‘दगडूशेठ’ गणपतीला ४० किलोंचे नवे दागिने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ब्रह्मणस्पती मंदिर साकारले आहे. श्रीं च्या मूर्तीसाठी नव्याने चाळीस किलो सोन्याचे दागिनेदेखील तयार केले आहेत. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगरसेवक हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण उपस्थित होते. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना चतुर्थीला सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांनी त्र्यंबकेश्‍वरच्या गोरक्षनाथ मठाचे गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते होईल. 

गोडसे म्हणाले,‘‘सव्वाशेव्या वर्षानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांसहित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसही आमंत्रणे पाठविली आहेत. ऋषिपंचमीला २५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण होईल. गणेशभक्तांसाठीचा ५० कोटींचा विमा ट्रस्टने उतरविला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बेलबाग चौक परिसरात दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

श्रींसाठी साडेनऊ किलोचा मुकुट
ट्रस्टने यंदा ‘श्रीं’साठी साडेनऊ किलोचा सोन्याचा मुकुट केला असून, सातशे ग्रॅमचा शुंडाहार, सूर्य किरणांचा आभास निर्माण करणारे दोन किलोंचे कान आणि अडीच किलोंचा अंगरखा, साडेतीन किलोंचे उपरणे, साडेसहा किलोंचे सोवळे, एक किलोचा हार केला आहे.’’ महाराष्ट्र, पं. बंगाल, कर्नाटक येथील चाळीस कारागिरांनी हे दागिने घडविले आहेत.