आयात वस्तूंवर अमेरिकेकडून 20 टक्के करवाढीची शक्‍यता

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

ट्रम्प सरकारचा इशारा; भिंत उभारण्यासाठी निधी संकलित करणार

वॉशिंग्टन- मेक्‍सिकोसह इतर देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के कर लादण्याचा विचार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या करीत आहेत. अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमेवर भिंत उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद करण्यासाठी ही करवाढ संभव असल्याचे संकेत व्हाइट हाउसने दिले आहेत.

अमेरिका- मेक्‍सिकोदरम्यान ही भिंत बांधण्याचा विचार ट्रम्प करीत असून, त्यासाठी अशा प्रकारे करवाढ करून निधी उभारला जाणार आहे. हा प्रस्ताव सध्या मेक्‍सिकोपुरता मर्यादित असून, त्याविषयी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. अशी माहिती व्हाइट हाउसचे माध्यम सचिव सिन स्पाइसर यांनी दिली. फिलाडेल्फिया दौऱ्यावरून परतताना त्यांनी याविषयी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या संकेतानुसार, संभाव्य काळात या करवाढीचा फटका भारत, चीनसह इतर निर्यातदार देशांनाही बसू शकतो, असा तर्क काढला जात आहे.

सध्या जवळपास 160 देश आयात वस्तूंवर कराची आकारणी करतात. मात्र अमेरिकेच्या धोरणानुसार आयात ही करमुक्त असून, फक्त निर्यातीवर कराची आकारणी केली जाते. वार्षिक 50 अरब डॉलरच्या आयात वस्तूंवर 20 टक्के कर आकारला, तर अमेरिकेला यातून वार्षिक 10 अरब डॉलरचा महसूल प्राप्त होईल. परिणामी, भिंतीसाठी येणारा खर्च यातून भरून काढणे शक्‍य असल्याचे स्पाइसर यांनी म्हटले आहे.

सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भिंत उभारण्याचा प्रस्ताव हा महत्त्वाचा असून, यामुळे बेकायदेशीररीत्या होणारे स्थलांतर रोखले शक्‍य आहे. तसेच यावर खर्च होणारा अतिरिक्त पैसा वाचणार असल्याचे स्पाइसर यांनी निदर्शनास आणून दिले.