संकटामुळे खचू नका, तर धैर्याने सामोरे जा देखाव्यातून शेतकऱ्यांना दिला संदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

तुळजापूर - संकटामुळे खचून न जाता धैर्याने सामोरे जात संकटावर मात करण्याचा संदेश देत श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती गणेश मंडळासमोर राजा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी लक्षवेधी देखावा सादर केला.

गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आल्याने देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दुष्काळी परिस्थितीने शेतकरी पुरता खचला आहे. सततच्या नापिकीने अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हताश झाले आहेत. कोलमडणारा शेती व्यवसाय आणि त्यास उभारी देण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न राजा कंपनी तरुण मंडळाने केला आहे. येथील आठवडे बाजारातील सुरेख स्मृती मंगल कार्यालयाच्या परिसरात मंडळाने हा देखावा सादर केला आहे. राजा कंपनी तरुण मंडळाचे मार्गदर्शक सज्जनराव साळुंके, अध्यक्ष अनंत साळुंके यांनी सांगितले की, शेतकरी चांगल्या प्रकारे उभा राहिला पाहिजे, यासाठी आम्ही देखावा मांडला आहे.

टॅग्स