'सर्जिकल स्ट्राईक'चे नाटक; हाफिजचा कांगावा

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

लाहोर - उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे पाकिस्तानसह दहशतवादी संघटनांना चिंतेने ग्रासले असताना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेला दहशतवादी हाफिज सईदने "भारताने "सर्जिकल स्ट्राईक‘चे नाटक केल्याचा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे.

पाकमध्ये घुसून भारताने "सर्जिकल स्ट्राईक‘ केल्याचे भारतातील काही लोक म्हणत असल्याचे सईद म्हटले आहे. मात्र हे सर्व अजित डोवाल यांचे नाटक असून त्यांनी बंद खोलीत बसून "सर्जिकल स्ट्राईक‘चे नाटक केल्याचा कांगावा सईदने केला आहे. तसेच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मिरमधील कोणत्याही भागात प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नसून केवळ प्रादेशिक दबाव निर्माण करण्याचा हे नाटक केले असल्याचा दावाही सईदने केला आहे.

‘सर्जिकल स्ट्राईक‘मुळे भारतामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून "हाफिज सईदला पाकमध्ये घुसून ठार करावे‘ अशी मागणी उरी येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले हवालदार अशोक कुमार सिंह यांच्या पत्नी संगिता देवी यांनी केली आहे.

ग्लोबल

लष्कर गाह - शहरातील न्यू काबूल बॅंकेबाहेर घडवून आणलेल्या एका कार बॉंबस्फोटात 29...

गुरुवार, 22 जून 2017

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून चिनी नागरिकांना पाकमध्ये येण्यासाठी येणाऱ्या दिल्या...

गुरुवार, 22 जून 2017

लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहरामधील अंतर्गत वाहतूक व्यवस्था...

गुरुवार, 22 जून 2017