चालकांना मिळणार आता मोफत कॉफी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

आयची प्रीफेक्चर (जपान) - आपल्याला सगळ्यांनाच स्मार्टफोन्सची सवय झाली आहे. थोड्या थोड्या वेळानी सतत आपले हात फोन चेक करण्यासाठी जातातच. परंतु, गाडी चालवतांना या सवयीची अडचण होऊ नये यासाठी जपानमध्ये ‘‘ड्रायव्हिंग बरिस्ता‘‘ हे नवे स्मार्टफोन ऍप तयार करण्यात आले आहे. या ऍपनुसार जर 100 किलोमीटर पर्यंत गाडी चालवताना चालकाने स्मार्टफोन चेक केला नाही तर, त्या चालकाला मोफत ब्लेंडेड किंवा आईस्ड कॉफी कुपन देण्याची सोय केली आहे.

आयची प्रीफेक्चर येथे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार गेल्या तेरा वर्षांच येथे 443,691 अपघात झाले. त्यापैकी 50,101 अपघात हे गाडी चालवताना स्मार्टफोनचा वापर केल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे.

गाडी सुरु केली की या ऍप वरील ‘सेफ ड्राईव्ह स्टार्ट‘वर क्लिक करुन ड्रायव्हिंग सुरु करायचे. जीपीएसचा वापर करुन गाडीचे 100 किलोमीटर झाल्यावर यामध्ये आपोआप एक कॉफी कुपन ऍड होण्याची सोय करण्यात आली आहे.

टोयोटा मोटार कॉर्पोरेशन, कोमेडा को.लिमिटेड आणि केडीडीआय कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने ‘ड्रायव्हिंग बरिस्ता‘ हे ऍप तयार करण्यात आले आहे. 

चालकांना मिळालेली कॉफी कुपन्स ही ‘कोमेडा कॉफी शॉप‘ या स्थानिक कॉफी शॉपमध्ये रिडिम करण्याची सोय या ऍप द्वारे देण्यात आली आहे.

टॅग्स