्ती घरी नेली. 

डोंगरे वसतीगृह मैदानावरही स्टॉल होते. या ठिकाणीही भाविकांची गर्दी झाली होती. घरातील लहान मंडळी, युवतींनी बाप्पांना डोक्‍यावर घेत घोषणा दिल्या. बहुतांश भाविक सहकुटुंब हजर झाले होते. महुर्ताप्रमाणे घराघरात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर मंडळांकडून सायंकाळी उशीरा मोठ्या मूर्तींची मंडपात स्थापना करण्यात आली. दरम्यान सकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरींना सुरवात झाली होती. यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला होता.

टॅग्स