सोसायट्यांच्या कल्पकतेचा आजपासून उत्सव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे -  मांगल्याची देवता, बुद्धीचे प्रतीक असणाऱ्या लाडक्‍या गणरायाचे शुक्रवारी आगमन होत असून, घराघरांत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रंगणारा बाप्पांचा सोहळा यंदा शहरातील विविध हाउसिंग सोसायट्यांमध्येही रंग भरणार आहे. निमित्त आहे, "सकाळ'च्यावतीने आयोजित सोसायटी गणपती स्पर्धेचे. त्यामुळे गणेशोत्सवाची धमाल आता सोसायट्यांमध्येही अनुभवास मिळणार असून, त्यासाठी सोसायट्या सज्ज झाल्या आहेत. 

"सकाळ सोसायटी गणपती स्पर्धे'स शहराच्या विविध भागातल्या सोसायट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शनिवार (ता.26) ते सोमवार (ता.28) या कालावधीत सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळात या स्पर्धा होणार आहेत. परीक्षक मंडळ सोसायटीतील सजावटींची पाहणी करणार आहेत. सोसायटीच्या सामाजिक उपक्रमांची माहिती या वेळी घेतली जाणार आहे. या उपक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सहभागी होणार असून, ती सोसायट्यांना भेट देणार आहे. "एसबीआय' लाइफ इन्शुरन्स कंपनी या उपक्रमाचे प्रायोजक असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी हे सहप्रायोजक आहेत.